फॅशनच्या दुनियेत नेहमीच नवे नवे ट्रेंड्स पाहायला मिळतात. कपड्यांसह दागिन्यांनाही महत्त्व आहे आणि सण आल्यानंतर तर हे महत्त्व अधिकच वाढते. तुमचे कपडे कितीही फिकट असोत पण त्यावर अत्यंत सुंदर दागिने असतील तर कपड्यांनाही नवा लुक देण्यास याची मदत मिळते. सध्या अनेक वेगवेगळे डिझाईन्स दागिन्यांचे बाजारामध्ये पाहायला मिळतात आणि त्यापैकी एक आहे ते म्हणजे ऑक्सिडाईज्ड दागिन्यांचे डिझाईन्स (Oxidized Jewellery). कोणत्याही स्किन टोनवर हे दागिने शोभून दिसतात. ऑक्सिडाईज्ड दागिन्यांचा तोराच वेगळा असतो. पण काही जणांना कोणत्या कपड्यांवर कशा प्रकारचे ऑक्सिडाईज्ड दागिने स्टाईल करायचे याची माहिती नसते. आम्ही तुम्हाला या गणपतीच्या सणासाठी तुम्ही जर ऑक्सिडाईज्ड दागिन्यांची स्टाईल करणार असाल तर ती कशी करायची याबाबत सांगत आहोत. तुम्ही नक्की या टिप्स फॉलो करा आणि या गणपतीच्या सणासाठी व्हा तयार! चला तर मग लागा तयारीला गणपती बाप्पा मोरया!
साडीसह असे घाला दागिने
ऑक्सिडाईज्ड दागिने तुम्ही कोणत्याही साडीसह परिधान करू शकता. पण चंदेरी बॉर्डर (silver border) साड्यांसह हे अधिक उठावदार दिसतात. तसं तर हे दागिने प्रत्येक रंगावर चांगले दिसतात. पण गोल्डन अर्थात सोनेरी रंग असेल तर याची स्टाईल चांगली दिसणार नाही. तुमच्या साडीवरील ब्लाऊज यु अथवा व्ही आकारात असेल तर तुम्ही चोकर ऑक्सिडाईज्ड दागिन्यांचा वापर करा. आजकाल चेन दागिनेदेखील ट्रेंडमध्ये आहेत. अशी साधी आणि सोबर ज्वेलरी साडीसह एक वेगळी आकर्षकता आणते.
ब्लेझरसह वापरा
तुम्हाला जर हेडिंग वाचून हा प्रश्न मनात आला असेल की, ब्लेझरसह ऑक्सिडाईज्ड दागिने कसे वाटतील, तर याचे उत्तर आहे, अगदी सुंदर! ब्लेझरसह तुम्ही चोकर आणि लांब चैनचा वापर करा. तुम्हाला हे सर्व घालायचे नसेल तर आपले कानातले तुम्ही फॅशनेबल आणि आधुनिक पर्यायासह बदला. तुम्ही त्यासाठी ऑक्सिडाईज्ड ईअर कफ्स (Ear cuffs) चा देखील वापर करू शकता. या कपड्यांवर तुम्ही भरपूर दागिने घालू नका. इअर कफ्स बोल्ड असतील तर फक्त तेच ठेवा. दागिने चमकदार ठेवण्यासाठीही तुम्ही काही टिप्सचा वापर करू शकता.
लेहंग्यासह घाला अशा पद्धतीने
गणपतीसाठी तुम्ही जर लेहंगा घालणार असाल तर तुम्ही त्यासह ऑक्सिडाईज्ड दागिन्यांचा पर्याय निवडू शकता. यासाठी तुम्ही फॅन्सी कौडी बीड्सचा नेकलेस वापरू शकत अथवा लेअरिंग चेन्स वा नेकलेस यासह अप्रतिम दिसतो. त्याचप्रमाणे मोठे कानातले आणि नाकामध्ये थोडी मोठी ऑक्सिडाईज्ड नथ अथवा चमकी घातली तर अत्यंत सुंदर दिसेल.
ऑफ-शोल्डर अथवा स्कर्ट टॉपसह अशा प्रकारे करा फॅशन
ऑक्सिडाईज्ड बांगड्या () खूपच ट्रेंड्समध्ये आहेत. या बांगड्यांचे सर्वात चांगले वैशिष्ट्य हे आहे की, आधुनिक आणि पारंपरिक या दोन्ही कपड्यांवर याचा वापर करता येतो आणि या सुंदर दिसतात. तुम्ही इंडो – वेस्टर्न लुक जर या गणेशोत्सवासाठी करणार असाल तर तुम्ही या पर्यायाचा नक्की वापर करा. ऑफ शोल्डर ड्रेस असेल अथवा स्कर्ट टॉप असेल तर मोठे कानातले आणि ऑक्सिडाईज्ड बांगड्या ही मस्त स्टाईल आहे.
जीन्स आणि टॉपसहदेखील करा कॅरी
काही जणांना इतर कोणत्याही कपड्यांपेक्षा जीन्स आणि टॉप हा आरामदायी पेहराव वाटतो. गणपतीमध्येही काही जणांच्या घरी जाताना जीन्स आणि टॉप्सची निवड करणारे लोकही आहेत. पण या पेहरावाला थोडा पारंपरिक लुक आणण्यासाठी तुम्ही ऑक्सिडाईज्ड दागिन्यांचा नक्कीच वापर करू शकता. तुम्हाला अत्यंत सोफिस्टिकेटेड लुक हवा असेल तर चंकी सिल्व्हर नेकलेस तुम्ही वापरा. तसंच स्ट्रॅपी अथवा स्केटर ड्रेस अशेल अथवा रंगबेरंगी क्रेप वा श्रग असेल तर ऑक्सिडाईज्ड लेअर नेकलेस नक्की वापरा. बोहेमियन लुक हवा असेल तर सॉलिड क्रॉप टॉप आणि फ्लोई स्कर्टसह तुम्ही लेअर्ड ऑक्सिडाईज्ड नेकलेस वापरू शकता.
ऑक्सिडाईज्ड दागिने प्रत्येक कपड्यांसह सुंदर दिसतात. तुम्हाला या गणपती उत्सवासाठी वेगळे लुक करायचे असतील तर तुम्ही नक्की हे लुक वापरून पाहा. गणेशोत्सवाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा!