प्रत्येक हिंदू घरात धूप लावण्याची पद्धत आहे. संध्याकाळी दिवाबत्ती करुन धुपारती अनेकजण करतात.धूप लावल्यानंतर येणारा मंद सुवास सगळ्यांनाच प्रसन्न करतो. पण धूप लावण्यामागची कारण तुम्हाला माहीत आहेत का? जर तुम्हाला ही कारणं माहीत नसतील तर तुम्ही सगळ्यात आधी धूप लावण्याचे फायदे जाणून घेतले पाहिजे. म्हणूनच आज आपण धूप लावण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. कारण धूप लावण्याचे फायदे तुम्हाला आश्चर्यचकीत करतील आणि तुम्ही ही सवय नक्कीच आचरणात आणाल
धूपामध्ये काय असते?
घरी पूजा असेल किंवा गणेशोत्सवाच्या दिवसात आपण जे पूजा साहित्य आणतो त्यामध्ये अगदी आवर्जून धूप आणले जाते. तुम्ही जर धूप जाळला असेल तर तुम्हाला त्यामध्ये वेगवेगळे सुगंध नक्कीच जाणवतील. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे धूप मिळतात. गुग्गल धूप,लोबान धूप, कपूर धूप असे काही प्रकार मिळतात. धूपामध्ये शेण, चंदन, नागरमोथा, लाल चंदन, जटामसी, चंदन किंवा केवडा तेल, लाकडाचा कोळसा, कापूर असे घटक असतात.
वाचा – केसांना कापूर तेल लावण्याचे हे आहेत फायदे
धूपाचे आश्चर्यकारक फायदे
Loban Dhoop Benefits In Marathi
धूप लावावा असे म्हटले जात असताना धूपाचे फायदे काय ते देखील तुम्हाला माहीत हवे नाहीत का? जाणून घ्या धूपाचे आश्चर्यकारक फायदे
- धूप जाळल्यामुळे घरातील नकारात्मक उर्जा कमी करण्यास मदत होते.
- धूपामुळे आजारपण कमी होते.
- धूपामुळे मन:शांती मिळते.
- तुमच्या घरात जर तणावाचे वातावरण असेल अशावेळी तुम्हाला कोणता मार्ग सुचत नसेल अशावेळी तुम्ही धूप लावला तर तुमचे चित्त थाऱ्यावर येईल. तुम्हाला अडचणीत मार्ग काढण्यास मदत मिळेल.
- जर तुमच्यावर कामाचा अतिरिक्त ताण असेल अशावेळी तुम्ही घरात कापूर लावून शांत बसलात तर तुम्हाला रिलॅक्स वाटेल.
धूपाचे वेगळे प्रकार आणि ते कधी लावायचे या बद्दलच्या कल्पना
Dhoop Benefits In Marathi
आता बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे धूप मिळतात. लोबान, गुग्गल, कपूर लवंग, गायत्री धूप असे वेगवगळे प्रकार बाजारात मिळतात. पण हे धूप कधी लावायला हवेत यामागेही काही शास्त्रीय कारणं सांगितली जातात ती जाणून घेऊया.
लोबान धूप : जर काही मानसिक आजारांनी तुम्ही त्रस्त असाल किंवा तुम्हाला लोबान धूप लावण्याचा सल्ला दिला जातो. शनिवार- रविवार लोबान धूप लावण्यास सांगितले जाते. पण योग्य सल्ला घेतल्याशिवाय तुम्ही या धूपाचा वापर करु नका.
गुग्गल धूप : घरात सतत भांडणं होत असतील आणि तुम्हाला त्यापासून सुटका हवी असेल तर तुम्ही गुग्गल धूप लावायला हवे. अनेकदा घरात पूजा केली जाते तेव्हा गुग्गल धूप लावले जाते.
कापूर आणि लवंगाचे धूप:वास्तूदोष असतील तर घरात अनेक समस्या येऊ शकतात असे अनेक जण म्हणतात. तुम्हाला यावर विश्वास असेल आणि तुम्हाला कोणी वास्तूदोष सांगितला असेल तर तुम्ही कापूर आणि लवंगाचे धूप लावायला हवे.
गायत्री केशर:तुमच्या घरात सतत कोणीतरी आजारी पडत असेल तर तुम्हाला गुग्गल धूपमध्ये गायत्री केशर घालता येतील. घरात असे धूप जाळून तुम्ही आजारांवर निवारण करु शकता.
आता तुम्हाला धूपाचे फायदे कळले असतील तर तुम्ही त्याचा वापर आजपासूनच सुरु करा.