15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन (15th August Independence Day) म्हटलं की अर्थातच पांढरी कुर्ती, पांढरा पायजमा आणि तिरंगी ओढणी ही फॅशन आपल्या डोळ्यासमोर येते. या दिवसासाठी काही खास वेशभूषाही आपण आता सेलिब्रिटी करताना पाहतो. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा तर आपण शेअर करतोच. पण सोबतच या दिवशी आपण नक्की कोणत्या प्रकारची खास फॅशन करू शकतो अथवा कोणत्या प्रकारचे पोषाख परिधान करू शकतो याच्या काही टिप्स. करा अशी खास फॅशन आणि फॉलो करा सध्याचा ट्रेंड.
1. करा योग्य रंगांची निवड
आपण सहसा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सोसायटी अथवा कोणत्याही ठिकाणी झेंडावंदन आणि इतर कार्यक्रमांना जाताना पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करतो. सहसा आपण या दिवशी पारंपरिक कपड्यांना प्राधान्य देतो. अर्थात कुरती, पायजमा, साडी अशा फॅशन यावेळी कॅरी करण्याला आपले प्राधान्य असते. मग अशावेळी रंगांची योग्य निवड करणे आवश्यक आहे. पांढरा, केशरी, हिरवा या कपड्यांची निवड सहसा केली जाते. तुम्ही पांढऱ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान करणार असाल तर त्यावर तुम्ही तिरंगी ओढणी अथवा केशरी, हिरव्या रंगाची ओढणी घेतल्यास तुम्हाला अधिक उठावदार आणि शोभून दिसेल. काही जण अशोकचक्रातील निळ्या रंगाचाही वापर करतात. पण केशरी आणि हिरवा रंग हा अधिक डोळ्यांना उठावदार दिसून येतो.
2. साडीचा पर्याय
काही ठिकाणी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. विविध कार्यक्रम दिवसभर साजरे करण्यात येते. यावेळी साडी हादेखील उत्तम पर्याय आपल्याकडे आहे. तुम्हाला पूर्ण पांढरी साडी आवडत नसेल तर शिफॉनची साडी, कॉटन यामध्ये तिरंगी साडीचे पर्यायही उपलब्ध आहेत. सध्या लहरिया साडीचा ट्रेंड चालू आहे. यामध्ये केशरी अथवा हिरव्या रंगाची साडी तुम्ही नक्कीच यादिवशी नेसू शकता. यामध्ये कोणत्याही रंगांचा मेळ पांढऱ्या रंगाबरोबर घालण्यात येत असल्यामुळे ही साडी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी चांगलीच उठावदार दिसते. यावर तुम्ही ऑक्सिडाईज्ड दागिने घालून तुमचा लुक अधिक उठावदार करू शकता.
3. मिस मॅच कॉम्बिनेशन
तुम्हाला पारंपरिक ड्रेस अथवा साडी नेसणे जमणार नसेल तर तुम्ही मिस मॅच कॉम्बिनेशन अर्थात पारंपरिक आणि आधुनिकतेची सांगड घालत फॅशन करू शकता. पांढऱ्या रंगाचा टीशर्ट, निळी जीन्स आणि त्यावर तिरंगी ओढणी घेत तुम्ही स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी नक्कीच लाऊ शकता. धावपळ करण्यासाठी तुम्हाला जर जीन्स योग्य वाटत असेल तर तुम्ही असा वेष करा.
4. तिरंगी बांगड्या आणि कानातले
तुम्ही कोणता वेष परिधान केला आहे त्यानुसार तुम्ही केशरी, हिरव्या आणि निळ्या बांगड्यांचा चुडा तयार करून पंजाबी ड्रेससह तो घालू शकता. तुमच्या हातावर नक्कीच हा चुडा अप्रतिम दिसतो. तसंच तुम्ही घातलेल्या पांढऱ्या ड्रेसच्या कॉम्बिनेशननुसारच तुम्ही कानातले परिधान करा. हिरवी ओढणी घेतल्यास तुम्ही गोल्डन हिरवे झुमके घातले तर अधिक सुंदर दिसतात. नुसता कुरता पायजमा असेल तर त्यावर केशरी गोल्डन मोठे कानातले अधिक उठावदार दिसतील.
5. कोल्हापुरी चप्पल
आपल्याकडे फूटवेअरचे अनेक पर्याय आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपला जसा वेष परिधान केला असेल त्यावर कोल्हापुरी चप्पलचा साज तुम्ही चढवू शकता. पारंपरिक अथवा आधुनिक कोणत्याही वेषावर कोल्हापुरी चप्पल अधिक शोभून दिसते. विशेषतः पंजाबी ड्रेस, कुरती असा वेष असेल तर तुमच्या या वेषावर नक्कीच कोल्हापुर चप्पल अधिक उठावदार दिसते.
या संपूर्ण फॅशनचा अवलंब करून तुम्ही या स्वातंत्र्यदिनी नक्कीच अप्रतिम दिसू शकता. तसंच तुम्ही यावर अगदी हलकासा चेहऱ्याला मेकअप करा. त्यासाठी तुम्ही आमच्या MyGlamm च्या उत्पादनांचाही वापर करू शकता.