अनेक घरगुती उपाय आहेत ज्यामुळे केस स्वच्छ आणि चमकदार राहण्यास मदत मिळते. पण शँपू हा सर्वात अधिक केसांसाठी योग्य मानला जातो. तसंच केसांना व्यवस्थित मॉईस्चराईझ करण्यासाठी कंडिशनरचादेखील नियमित वापर करण्यात येतो. आपल्या आयुष्यात केसांसाठी शँपू आणि कंडिशनर या दोन्ही गरजेच्या वस्तू झालेल्या आहेत. पण कधीतरी आपण इतके व्यस्त असतो की, केसांसाठी असणारा नियमित शँपू आणि कंडिशनर संपलेले असते. मग अशावेळी नक्की काय करायचे असा प्रश्न उपस्थित होतो. शँपू आणि कंडिशनर नव्हते तेव्हा पूर्वी वेगवेगळ्या नैसर्गिक उपायांनी केसांची काळजी घेतली जात होती. रिठा, राख, आवळा इत्यादीचा उपयोग करण्यात येत होता. पण आता याचा वापर करायचा झाला तर? नैसर्गिक स्वरूपात केस धुण्यासाठी कशाचा वापर करायचा ते आपण पाहूया. शँपू आणि कंडिशनर संपले असेल तर केस धुताना तुम्ही या गोष्टींचा वापर करू शकता.
बेकिंग सोड्याचा वापर (Use of Baking Soda)
बेकिंग सोडा हा बऱ्याचदा सौंदर्यासाठी वापरण्यात येतो. बेकिंग सोड्याचे अनेक उपयोग आहेत. अगदी चेहऱ्याला लावण्यापासून याचा उपयोग करण्यात येतो. पण काही जणांना बेकिंग सोड्याचा वापर करणे चुकीचे वाटते. पण तुमचा शँपू संपला असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता. तुमच्या स्काल्पमध्ये घाण साचून राहिली असेल अथवा तुम्ही ड्राय शँपूचा अथवा कोणत्याही उत्पादनाचा केसांवर अधिक वापर केला असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी बेकिंस सोड्याचा वापर करावा. पण लक्षात ठेवा याचा प्रमाणात वापर करावा. पहिल्यांदा तुम्ही 3 भाग पाणी आणि त्यात एक भाग बेकिंग सोडा मिक्स करून घ्या. त्यानंतर तुम्ही केसांवर याचा वापर करा. दोन मिनिट्स तसंच ठेवा आणि मग केस धुवा.
अॅपल साईड व्हिनेगर (Apple Cider Vinegar)
तुमचे केस खूपच खराब झाले असतील आणि त्यात खूपच तेल असेल तर तुम्ही बेकिंग सोड्यासह अॅपल साईडर व्हिनेगरचा वापर करू शकता. तुम्हाला त्यासाठी एक चमचा बेकिंग सोडा आणि 2 चमचे अॅपल साईडर व्हिनेगर मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर हे मिक्स्चर केसाला लावा. दोन मिनिट्स लावल्यावर स्काल्पचा मसाज करा आणि मग केस स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.
रीठा आणि शिकेकाई (Reetha and Shikakai)
शँपूऐवजी सर्वात चांगला नैसर्गिक उपाय म्हणजे रीठा आणि कंडिशनरऐवजी शिकाकाई योग्य काम करते. या दोन्ही पदार्थांचा वापर करून तुम्ही केसांना नैसर्गिक चमक आणून देऊ शकता. या दोन्ही गोष्टी तुम्ही रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी उठून याचा वापर करून केस धुवा. तुमचे केस नैसर्गिकरित्या अधिक घनदाट आणि चमकदार होतील. रीठ्यात नैसर्गिक फेस आणण्याची क्षमता असते जो स्काल्पची समस्या घालविण्यासाठी उपयोगी ठरतो. शिकेकाईचा उपयोग केसांसाठी नेहमीच उपयुक्त ठरतो. केस यामुळे कंडिशनरप्रमाणेच अगदी मऊ आणि मुलायम बनतात.
अंड्याच्या योकचा उपयोग (Egg Yolk)
आपण शँपूबाबत जेव्हा बोलतो तेव्हा त्याला जोडूनच आपण कंडिशनरचाही वापर करत असतो. कंडिशनरच्या जागी आपण कशाचा वापर करू शकतो याचा विचार केला तर अंडी ही नेहमीच केसांसाठी उपयुक्त मानण्यात आली आहेत. अंड्याचा योक केसांना अधिक चांगेल मॉईस्चर करण्यासाठी उपयोगी ठरते. तुम्ही केवळ थोडेसे अंड्याचे योक केसांना लावा आणि काही वेळात केस स्वच्छ धुवा. केसांना येणारा अंड्याचा दुर्गंध घालविण्यासाठी तुम्ही काही थेंब एसेन्शियल ऑईलचे पाण्यात मिक्स करा आणि त्या पाण्याने केसांवरून आंघोळ करा. केस धुतल्यावर तुम्ही अंड्याचा वापर करून घ्या.
कोरफड अशी वापरा (Aloe Vera Gel)
कंडिशनरच्या वापराबाबत जेव्हा आपण बोलतोय तेव्हा आपण कोरफड कसे विसरू शकतो? कोरफडमध्ये अँटीबॅक्टेरियल घटक असतात, जे केवळ स्काल्पमधून अतिरिक्त तेलच काढत नाहीत तर केसांना अधिक निरोगी आणि चमकदार बनविण्यास मदत करतात. केसांमध्ये कमी मॉईस्चर असेल तर कंडिशनरच्या जागी तुम्ही कोरफडचा नक्की वापर करावा. घनदाट केसांसाठी तुम्ही कोरफड जेलचा वापर करू शकता.
केसांची नैसर्गिक काळजी घेताना लक्षात ठेवा महत्त्वाच्या बाबीः
हे खरं आहे की आम्ही सांगितलेल्या पदार्थांनी तुम्ही सहज केस धुऊ शकता आणि अगदी सोप्या पद्धतीने केसांची काळजी शँपू आणि कंडिशनर नसताना घेऊ शकता. पण त्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे –
- काही जणांची त्वचा अत्यंत संवेदनशील असते. काही नैसर्गिक गोष्टींचा वापर केल्यानंतरही केसगळतीची समस्या होऊ शकते. तुम्हाला कोणताही त्रास असेल अथवा त्वचा अधिक संवेदनशील असेल तर तुम्ही हे वापरण्यापूर्वी आपल्या त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या
- पॅच टेस्ट केल्याशिवाय कोणतीही गोष्ट वापरू नका
- तुम्हाला कोणत्याही पदार्थांपासून अलर्जी असेल तर तपासून घ्या
- बेकिंग सोडा आणि अॅपल साईडर व्हिनेगर हे दोन्ही अॅसिडिक असतात. काही जणांच्या त्वचेला चालत नाही. यामुळे जळजळ होते. त्यामुळे आधीच हातावर वापरून पाहा
- हे सर्व नैसर्गिक पदार्थ आहेत आणि केस धुतल्यावर तुम्हाला शँपूप्रमाणे अगदी योग्य परिणाम मिळणार नाही. पण केस स्वच्छ होतील
- केस धुताना स्काल्प रगडून धुऊ नका
- नेहमी आपल्या केसांच्या टाईपनुसारच घटक वापरा
एका गोष्टीची नेहमी काळजी घ्या की, तुमच्या केसांना नक्की काय योग्य आणि काय अयोग्य आहे याची माहिती करून घ्या. त्यामुळे हेअर केअर रूटीन सांभाळणे सहज शक्य होते.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक