ADVERTISEMENT
home / आरोग्य
ideal gap between two pregnancies

पहिल्या आणि दुसऱ्या बाळाच्या जन्मात नेमकं किती अंतर असावं

लग्नानंतर कधी बाळाला जन्म द्यायचा अथवा किती मुलांना जन्म द्यायचा हे प्रत्येक जोडप्याचा खाजगी निर्णय असतात. मात्र बऱ्याचदा प्रेगनन्सी अनप्लान्ड असते. ज्यामुळे दोन मुलांच्या जन्मामध्ये योग्य ते अंतर ठेवता येत नाही. पहिल्या बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्या बाळाचा निर्णय नक्कीच विचारपूर्वक घेता येतो. कारण दोन बाळंतपणात योग्य अंतर नसेल तर त्याचे दुष्परिणाम पुढे त्या स्त्रीला भोगावे लागतात. यासाठीच प्रत्येक जोडप्याला  दोन मुलांच्या जन्मामध्ये कितीअ अंतर असावं हे माहीत असायला हवे. 

गर्भधारणेदरम्यान सुरुवातीच्या काळातच पोटात कळा येण्याची कारणे, तज्ज्ञांचे मत

पहिल्या बाळाच्या जन्मानंतर सहा महिन्यात दुसरे गरोदरपण असेल तर –

ज्या महिला तिशीनंतर आई व्हायचा  निर्णय घेतात त्यांच्याकडून ही चूक होण्याची शक्यता अधिक असते. कारण वाढत्या वयामुळे त्यांना दुसऱ्या बाळाच्या जन्माचा निर्णय लगेच घ्यायचा असतो. चाळीशीनंतर त्याची प्रजननक्षमता कमी होणार असल्यामुळे त्या सहा महिन्याच्या आत दुसऱ्या बाळंतपणासाठी तयार होतात. मात्र हा निर्णय कोणत्याही स्त्रीच्या आरोग्यासाठी मुळीच हिताचा नाही. बाळंतपणामध्ये स्त्रीच्या शरीराची खूप झीज झालेली असते. शरीरात लोहाचे प्रमाण कमी असते. अशा वेळी दुसऱ्या बाळाच्या पोषणासाठी शरीर मुळीच सज्ज नसते. असा निर्णय घेतल्यास बाळ प्रिमॅच्युअर डिलिव्हरी, गरोदरपणात बाळाचे वजन कमी असणे अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. मातृत्वानंतरचे मानसिक आरोग्य, नैराश्याची कारणे आणि उपाय (Postpartum Depression In Marathi)

दोन प्रेगनन्सीमध्ये किती असावे अंतर –

जर पहिल्या बाळाच्या जन्मानंतर तुम्हाला लगेच दुसऱ्या बाळाच्या जन्माचा निर्णय घ्यायचा असेल तर दोन प्रेगनन्सीमध्ये काही ठराविक काळाचे अंतर असायला हवे. अशा वेळी तुम्ही अठरा ते तेविस महिने म्हणजेच दीड ते दोन वर्षांचे अंतर ठेवू शकता. कारण या काळात आईच्या शरीराची झालेली झीज पुन्हा भरून निघते आणि बाळ आणि आईसाठी दुसरे बाळंतपण सुखरूप ठरते. शिवाय जर तुमचं पहिलं मुल थोडं मोठं असेल तर तुम्ही तुमच्या दुसऱ्या  बाळाचे गरोदरपण आणि त्याचे संगोपन योग्य पद्धतीने करू शकता. गरोदरपण आणि बाळंतपण हे खर्चिक निर्णय असल्यामुळे या दोन वर्षात तुम्ही हे अतिरिक्त खर्च योग्य पद्धतीने नियोजित करू शकता. दोन वर्षांपेक्षा जास्त अंतर देखील असू नये कारण असं असेल तर मोठे मुल लहान मुलाचा तिरस्कार करण्याची शक्यता असते. यासाठी थोडक्यात सर्व बाजूने विचार केल्यास दोन बाळंतपणात कमीत कमी दोन वर्षांचे अंतर असणे सर्वच बाबतीत योग्य ठरते. 

ADVERTISEMENT

तान्ह्या बाळाला सतत शिंक येणे आहे का नॉर्मल, जाणून घ्या उपाय

25 Aug 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT