साडी नेसणं खूप जणांना आवडते. पण साडी नेसताना ती चापून चोपून बसायला हवी असे अनेकांना वाटते. खूप जणांना साड्या खूप छान नेसता येतात. तर काहींना अजूनही साडी कशी नेसायची हे नीट कळत नाही. तुम्हाला साडी नेसायला आवडत असेल पण सोशल मीडियावर पाहिलेली किंवा साऊथ इंडियन पद्धतीने नेसलेल्या साड्या तुम्हाला आवडत असतील तर या साड्या प्री प्लेटिंग साड्यांच्या पद्धतीमध्ये येतात. सध्या या साड्यांचा चांगलाच ट्रेंड सुरु आहे. प्री प्लेटिंग साड्या या चापून चोपून नेसण्यासाठी फारच उत्तम आहेत. प्री प्लेटिंग साडी कशा पद्धतीने ड्रेप करायची ते जाणून घेऊया
प्री प्लेटिंग साड्या अशा करा तयार
तुम्हाला एखाद्या कार्यक्रमासाठी साडी नेसायची असेल तर या साडीची तयारी तुम्हाला आदल्या दिवशी करता येऊ शकते. तुम्ही जी साडी नेसणार आहात ती साडी तयार करुन ठेवण्यासाठी तुम्हाला या काही गोष्टी कराव्या लागतील. साड्यांचे प्रकार निवडतानाही तुम्ही काही काळजी घ्यायला हवी
साहित्य: तुम्ही निवडलेल साडी, साडी पिना, इस्त्री, इस्त्रीचा खास बोर्ड, क्लीप
- साडी प्री प्लेटिंग करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी साडीचा पदर काढायचा असतो. त्यासाठी तुम्हाला इच्छित असलेल्या साडीची उंची घ्या. नेहमीप्रमाणे साडीच्या प्लेट्स काढा. साडीच्या वरची प्लेट ही मोठी असायला हवी. त्यानंतर बारीक पदर काढून तुम्हाला साडीचा पदर काढायचा आहे.
- साडीच्या सगळ्यात शेवटच्या टोकाला म्हणजे पदराच्या कोपऱ्याला तुम्हाला पीन लावायचा आहे. त्यानंतर एका टेबलच्या टोकाला तुम्हाला क्लीप लावायचे आहे. हा क्लीप लावल्यानंतर तुम्हाला पदराचा एक एक भाग नीट करायचा आहे. आता तुम्हाला तो किती लांब हवा आहे. त्यानुसार तुम्ही पदरामध्ये गॅप ठेवून वरुन इस्त्री करायची आहे.
- आता खूप जणांना प्रश्न पडला असेल की,निऱ्या कशा काढायच्या तर तुम्हाला साडीचे दुसरे टोक घेऊन कंबरेचे माप घ्यायचे आहे. त्याहून सहा-सात बोटे सोडून तुम्हाला निऱ्या काढायला घ्यायच्या आहेत. निऱ्या काढून झाल्यानंतर त्यामध्येही थोडा थोडा गॅप ठेवून तुम्हाला पीन लावून वरुन खाली इस्त्री करायची आहे.
- आता ही साडी तुम्हाला फोल्ड देखील करता येऊ शकते.याचे खास फोल्डींग करण्यासाठी तुम्हाला नीऱ्यांचा भाग टेबलकडे उलटे ठेऊन तुम्हाला उरलेली साडी अर्धे अर्धे फोल्ड करायचे आहे. पदराचा भाग हा सगळ्यात शेवटी तुम्हाला वर घ्यायला आहे.
- आता ही फोल्ड केलेली साडी तुम्हाला कधीही नेसता येऊ शकते.खूप घाई असेल अशावेळी तुम्हाला या साड्या नेसता येऊ शकतात.
इन्स्टंट साडी नेसताना
आता अशा ड्रेप केलेल्या साड्या कोणालाही नेसवताना तुम्हाला काही खास गोष्टींची काळजी घ्यायला लागत नाही.
पण साडी सोडून सगळ्यात आधी तुम्ही साडी नेहमीप्रमाणे खोवायला घ्या. पदराचा भाग डाव्या खांद्यावर घेऊन हवा तसा सेट करुन घ्या. त्यानंतर निऱ्यांचा भाग नीट लावून घ्या. निऱ्या नीट लावून घेतल्यानंतर तुम्हाला जिथे पीन अप्स करायचे आहेत ते पीन अप करुन घ्या.
आता अशा पद्धतीने pre pleating saree ठेवून तुम्ही जेव्हा हवी तेव्हा साडी नेसू शकता.
ब्लाऊज शिवण्याआधी लक्षात ठेवा या 5 गोष्टी
कंबर असेल मोठी तर नेसा अशी साडी, दिसाल बारीक