उंच दिसण्यासाठी करा 10 tips and tricks!

उंच दिसण्यासाठी करा 10 tips and tricks!

दीपिका पादुकोण, शिल्पा शेट्टी अथवा सुष्मिता सेन यासारख्या हिरॉईन्स पाहिल्यानंतर आपल्यालाही वाटतं कदाचित आपण पण इतके उंच असतो तर! पण काही गोष्टी नक्कीच आपल्या हातात नसतात. आपण कितीही प्रयत्न केला तरी नैसर्गिकरित्या जी उंची आपल्याला मिळालेली असते तीच खरी. पण आम्ही तुम्हाला उंच कसं दिसावं यासाठी काही टीप्स आणि ट्रिक्स सांगणार आहोत. तुमच्या ड्रेसिंग सेन्समध्ये असे काही बदल करा की, तुम्ही उंच दिसाल. यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.


1. फुटवेअर


nude high heels
न्यूड रंगांच्या पॉईंटेड हिल्स तुम्हाला उंच दाखवू शकतात. तुमच्या पायाचा आणि हिल्सचा रंग सारखा असल्यामुळेच continuity राहते आणि तुम्ही उंच असल्याचा भास समोरच्याला होत राहातो. लक्षात ठेवा की, फुटवेअर अर्थात चप्पल पॉईंटेड असेल तरच तुमची उंची दिसून येईल. पॉईंटेड शेप तुम्ही उंच असल्याचा भास निर्माण करतात. एका गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायला हवी की, तुम्ही अशी कोणतीही चप्पल घालून नये ज्याचे स्ट्रेप तुमच्या टाचांवर असतील. टाचा स्ट्रेप्स लेग्सला विभागतात. त्यामुळे तुम्ही उंचीने लहान दिसता. त्यामुळे अँकल स्ट्रेपला तुम्ही मोठा नकार द्यायला हवा.


 


2. स्ट्राईप्स


stripes
व्हर्टिकल स्ट्राईप्स तुम्हाला एकदम बारीक आणि उंच दर्शवतो. तुम्ही व्हर्टिकल स्ट्राई्प्सवाल्या पँट्स, स्कर्ट्स अथवा कोऑर्डिनेटेड पिसेस घालू शकता. कधीही वाकड्या लाईन्स असणारे कपडे घालू नका. त्यामुळे तुमची उंची कमी दिसते. हे नेहमी लक्षात ठेवा.3. बारीक बेल्ट


belt


जेव्हा कधी तुम्हाला बेल्टचा वापर करावा असं वाटत असेल तेव्हा बारीक बेल्टचा वापर करा. बेल्ट बारीक असल्यामुळे तो कमी जागा व्यापतो आणि तुमचे पाय लांब वाटतात.त्यामुळे तुम्ही एम्पायर लाईनवर बेल्ट घालत असाल तर बारीक बेल्ट तुमचे पाय लांब दाखवण्यास फायदेशीर आहे.4. व्ही - नेकलाइन


v neckline


टॉप, ड्रेस अथवा कुरता यापैकी काहीही व्ही - नेकलाईन आकारात तुम्ही घातलंत तर तुम्ही उंच आणि बारीक दिसाल. व्ही - नेक डोळ्यांना व्हर्टिकल लाईन देतात ज्यामुळे तुम्ही उंच असण्याचा भ्रम समोरच्या माणसाला होतो. त्यामुळे तुमच्या वॉर्डरोबमध्ये व्ही - नेकलाईनचे काही कपडे नक्की समाविष्ट करून घ्या.5. मोनोक्रोमेटिक कलर


तुम्ही जर मोनोक्रोमेटिक रंग घातलात तर एकदम उंच दिसू लागाल. कारण मोनोक्रोम रंग हा एक लांब व्हर्टिकल लाईन बनवतो आणि तुम्ही उंच असण्याचा भ्रम तयार करतो. लांब मॅक्सी ड्रेस जम्पसूट, कोऑर्डिनेटेड पिसेस अथवा साडी हे सर्व मोनोक्रोमेटिक रंगामध्ये सोप्या पद्धतीने तुम्ही घालू शकता.6. बॅग्ज


sling bag


तुम्हाला उंच दिसायचं असेल तर तुम्ही मोठ्या बॅग्ज घेऊ नका. कारण मोठ्या बॅग्जमुळे तुम्ही उंचीने अजून लहान दिसता. त्याऐवजी तुम्ही लहान स्लिंग बॅग्ज, लहान क्रॉस-बॉडी बॅग्ज अथवा हँडबॅग्ज वापरा.7. हाय-लो हेमलाईन


तुम्ही तुमच्या टोर्सो (कमरेच्या वरचा भाग) उंच दाखवण्यास उत्सुक असाल तर, तुम्ही हाय - लो हेमलाईनचे टॉप घालायला हवेत. यामुळे केवळ तुमचे टोर्सो लांब नाही दिसणार तर तुमच्या पायांकडेही लक्ष जाईल आणि पाय लांब दिसतील. त्यामुळे हे दोन्हीकडून तुमच्यासाठी चांगलं आहे.8. हाय वेस्ट पँट्स


hiwaiste pants


उंच आणि बारीक दिसण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे. तुम्हाला कदाचित वाटेल की, हे इतकं आवश्यक का आहे?? हाय वेस्ट पँट्स हाय वेस्ट पेन्सिल स्कर्ट हे तुमच्या हिप्सना चांगल्या प्रकारे कव्हर करतात आणि त्यामुळे तुमचा बॉटम पार्ट हा जाड दिसत नाही. कारण हे कमरेच्या वरपर्यंत जाते त्यामुळे नैसर्गिकरित्या तुमचे पाय लांब वाटू लागतात आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे ही प्रत्येक आकाराच्या माणसावर चांगली दिसते. ही पँट हिल्सबरोबर घालणं तुम्हाला अधिक स्टायलिश बनवतं. 3/4 अथवा कॅप्री नेहमीच तुमची उंची कमी दाखतात. तुम्ही जेव्हा शॉर्ट्स घालणार असाल तेव्हा हेम फोल्डेड शॉर्ट्सच निवडा. कारण यामध्ये तुमची उंची कमी दिसत नाही.


9. स्लिट


तुमच्या कपड्यांमध्ये स्लिट अशी एक गोष्ट आहे जी तुमच्या लुकमध्ये खूपच मोठा फरक आणते. तुमच्या मॅक्सी ड्रेस, पेन्सिल अथवा फिटेड स्कर्टमध्ये स्लिट असेल तर तुमचे पाय खूपच लांब दिसतात. कुरत्यामध्ये स्लिट असल्यासही तुम्ही उंच दिसता. त्यामुळे तुमचे कपडे निवडताना आणि शिऊन घेताना त्यामध्ये स्लिट आहे की नाही याची काळजी नक्की घ्या.


10. Puff-it-up - हेअरस्टाइल


bun


तुम्ही तुमचे केस कसे बांधता तेदेखील महत्त्वाचं आहे. तुमच्या हेअरस्टाईलमुळेदेखील तुमची उंची वाढू शकते. पफबरोबर पोनीटेल घातल्यास अथवा नॉट बांधल्यास, तुमची उंची वाढू शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात ही हेअरस्टाईल नक्कीच करून बघा.


फोटो सौजन्य - Shutterstock, Instagram 


हेदेखील वाचा - 


कम्फर्टेबल आणि सेक्सी 5 ब्रा, प्रत्येक महिलेकडे असायलाच हव्या


तुमच्या वॉर्डरोबमध्ये नक्की असायला हवेत डेनिमचे ‘हे’ आऊटफिट्स


तुमच्या वॉडरोबमध्ये असायलाच हव्यात या गोष्टी!