कोरफडचे अनेक फायदे होतात हे आपण नेहमीच लहानपणीपासून ऐकत आलो आहोत. कोरफड आपल्या त्वचा, केस, पोट आणि संपूर्ण शरीराची वेगवेगळ्या तऱ्हेने काळजी घेत असते. चेहऱ्यावर कोरफड लावल्यापासून ते अगदी कोरफडचा ज्युस पिण्यापर्यंत अनेक प्रकारात आपल्या शरीराला, त्वचेला याचा फायदा होत असतो. अगदी या ज्युसचा पण वेगवेगळ्या प्रकारे वापर करण्यात येतो. खरं तर कोरफडला आयुर्वेदामध्ये संजीवनी म्हटलं जातं. यामध्ये अमीने अॅसिडचं प्रमाण जास्त असतं आणि विटामिन 12 असल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास याची मदत मिळते. कोरफड त्वचेची काळजी घेण्यापासून ते केसांचं सौंदर्य वाढवण्यापर्यंत आणि शरीरावर झालेले घाव भरण्यापासून ते कॅन्सरपासून सुटका मिळवण्यापर्यंत सर्व समस्यांवर गुणकारी औषध आहे. या लेखातून आपल्या त्वचेपासून ते केसांपर्यंत नक्की कोरफडचा कसा फायदा (Benefits of aleo vera for hair and skin) होतो ते आपण पाहणार आहोत.
Shutterstock
उष्णतेच्या दिवसात घरातून बाहेर पडल्यानंतर त्वचा अधिक टॅन होते. आपल्या सर्वांनाच सनबर्न अर्थात सूर्यकिरणांचा त्रास या काळात होतो. असं असताना तुम्ही घरात आल्यानंतर कोरफडचा वापर करू शकता. तुम्हाला शरीरावर ज्या ठिकाणी टॅन झालं असेल त्या ठिकाणी तुम्ही कोरफडची जेल लावा. याचा तुम्हाला लवकर उपयोग होतो. तसंच टॅन काढून टाकण्यास आणि शरीरावरील स्ट्रेटमार्क काढून टाकण्यासाठीही याचा उपयोग करून घेता येतो. कोरफड पानांचा आतला भाग अर्थात कोरफड जेल जर चेहऱ्यावर लावली तर त्याचा त्वचेसाठी उत्तम फायदा मिळतो. तसंच या जेलमुळे चेहऱ्यावरील टॅनिंगही निघून जातं. कोरफडमध्ये अँटिएजिंग, अँंटिबायोटिक्स गुण असल्याने चेहऱ्यावरील उजळपणा अधिक दिसून येतो.
कोरफड कशी आहे उपयुक्त आणि काय आहे नुकसान
Shutterstock
प्रत्येकाला केसांची काही ना काही समस्या असतेच. त्यावर कोरफड जेल हा रामबाण इलाज आहे. केसांचा कोरडेपणा, केसगळती आणि केसांमधील कोंडा यासारख्या कोणत्याही समस्येवर तुम्ही कोरफड जेलचा वापर केल्यास, ही समस्या अगदी सहज निघून जाण्यास मदत मिळते. कसा वापर करायचा आपण पाहूया –
कोरफडाच्या ‘या’ 12 गुणांमुळे वाढेल तुमचे सौंदर्य
Shutterstock
तुम्हाला लवकरात लवकर वजन कमी करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही कोरफडचा उपयोग हमखास करू शकता. त्यासाठी नियमित कोरफड ज्युस पिणं आवश्यक आहे. सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा दिवसातून तुम्ही हा ज्युस प्यायल्यास तुमचं लवकर वजन कमी होईल. त्याशिवाय तुम्हाला जास्त व्यायाम करण्याची आवश्यकताही भासणार नाही.
वजन कमी करण्यासाठी घरीच तयार करा उत्कृष्ट डिटॉक्स ड्रिंक्स
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.