ADVERTISEMENT
home / Festival
ganesh chaturthi wishes in marathi

100+ गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा | Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi

गणपती उत्सव म्हटला की सगळ्यांच्या मनात आणि अंगात एक वेगळाच उत्साह आणि संचार असतो. गणेश चतुर्थी हा सणच असा वेगळा आणि उत्साहाचा आहे. गणपती बाप्पा मोरया म्हणत आपण सगळ्याचा शुभ कामांना सुरूवात करत असतो. गणपतीच्या आगमनासाठी हल्ली वेगवेगळे स्टेटस (ganpati bappa welcome status in marathi) ठेवण्यात येतात. गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठीत (wishes for ganesh chaturthi in marathi) देण्याचा थाटच काही वेगळा आहे. गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश मराठी खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. तुम्हीही तुमच्या स्वकियांना आणि आप्तजनांना आता मराठीमधून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा (ganesh chaturthi wishes in marathi) नक्की द्या. खास तुमच्याासाठी मराठमोळ्या गणेश चतुर्थी शुभेच्छा (ganesh chaturthi messages in marathi), गणपतीसाठी खास स्टेटस (ganpati bappa status in marathi) ठेवून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा एकमेकांना द्या.

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा (Ganesh Chaturthi Wishes In Marathi)

Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi
Ganesh Chaturthi Wishes In Marathi

गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा (happy ganesh chaturthi wishes in marathi) देण्यासाठी आपण सगळेच उत्सुक असतो. गणपतीचा उत्सव हा प्रत्येक मराठी माणसासाठी खासच असतो. आपल्या जवळच्या व्यक्तींना गणशोत्सवाच्या शुभेच्छा द्या आणि करा स्मरण बाप्पाचे. मंगलमूर्ती मोरया.

1. हे गणराया गेल्या दोन वर्षांपासून 
कोरोना महामारीचे जे संकट आले आहे 
त्यातून सर्वांना मुक्त कर हीच तुझ्या चरणी प्रार्थना 
गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा 

2. मोदकांचा केला प्रसाद 
केला लाल फुलांचा हार 
मखर झाले नटून तयार 
आले वाजत गाजत बाप्पा
गुलाल फुले अक्षता उधळे 
बाप्पाच्या आगमनासाठी जमले सगळे 
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

3. बाप्पाच्या आगमनला
सजली सर्व धरती 
नसानसात भरली स्फुर्ती 
आतुरता आता फक्त बाप्पाच्या आगमनाची – गणेश चतुर्थी शुभेच्छा!

4. तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…!!!

5. बाप्पाच्या उदराइतका आनंद तुमच्या आयुष्यात विशाल असो 
उंदराइतक्या लहान अडचणींना तुम्हाला सामोरं जायला लागो 
बाप्पाच्या सोंडेप्रमाणे तुम्हाला आयुष्य लांबसडक मिळो 
प्रत्येक क्षण प्रसादाच्या मोदकाप्रमाणे गोड असो 
गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!

संपूर्ण गौरी आवाहन विधी

ADVERTISEMENT

गणपती बाप्पा कोट्स (Ganpati Bappa Quotes In Marathi)

Ganpati Bappa Quotes In Marathi
Ganpati Bappa Quotes In Marathi

सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे (coronavirus) सगळ्यांच्या घरी जाणे शक्य नाही. त्यामुळे सगळ्यांना भेटणे आणि बाप्पाचे घरोघरी जाऊन दर्शन घेणे शक्य होईलच असे नाही. पण आपण प्रत्यक्ष नाही गेलो तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून गणपती बाप्पा कोट्स स्टेटसला (ganpati bappa status in marathi) ठेऊन अथवा अन्य ठिकाणी दर्शवून नक्कीच आपल्या शुभेच्छा (ganesh chaturthi greetings in marathi) तिथपर्यंत पोहचवू शकतो. असेच गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास कोट्स (ganpati bappa welcome status in marathi) तुमच्यासाठी. 

1. देव येतोय माझा आस लागली तुझ्या दर्शनाची 
तुला डोळे भरून पाहण्याची, तुझ्या आगमनाची घालमेल मिटते माझी 
गणपती बाप्पा मोरया!!!

2. बाप्पाचे रूप आहे निराळे
येता कोणतेही संकट येतो धावूनी कायम 
त्याने सांभाळले म्हणूनच तर सर्व काही अजूनही नीट आहे 
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

3. गणराया तुझ्या येण्याने लाभले सुख, समृद्धी आणि आनंद 
सर्व संकटाचे झाले निवारण लाभले तुझ्या आशिर्वादाने सर्व काही 
गणेश चतुर्थी शुभेच्छा!

ADVERTISEMENT

4. गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास 
लंबोदराचा घरात आहे निवास 
दहा दिवस आहे आनंदाची रास 
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास
गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा, गणपती बाप्पा मोरया

ganesh chaturthi wishes in marathi

5. कोणतीही येऊ दे समस्या 
तो नाही सोडणार आमची साथ 
आहे आम्हाला सार्थ विश्वास 
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

6. अडचणी आहे खूप आयुष्यात 
पण त्यांना समोर जायची ताकद 
बाप्पा फक्त तुझ्यामुळे येते 
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

ADVERTISEMENT

7. श्रावण सरला, भाद्रपद चतुर्थीची पहाट आली 
सज्ज व्हा फुले उधळायला गणाधीशाची स्वारी आली 

8. श्रावण संपला रम्य चतुर्थीची पहाट झाली 
सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे
आली आली गणाधीशाची स्वारी आली 

9. बाप्पाच्या आगमनाने आपल्या आयुष्यात
भरभरून सुखसमृद्धी येवो
हीच गणरायच्या चरणी प्रार्थना – गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा

10. देव येतोय माझा, आस लागली तुझ्या दर्शनाची 
एक, दोन, तीन, चार गणपतीचा जयजयकार!

ADVERTISEMENT

माघी गणेश जयंती नेमकी कशी साजरी केली जाते जाणून घेऊया

गणपती बाप्पा स्टेटस (Ganpati Bappa Status In Marathi)

Ganpati Bappa Status In Marathi
Ganpati Bappa Status In Marathi

गणरायच्या आगमनाने सर्व आसमंतात एक आनंदाची लहर उमटते. हल्ली सोशल मीडियावर गणशोत्सवाच्या शुभेच्छांचा पाऊस असतो. त्यामुळे अशा सोशल मीडियावर गणपती बाप्पा स्टेटस (ganesh chaturthi status in marathi) ठेवण्यासाठी खास मजकूर. तुम्हीही ठेवा तुमच्या सोशल मीडियावर खास गणपतीचे स्टेटस 

1. सर्वांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय, हार्दिक शुभेच्छा! तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत याच सदिच्छा! मंगलमूर्ती मोरया

2. आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक आणि मनःपूर्वक शुभेच्छा! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

3. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा – सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

4. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे
कितीही मोठी समस्या असू दे बाप्पा तुझ्या नावातच समाधान आहे 
गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा

5. सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…गणपती बाप्पा मोरया!

ganesh chaturthi wishes in marathi

ADVERTISEMENT

6. वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया
वरदहस्त असूद्या माथी 
राहूद्या सदैव छत्रछाया
गणपती बाप्पा मोरया – गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

7. रम्य ते रूप, सगुण साकार मनी दाटे भाव 
पाहता क्षणभर अंतरंगी भरूनी येत असे गहीवर 
बाप्पाच्या आगमनाच्या शुभेच्छा 

8. माझं आणि बाप्पाचं खूपच छान नातं आहे
जिथे मी जास्त मागत नाही
आणि बाप्पा मला कमी पडू देत नाही 
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

9. सकाळ हसरी असावी 
बाप्पाची मूर्ती समोर दिसावी 
मुखी असावे बाप्पाचे नाव 
सोपे होईल सर्व काम – गणपती बाप्पा मोरया 

ADVERTISEMENT

10. भक्ति गणपती, शक्ति गणपती 
सिद्धी गणपती, लक्ष्मी गणपती महागणपती – गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

गणेश चतुर्थीची माहिती मराठीत

गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश मराठी (Ganesh Chaturthi Messages In Marathi)

Ganesh Chaturthi Messages In Marathi
Ganesh Chaturthi Messages In Marathi

गणेश चतुर्थी म्हटली की, आपली लगबग साधारण एक महिन्याच्या आधीपासूनच सुरू होते, गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी, गणपतीचे आरती संग्रह, गणपतीची पूजा या सगळ्याची तयारी सर्व काही अगदी मनापासून आपण करतो. अशाच बाप्पाच्या वाढदिवसाचे अर्थात गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश मराठीत (ganesh chaturthi message in marathi) खास तुमच्यासाठी. 

1. पाहूनी ते गोजिरवाणं रूप मोह होई मनास खूप
ठेवण्या तुज हाती मोदक प्रसाद होते सदैव दर्शनाची आस 
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

2. जयघोष ऐकोनी देवा तुझा, जाहली कर्णरंध्रे मुग्ध नि गोड
कर जोडून उभा द्वारी, लागली तुझ्या आगमनाची ओढ ….सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

3. बाप्पाच्या आगमनाने आपल्या आयुष्यात भरभरून सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य येवो हीच प्रार्थना – गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

4. श्री गणेशाची कृपादृष्टी कायम तुमच्या पाठिशी राहावी, हीच प्रार्थना – गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

5. गणेश चतुर्थीच्या या मंगलमय क्षणी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

ganesh chaturthi wishes in marathi

6. मोरया मोरया मी बाळ तान्हे 
तुझीच सेवा करू काय जाणे 
अन्याय माझे कोट्यानुकोटी 
मोरेश्वरा बा तू घाल पोटी – गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

7. सर्वांना गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत आणि भरभराट होवो हीच सदिच्छा! मंगलमूर्ती मोरया

8. सर्व मांगल्य मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, 
शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते – गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

ADVERTISEMENT

9. गण्या धाव रे मला पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे…तू दर्शन आम्हाला दाव रे – गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

10. सुखकर्ता, वरदविनायक, गणरायाच्या आगमनाने होतो प्रसन्न सारा आसमंत
अशा या बाप्पाच्या आगमनाच्या आणि गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

वाचा – गणपती बाप्पा विसर्जन कोट्स

गणेश चतुर्थी एसएमएस (Ganesh Chaturthi SMS In Marathi)

Ganesh Chaturthi SMS In Marathi
Ganesh Chaturthi Sms Marathi

बरेचदा कॉर्पोरेट क्षेत्रात व्हॉट्स अॅप अथवा सोशल मीडियावर शुभेच्छा देणे योग्य समजण्यात येत नाही. मग अशावेळी शुभेच्छा देण्यासाठी एसएमएसचा (ganesh chaturthi sms marathi) वापर करण्यात येतो. गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यासाठीही खास एसएमस. 

ADVERTISEMENT

1. आपल्यावर नेहमी बाप्पाचा वरदहस्त राहो, कोणतेही संकट आपल्यावर न येवो. आपली भरभराट होवो हीच प्रार्थना – गणेश चतुर्थी शुभेच्छा!

2. आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीबाप्पा 
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया!!

3. बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात
भरभरून सुख समृद्धी ऐश्वर्या येवो हीच गणरायाकडे प्रार्थना!
गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

4. सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फूर्ती..
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया!

ADVERTISEMENT

5. श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत हीच सदिच्छा!

6. गणेश चतुर्थीनिमित्त आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

7. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम – गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

8. गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक 
तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी 
जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तूज पायी – गणपती बाप्पा मोरया!

ADVERTISEMENT

9. बाप्पाचे होता आगमन, हरपून जाईन तनमन – गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

10. बाप्पाचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर असावा आणि तुमचा चेहरा सदैव हसरा दिसावा हीच इच्छा – गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

यावर्षी तुमच्यावर आलेले सर्व संकट बाप्पा दूर करू दे हीच प्रार्थना. तुमच्या मित्रपरिवारांसोबत वरील गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा (Ganesh Chaturthi Wishes In Marathi),गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी गणपती बाप्पा कोट्स (Ganpati Bappa Quotes In Marathi), गणपती बाप्पा स्टेटस (Ganpati Bappa Status In Marathi), गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश मराठी (Ganesh Chaturthi Messages In Marathi), गणेश चतुर्थी SMS (Ganesh Chaturthi SMS In Marathi) नक्की शेअर करा. POPxo मराठीकडूनही तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

वाचा –

ADVERTISEMENT

Hartalika Quotes In Marathi
Ashtavinayak Darshan Information In Marathi
Sankashti Chaturthi Wishes In Marathi
गणेश चतुर्थीच्या दिवशी का पाहात नाही चंद्र
Ganesh Chaturthi Wishes, Quotes, Caption, Shayari in Hindi
गणेश चतुर्थी शायरी

30 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT