ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
गुळाचा असा करा उपयोग आणि मिळवा सुंदर त्वचा

गुळाचा उपयोग करुन मिळवा सुंदर त्वचा

 गुळ (jaggery) हे अतिशय गुणकारी हे आपण सगळेच जाणतो. अनेक जण साखरेला पर्याय म्हणून गुळाचा उपयोग करतात. गुळाचा उपयोग करुन अनेक रेसिपीज बनवल्या जातात. पण किचन व्यतिरिक्तही गुळाचा काही उपयोग आहे का? असा विचार तुम्ही केला आहे का? नसेल तर आजपासून तुम्ही हा विचार करायला घ्या. कारण गुळाचा उपयोग हा स्किनकेअरमध्ये केला जातो. सुंदर त्वचा मिळवण्यासाठी गुळ हे अत्यंत गुणकारी असे मानले जाते. गुळाचा उपयोग करुन सुंदर त्वचा मिळते. ती कशी चला जाणून घेऊया या विषयीची अधिक माहिती

गुळामध्ये असतात हे घटक

गुळ आहे फारच फायद्याचे

गुळामध्ये न्युट्रिएंंडंस आणि सेलेनिन नावाचे घटक असते. जे त्वचेसाठी फारच फायद्याचे असते.  यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट घटक त्वचा चिरतरुण ठेवण्यास मदत करतात. त्यामुळेच गुळाचा उपयोग हा हल्ली अनेक जण स्किनकेअर रुटीनमध्ये करतात. उसापासून मिळणारा हा गुळ त्वचेसाठी अत्यंत लाभदायी असतो. या शिवाय गुळामध्ये असलेले ग्लायकोलिक ॲसिड हे देखील त्वचेवरील डाग, पिंपल्स घालवून त्वचा तजेलदार करण्यास मदत करते. 

असा करा गुळाचा वापर

गुळाचा त्वचेसाठी फायदा आहे हे कळल्यानंतर त्याचा वापर नेमका कोणत्या पद्धतीने करायचा हे देखील माहीत असायला हवे. गुळाच्या सेवनासोबतच तुम्ही तो चेहऱ्याला कसा लावायचा चला घेऊया जाणून 

  1. रोज एक गुळाचा खडा जर तुम्ही खाल्ला तर त्यामुळे तुमच्या शरीरात आवश्यक असलेले न्युट्रिएंड्स मिळतात. इतकेच नाही तर अनेकांना गुळाचे सेवन केल्यामुळे त्वचेवर झालेला बदल दिसून आला आहे. 
  2. स्किनकेअरमध्ये गुळाचा वापर करताना त्यापासून तुम्हाला एक चांगला फेसपॅकही बनवता येतो. तो बनवण्यासाठी एका भांड्यात चिरलेला गूळ आणि तेवढेच पाणी घेऊन गूळ विरघळून घ्यावा. त्यामध्ये बेसनाचे पीठ घालून त्याचा एक चांगला फेसपॅक बनवून घ्यावा. आणि तो चेहऱ्याला लावून 20 मिनिटांसाठी ठेवून द्यावा. चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. 
  3. एखाद्याला सतत पिंपल्स येत असतील तर अशांनी शरीरातील उष्णता कमी कऱण्यासाठी एक गुळाचा खडा खावा. असे सांगितले जाते की, गुळाचा एक खडा दिवसातून खाल्ल्यामुळे पिंपल्ससोबत लढण्याची ताकद शरीरात निर्माण होते. 
  4. चमकदार त्वचा हवी असेल तर एका भांड्यात एक चमचा मध, एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा गुळाची पावडर घेऊन सगळे साहित्य एकत्र करुन चेहऱ्याला लावावी.साधारण 10 मिनिटांपर्यंत ते त्वचेवर ठेवावे. त्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत मिळते. 
  5. त्वचेवर डाग असतील तर अशावेळी गुळाची पावडर घेऊन त्यात टोमॅटोचा रस घालून तो चेहऱ्याला लावावा. त्यामुळे त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत मिळते. 

गुळ हे उष्ण प्रवृत्तीचे आहे. चेहऱ्याला लावताना तुम्ही ते सतत लावणे चुकीचे आहे. इतकेच नाही तर ज्यांची त्वचा अति संवेदनशील आहे अशांनी त्याचा वापर करताना जपून करावा. 

ADVERTISEMENT
01 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT