काही जणांचे फोटो पाहिल्यानंतर आपले फोटो असे कधीच का येत नाही, असे तुम्हालाही वाटत असेल तर आजचा विषय तुमच्यासाठी खास आहे. जसे वेगवेगळ्या गोष्टी परफेक्ट होण्यासाठी काही शिष्टाचार असतात. अगदी तसेच काही शिष्टाचार फोटोंच्या बाबतीतही असतात. कॅमेरा कोणताही असला तरी तुम्ही शिष्टाचार पाळले की, तुमचे फोटो अगदी परफेक्ट येणार. आता हे शिष्टाचार म्हणजे फोटोंसाठी असलेल्या पोझ आहेत बरं का! फोटो काढताना तुम्ही नेमक्या कशा पोझ द्यायला हव्यात या विषयीच आपण माहिती घेणार आहोत. करुया सुरुवात
असा ब्लाऊज शिवल्यास जाड हातही दिसतील बारीक
हसा लेको
- खूप जणांची फोटो काढतानाची पहिली समस्या असते ती म्हणजे ‘स्माईल’ त्यांचे हसू कितीही चांगले असले तरी नेमकं फोटो काढताना त्यांना हसू येत नाही किंवा मग अर्धवट हसू फुटतं किंवा काहींचे दातच दिसतात. तर काही अगदी जबरदस्ती ओठांची नाव करुन हसतात. पण असे करु नका.
- हल्ली प्रत्येकाकडे सेल्फी कॅमेरे आहेत. तुम्हाला तुम्ही कोणत्या स्माईलमध्ये चांगले दिसता हे पाहण्यासाठी त्याची मदत घेता येईल. तुमच्या हसण्याचे फोटो काढा तुम्हालाच लक्षात येईल की, तुम्ही नेमकं कधी छान हसता ते.
- आता ते लक्षात येत नसेल तर तुम्ही फोटोच्या प्रसंगानुसार हसायला शिका. मित्रांसोबत फोटो काढताना तुमचे दात दिसले तरी चालतात. त्यावेळी तुमचे हसणे खळखळून हवे. ऑफिस किंवा फॉर्मल कार्यक्रमांमध्ये तुम्ही स्मित करु शकता आणि मॉडेलिंग किंवा सोलो फोटो काढताना तुम्ही तुमची बेस्ट स्माईल निवडा.
- आता ही बेस्ट स्माईल निवडायची कशी हे तुम्हाला आम्ही सांगितले आहे. स्वत:चे परिक्षण केल्याशिवाय तुम्हाला ते समजणार नाही. कधी कधी तुमचा नॅचरल लुक म्हणजे कोणत्याही स्माईलशिवायही चांगला दिसू शकतो. पण तो कॅनडीड फोटोमध्ये पण काहीजण सगळ्याच फोटोमध्ये उदास असतात. त्यामुळे तुमचा फोटो आकर्ष करणाऱ्या या स्माईलकडे सगळ्यात आधी लक्ष केंद्रीत करा.
फेस्टिव्ह सीझनमध्ये बदला ड्रेसिंग स्टाईल आणि दिसा Slim Trim
सावधान! सोडा
- फोटोसाठी उभे राहायचे म्हणजे काही जण अगदी सावधान! म्हटल्यासारखे उभे राहतात. त्यामुळे तुम्ही काहीतरी वेगळेच उभे आहात हे फोटोतून लक्षात येते.
- फोटोसाठी उभे राहताना तुम्हाला पोक काढायचा नाही. पण तुमचे शरीर ग्रेसफुल दिसायला हवे. यासाठी हात, पाय आणि पाठीचा कणा फारच महत्वाचा आहे.
- हात सरळ खाली सोडण्यापेक्षा प्रसंगानुरुप म्हणजे मॉडेलिंग किंवा तत्सम फोटोमध्ये हात कंबरेवर ठेवा( त्यामुळे तुमची कंबरही लहान दिसते.) एक हात कंबरेवर आणि दुसरा हात चेहऱ्याच्या दिशेने किंवा हवेत ग्रेसफुल ठेवा. आता ऑफिससाठी फोटो काढताना दोन्ही हात खाली नेत ते पकडा. पण ही पकड घट्ट नको.
- प्रवासात फिरायला गेल्यानंतर अनेकदा आपण वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो काढतो. त्यावेळी ही हातांचा उपयोग योग्य करा. तुमचे हात तुमच्या अवयवाचा एक भाग आहे असे भासवू नका. त्यांचा सुदंर वापर करा.
उंच दिसण्यासाठी करा 10 tips and tricks!
दिसा उंच
- तुम्ही काही सेलिब्रिटींचे फोटो पाहिले असतील तर तुम्हाला अंदाज येईल की, ही लोक इतकी उंच उंच कशी दिसतात. आता सगळ्याच अभिनेत्री किंवा सगळेच अभिनेते काही खूप उंच आहेत असे नाही. पण त्यांची फोटोच्या वेळी पोझ देणे त्यांना त्या फोटोसाठी उंच करुन जाते.
- तुम्हालाही फोटोमध्ये उंच दिसायचे असेल तर तुम्हाला पोक काढून चालणार नाही. खूप जणांना फोटोमध्ये उगाच वाकण्याची सवय असते. अशी सवय तुम्हाला असेल तर ती आताच सोडा.
- जर तुमची उंची कमी असेल तर तुम्ही अजिबात इतरांना तुमच्या खांद्यावर हात ठेऊ देऊ नका. कारण त्यामुळे तुम्ही फार बुटके असाल असे वाटेल. तुम्हाला उंच दिसायचे असेल तर एक पाय हलका पुढे घ्या. पुढे घेतलेला पायाची टाच वर करुन चौड्यावर राहा. त्यामुळे तुम्ही उंच दिसता. बसून फोटो काढतानाही एक पाय नेहमी थोडा पुढे ठेवा.
- समोर बसण्यापेक्षा थोडे तिरके बसा. त्यामुळे तुमचे पायही लांब दिसतील. आता त्यामध्येही तुम्ही विविधता आणू शकता.
आता फोटो काढताना या काही टिप्स लक्षात ठेवा म्हणजे तुमचे फोटो नेहमीच चांगले येतील.