पार्टी करण्यासाठी सध्या काही कारण लागतंच असं नाही. ख्रिसमस, नवे वर्ष आणि मग एकामागोमाग एक सण. काही ठिकाणी पार्टी म्हटलं की, अल्कोहोलचे प्रमाण अधिक पाहिले जाते. सणामध्ये खाण्यामुळे तर वजन वाढतेच. पण त्याशिवाय अल्कोहोल पिण्यामुळेही वजन वाढते. पण सर्वात जास्त परिणाम याचा होतो तो म्हणजे त्वचेवर. हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. पण अगदी डॉक्टरांच्या सांगण्यानुसारही, अल्कोहोलमुळे त्वचेवर परिणाम होतो. तुम्हीही अधिक अल्कोहोल घेत असाल तर तुमच्या त्वचेवर वाईट परिणाम होतो. नक्की हा परिणाम काय आहे ते पाहूया.
अल्कोहोलचा स्किनवर होणारा परिणाम (impact of alcohol on skin)
आपण सर्वात पहिले पाहूया की, आपल्या त्वचेवर अल्कोहोलचा नक्की कसा आणि काय परिणाम होतो –
त्वचेचा कॅन्सर होण्याचा धोका – काही रिसर्चनुसार, अति अल्कोहोलच्या सेवनामुळे त्वचेचा कॅन्सर होण्याचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत अजूनही अभ्यास करणे चालू आहे. मात्र तरीही अल्कोहोलमुळे तुमच्या त्वचेला अधिक त्रास होतो
त्वचा लवकर म्हातारी दिसू लागते – त्वचेवर सुरकुत्या, त्वचा निघणे यासारख्या समस्या होतात. तसंच तुम्ही वयापेक्षा लवकर म्हातारे दिसू लागता. त्यामुळे अल्कोहोलचे सेवन हे त्वचेसाठी अत्यंत हानीकारक ठरते. तसंच तुमच्या चेहऱ्यावर आणि संपूर्ण शरीरावर अल्कोहोल सेवनामुळे ब्लोटिंग, सूज येणे, त्वचेवर लालसरपणा येणे आणि अन्य त्वचेच्या समस्याही होताना दिसून येतात
स्किन ट्रिटमेंटचा होत नाही उपयोग – जर तुम्ही अल्कोहोल नियमित पित असाल तर तुमच्या त्वचेसाठी तुम्ही कोणतीही ट्रिटमेंट अथवा उपचार करत असाल तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे त्वचेचे उपचार घेत असाल तर अल्कोहोलचे सेवन करणे योग्य नाही. त्यामुळे त्वचेवर कोणताही परिणाम होऊ शकत नाही.
अल्कोहोलचा त्वचेवर प्रत्यक्ष होणारा परिणाम
त्वचेवर याचे अनेक परिणाम होत असतात. पण अल्कोहोलचा त्वचेवर प्रत्यक्ष परिणाम होतो. याचा नक्की काय परिणाम आहे पाहूया –
- अल्कोहोल शरीरात गेल्यावर एका केमिकलप्रमाणे काम करू लागते आणि याचा प्रत्यक्ष परिणाम होतो तो आपल्या डीएनए (DNA) वर. हेच कारण आहे ज्यामुळे अल्कोहोल शरीरात गेल्यानंतर रिपेअर प्रोसेस अत्यंत हळू होते
- तसंच अल्कोहोल शरीरातील नैसर्गिक अँटिऑक्सिडंट सिस्टिमवर त्वरीत परिणाम करते. ज्यामुळे फ्री रॅडिकल डॅमेज होतात. कारण याचा आपल्या त्वचेवर परिणाम दिसून येतो. तुमची त्वचा अधिक म्हातारी दिसू लागते. इतकंच नाही तर याचा इम्यून सिस्टिमवरदेखील परिणाम दिसून येतो
- याचा अधिक परिणाम होतो तो जर तुम्ही अल्कोहोलसह सिगारेटचेही सेवन करत असाल तर अल्कोहोल पिण्यामुळे नैसर्गिक विटामिन ए ची लेव्हल कमी होते आणि सेल ग्रोथ आणि त्याच्या कामावर याचा अधिक वाईट परिणाम होतो
अल्कोहोलचा अप्रत्यक्षपणे होणारा परिणाम
आता आपण त्या गोष्टी जाणून घेऊया, ज्याचा परिणाम अल्कोहोलमुळे तर होतो. पण त्यासह अन्य कारणंही असू शकतात
- डिहायड्रेशनमुळे त्वचा अधिक कोरडी दिसते आणि सुरकुत्या लवकर येतात
- झोपेच्या कमतरतेमुळेही त्वचेची समस्या होते
- सनबर्नची समस्यादेखील होते, तुम्ही अधिक काळ उन्हात राहिल्यास, त्वचेची समस्या होते
- अल्कोहोलसह तुम्ही जेवण जेवल्यास, त्वचेवर त्याचा वाईट परिणाम होतो
- अल्कोहोलचे अधिक सेवन केल्यास, लिव्हरची समस्या निर्माण होते आणि त्याचा त्वचेवर परिणाम दिसून येतो
कसे वाचाल तुम्ही या समस्येपासून
या समस्येच्या बाबतीत एकच पर्याय आहे तो म्हणजे तुम्ही अल्कोहोल पिणं कमी करणं. आठवड्यात तुम्ही मर्यादेपेक्षा अधिक अल्कोहोल पिऊ नये हे ठरवून घ्या. तुम्हाला एखाद्या ठिकाणी पार्टीसाठी जायचं असेल तर तुम्ही प्रयत्न करा की, एकापेक्षा अधिक ड्रिंक तुम्ही पिऊ नका. तसंच सिगारेटपासून तुम्ही दूर राहा. तसंच तुम्हाला अल्कोहोलमुळे कोणतीही समस्या येत असेल तर तुम्ही डॉक्टरांना संपर्क साधावा. दारू सोडविण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक