ADVERTISEMENT
home / Eye Make Up
Inner eye accent eye shadow trick

डार्क सर्कल्स लपवण्यासाठी ट्राय करा Inner Eye Accent

चेहऱ्यामध्ये डोळे सर्वात जास्त लक्ष वेधून घेतात. एखाद्याच्या डोळ्यांवरून त्याचे व्यक्तिमत्त्व, मनातील विचार समजू शकतात. त्यामुळे मेकअप करताना डोळ्यांच्या जास्त विचार केला जातो. डोळ्यांचा मेकअप जितका उठावदार असेल तितका तुमचा लुक परफेक्ट दिसतो. मात्र डोळ्यांचा मेकअप करताना पापण्यांवर जास्त भर दिला जातो. तुम्ही विंग्ड आयलायनर लावा अथवा स्मोकी आईज जर तुमच्या डोळ्याखील डार्क सर्कल्स असतील तर तुमचा कोणताही लुक चांगला होत नाही. यासाठी Inner Eye Accent ने लपवा तुमच्या डोळ्यांखालील काळेपणा

डोळे लहान असतील तर असा करा डोळ्यांचा मेकअप | Makeup Tips For Small Eyes In Marathi

Inner Eye Accent का ट्राय करायला हवा

जेव्हा तुम्ही डोळ्यांसाठी इनर आय एसेंट ट्राय करता तेव्हा त्यासाठी तुम्हाला आय पेन्सिलने डोळ्यांच्या कार्नरवर मेकअप करायचा असतो. उलट्या दिशेने हा प्रयोग केला तर तुमच्या चेहऱ्यावर उजळपणा आणि शेड्ल क्रिएट करता येतात. हा ट्रेंड सध्या लोकांना खूप आवडत आहे कारण तो करायला अगदी सोपा आहे. तुमच्या नाकामुळे तुमच्या चेहऱ्यावरील इनर कार्नरकडे लक्ष जात नाही. ज्यामुळे तुमच्या डोळ्याखालील काळी वर्तुळे जास्त उठून दिसतात. मात्र जर तुम्ही इनर आय एसेंट ट्राय केलं तर तुम्ही डोळ्यांचे आतील कोपरे हायलाइट करता आणि तुमच्या डार्क सर्कल्सवरून लक्ष निघून जातं.

भारतातील सर्वोत्कृष्ट मस्कारा, ज्यामुळे तुमचे डोळे दिसतील आकर्षक (Best Mascara In India)

ADVERTISEMENT

इनर आय एसेंटसाठी ट्राय करा टिप्स

मेकअप करताना तुम्ही निरनिराळ्या पद्धतीने हा ट्रेंड फॉलो करण्याचा प्रयत्न करू शकता. जसं की नेहमीच्या गोल्डन अथवा शिमर शेडपेक्षा तुम्ही एखादी ब्राइट शेडही यासाठी वापरू शकता. जर तुमच्या डोळयांच्या खाली काळी वर्तुळे आहे तर तुम्ही या ट्रेंडचा फायदा उचलून तुमच्या डोळ्यांना डिफाइन करण्यासाठी इनर आय कॉर्नरवर हवी ती आय शॅडो वापरू शकता. हवं असल्यास त्यावर आणखी एखादी मेटॅलिक अथवा शिमर शेड लावा. डार्क शेड्स वापरून तुम्ही तुमच्या डोळ्यांना स्मोकी आइज लुक देऊ शकता. 

उत्कृष्ट 10 वॉटरप्रूफ आयलायनर, जे वाढवतील तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य (Waterproof Eyeliner)

29 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT