घरात पूजा आणि धार्मिक विधींसाठी कापूर वापरण्यात येतो. कापूर जाळणे आरोग्यासाठी हितकारक असल्यामुळे प्रत्येक भारतीय घरात कापूर असतोच. कापराच्या सुंगधामुळे आणि औषधी गुणधर्मांमुळे जीवजंतूंचा नाश होतो आणि घरातील वातावरण प्रफुल्लित होते. कोरोनाच्या काळात भीमसेनी कापूर प्रत्येकाने विकत घेतला असेलच. कापराचा सुवास जसा घरातील वातावरण प्रसन्न करतो तसंच तुमच्या केसांचेही आरोग्य वाढवू शकतो. कापरामध्ये असलेल्या औषधी घटकांमुळे तुमचा स्काल्पला इनफेक्शन होण्याचा धोका कमी होतो ज्यामुळे केसांच्या अनेक समस्या आपोआप कमी होतात. कापूराचा वापर केसांवर करण्यासाठी आधी तुम्हाला त्याच्यापासून तेल बनवावे लागेल. यासाठी जाणून घेऊ या कापूर तेल कसे तयार करावे.
Shutterstock
कापूर तेल तयार करण्याची सोपी पद्धत -
साहित्य -
चार ते पाच कापूर वड्या
दोन चमचे नारळाचे तेल
कापूर तेल तयार करण्याची पद्धत -
एका भांड्यामध्ये नारळाचे तेल थोडे कोमट करा
कोमट तेलामध्ये कापूर वड्या टाका
कापूर कोमट तेलात पटकन विरघळतो आणि त्यापासून कापूर तेल तयार होते.
तुम्ही हे कापूर तेल एका स्वच्छ बाटलीत भरून ठेवू शकता.
बाटलीचे झाकण घट्ट बंद करा नाहीतर कापूर त्यातून उडून जाऊ शकतो
Shutterstock
कापूर तेलचा वापर केसांवर कधी करावा -
कापूर तेल तुम्ही ड्रॉपर अथवा कापसाच्या मदतीने तुमच्या केसांना लावू शकता
जर तुमचे केस पांढरे झाले असतील तर केस काळे करण्यासाठी कापूर तेल तुमच्या नक्कीच फायद्याचे आहे यासाठी पांढऱ्या केसांवर नियमित कापूर तेल लावा
जर तुमच्या केसांमध्ये उवा अथवा लिखा झाल्या असतील तर त्या मारण्यासाठी तुम्ही कापूर तेलाचा वापर करू शकता. अशावेळी केस शॅंपू करण्याआधी केसांना कापूर तेल लावा. कापराला एक उग्र दर्प असतो. ज्या वासाने केसांमधील जीवजंतू नष्ट होतात. केस धुतल्यावर केसांमधून मृत झालेल्या उवा आणि लिखा बाहेर पडतात
जर तुमचे केस निस्तेज झाले असतील तर त्यांना चमकदार करण्यासाठी तुम्ही कापूर तेलाचा वापर करू शकता. कापरामधील आयुर्वेदिक घटक तुमच्या केसांचे आरोग्य सुधारतात आणि केसांना नैसर्गिक चमक येते
केसांमध्ये कोंडा झाला असेल तर कोंड्यावर उपचार करण्यासाठी केसांना लिंबाचा रस आणि कापूर तेल एकत्र मिसळून लावा. कापराच्या तेलाने कोंड्याची खाज कमी होईल आणि लिंबामुळे कोंडा केसांमधून निघून जाईल
केस खूप गळत असतील तर कापूर आणि ऑलिव्ह ऑईल एकत्र करून लावण्यामुळे तुमचे केस गळणं थांबेल आणि केस मजबूत होतील.
केस कमजोर आणि तुटक झाले असतील अथवा केसांना फाटे फुटत असतील तर अशा केसांना अंड्याचा गर आणि कापूर तेल एकत्र करून लावावे. ज्यामुळे केसांना त्यांचे पूर्ववत होण्यास नक्कीच मदत होईल
टक्कल पडलेल्या भागावर कापूर तेल आणि मेथीच्या बिया भिजवून आणि दळून तयार केलेला हेअर मास्क नियमित लावावा. नैसर्गिक पद्धतीने नवीन केस उगवण्यासाठी हा उपाय अतिशय उपयुक्त आहे
केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही नियमित तुमच्या कोणत्याही तेलामध्ये कापूर मिसळून लावू शकता.
केसांमध्ये खाज येत असेल तर अशा त्वचेला थंडावा मिळण्यासाठी आणि दाह कमी करण्यासाठी कापूर तेल लावण्यास नक्कीच मदत होऊ शकते