ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
जाणून घ्या पँटीज धुण्याची योग्य पद्धत How to wash panties

जाणून घ्या पँटीज धुण्याची योग्य पद्धत How to wash panties

इनरवेअर आपण शक्यतो सगळ्याजणी हातानेच धुवून टाकतात. पण अनेकींना अंडरगार्मेंट्स धुण्याची योग्य पद्धत माहीत नसते. ज्यामुळे अनेक इन्फेक्शन्सना आपण आमंत्रण देत असतो. असं आम्ही नाही अनेक डॉक्टर्सचं म्हणणं आहे. साधारणतः पावसाळ्यात अंडरगार्मेंट्स व्यवस्थित सुकत नाहीत आणि ते ओलसर राहतं. त्यावेळी बॅक्टेरिया आणि इन्फेक्शन्सची शक्यता वाढते. बरेचदा आपण आंघोळ करतेवेळी इनरवेअर धुऊन टाकतो. पण लक्षात घ्या जर पॅंटीज थंड पाण्याने धुतल्यास त्यातील बॅक्टेरिया नष्ट होत नाहीत. ज्यामुळे तुमची पँटी इन्फेक्टेड राहू शकते. जी घातल्यास परिणामी तुमच्या प्रायव्हेट पार्ट्सना संसर्ग होऊ शकतो.

तुमच्या प्रायव्हेट पा्र्ट्सच्या आसपासच्या भागात खाज, रॅशेस आणि काळेपणा यासारख्या समस्या नेहमी जाणवतात का?, मग यामागील कारण इन्फेक्टेड इनरवेअर किंवा पँटी असू शकतं.  विशेषतः पँटीवरील पिवळे डाग किंवा इतर डागांकडे दुर्लक्ष करू नका. हे डाग साबणाने, वॉशिंग पावडर आणि गरम पाण्याने काढण्याचा पूर्ण प्रयत्न करा. जर हे डाग निघत नसतील तर अशी पँटी वापरू नका. पण लक्षात ठेवा असे डाग काढण्यासाठी एसिड ब्लीचचा वापर अजिबात करू नका. 

*तुमची पँटी किंवा शॉर्ट्स नेहमी कोमट पाण्याने धुवा. जर तसं शक्य नसल्यास लॉन्ड्री सॅनिटायजरचा वापर करा.

ADVERTISEMENT

Shutterstock

अंडरगार्मेंट्स किंवा पँटी धुण्यासाठी काही खास टिप्स

  • नेहमी वापरात असलेल्या अंडरगार्मेंट्सना रोजच्या रोज धुणं गरजेचं आहे. कारण या पँटीज किंवा अंडरगार्मेंट्सचा तुमच्या त्वचेशी थेट संबंध येत असतो. त्यामुळे या गोष्टी स्वच्छ आणि हायजेनिक असणं खूप गरजेचं आहे. 
  • अनेक वेळा आपण अंडरगार्मेंट्स रोज धुण्याचा कंटाळा करतो आणि हे कपडे वॉशिंग मशीनमध्ये इतर कपड्यांसोबत टाकतो. पण हे करणं योग्य नाही. खरंतर अंडरगार्मेंट्स कधीच इतर कपड्यांसोबत धुवू नये. कारण यातील अनेक इंफेक्शन्स इतर कपड्यांवर पसरू शकतात. त्यामुळे शक्यतो प्रयत्न करा की, अंडरवेअर, ब्राज आणि शॉर्ट्स हातांनी धुवून टाकावे. काही कारणास्तव हे शक्य नसल्यास ते थेट मशीनमध्ये न टाकता मेश वॉशिंग बॅग्ज्समध्ये भरून वेगळे धुवा. 
  • सर्व अंडरगार्मेट्स तुम्ही एकाच दिवशी वॉशिंग मशीनला लावून इतर कपड्यांपासून वेगळं धुवू शकता. याचा फायदा म्हणजे तुम्ही वॉशिंग मशीन आणि ड्राईंग टबचा स्पीड मॅनेज करू शकता. तसंच गरम पाण्याचा ऑप्शन निवडून हे कपडे त्या पाण्यात धुवू शकता.  
  • लक्षात ठेवा अंडरगार्मेंट्स नेहमी हलक्या उन्हात सुकवावे. ज्यामुळे यातील इन्फेक्शन्स दूर होतील. 
    तसंच कोणत्याही अंडरगार्मेंटला धुताना सर्वात आधी त्यावरील धुण्यासंबंधीच्या सूचना नक्की वाचा.

Shutterstock

ADVERTISEMENT

त्यामुळे पुढच्या वेळी अंडरगार्मेंट्स धुताना ही काळजी नक्की घ्या. 

हेही वाचा –

*परफेक्ट इनरवेअरची निवड* करणे अजूनही जाते कठीण, मग वाचाच

तुमचे इनरवेअर्स ‘एक्सपायर्ड’ झाले आहेत का? जाणून घेण्यासाठी वाचा

ADVERTISEMENT

तुमच्याकडे असायलाच हव्यात ‘या’ 8 पँटीज!

25 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT