ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
जॉन अब्राहमचा ऍक्शन थ्रिलर चित्रपट अटॅक 1 एप्रिलला प्रदर्शित होणार

जॉन अब्राहमचा ऍक्शन थ्रिलर चित्रपट अटॅक 1 एप्रिलला प्रदर्शित होणार

जॉन अब्राहम, जॅकलीन फर्नांडिस आणि रकुल प्रीत सिंग यांच्या मुख्य भूमिका असलेला अटॅक हा बहुप्रतिक्षित ऍक्शन थ्रिलर चित्रपट आता लवकरच चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. अटॅकच्या निर्मात्यांनी माहीत जाहीर केली आहे की हा चित्रपट 1 एप्रिल 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाईल. हा चित्रपट म्हणजे एका चित्रपटांच्या मालिकेतला पहिला भाग असेल. जसे डिस्ने युनिव्हर्स, मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स आहे त्याप्रमाणे अटॅकच्या निर्मात्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत असे युनिव्हर्स तयार करण्याचे ठरवले आहे. त्या युनिव्हर्सची तोंडओळख करून देणारा अटॅक हा पहिला चित्रपट असणार आहे.

अटॅकपासून सुरु होणार एक नवे युनिव्हर्स 

अटॅकचे निर्माते व पॉप्युलर एंटरटेनमेंट नेटवर्क या कंपनीचे मालक डॉ. जयंतीलाल गाडा यांनी नुकतेच या फ्रँचायझीबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.ही फ्रॅन्चायजी सुरु करताना आणि त्याविषयी बोलताना ते अतिशय आनंदात होते. ते म्हणाले की, “अटॅक पार्ट वन  ही एक अतिशय मनोरंजक संकल्पना आहे. जॉन अब्राहम एका सुपर-सोल्जरची भूमिका साकारण्यासाठी अगदी योग्य व परिपूर्ण आहे! मला आशा आहे की हा चित्रपट निश्चितच यशस्वी होईल. या चित्रपटापासून आपल्या चित्रपटसृष्टीत चित्रपटांच्या एका नवीन युगाची सुरुवात होईल कारण अटॅकचे व्हिज्युअल इफेक्ट्स आणि स्केल एका वरच्या लेव्हलचे आहेत. अटॅक (भाग 1) 1 एप्रिल रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होईल आणि आम्ही लवकरच दुसऱ्या भागासाठी प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू करू.”

अभिनेता जॉन अब्राहमनेही त्याच्या या नव्या चित्रपटाविषयी माहिती शेअर केली आहे. तो म्हणतो की, “हा काही नेहमीचा ऍक्शन थ्रिलर चित्रपट नसेल. हा चित्रपट वेगळा आहे. आजवर कुठलाही ऍक्शनपट असा झालेला नाही. या चित्रपटाला एक साय-फाय अँगल आहे, तसेच गुंतागुंतीचा ड्रामा आहे. चित्रपटाचे कथानक खूप वेगळे आहे. भारत दहशतवाद्यांना कसे हाताळतो आणि इतिहासात घडून गेलेल्या घटनांचा कसा विचार करतो व एक राष्ट्र म्हणून आपण काय आहोत असे काही प्रश्न हा चित्रपट उपस्थित करेल. प्रेक्षक या चित्रपटावर सिनेमागृहात कशी प्रतिक्रिया देतील हे बघण्यास मी अत्यंत उत्सुक आहे.कारण हा चित्रपट कागदावरून रीलवर आणणे आमच्यासाठी खूप रोमांचक अनुभव होता.”  

अधिक वाचा – विकी कौशल आणि कतरिनाच्या व्हॅलेन्टाईन्स डेमध्ये टायगर-३ च्या शूटिंगचा अडथळा!

ADVERTISEMENT

जॉन अब्राहम सुपर सोल्जरची भूमिका करणार

अटॅकचे टिझर मागेच रिलीज झाले होते. या टिझरमध्ये जॉन संसदेत होणाऱ्या हल्ल्यापासून लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे. या गोंधळाच्या दरम्यान त्याला एक मोठी दुखापत होते.त्याच्या पाठीचा कणा मोडतो. त्यानंतर त्याला उपकरणांनी भरलेल्या एका प्रयोगशाळेत नेण्यात येते. तिथे त्याला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला जाताना दाखवले आहे. हा सीन अगदी हॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट युनिव्हर्सल सोल्जरशी मिळताजुळता आहे. या दृश्यात विशेष टास्क फोर्स सदस्याच्या शरीरात त्याच्या शारीरिक क्षमता वाढवणाऱ्या अत्याधुनिक जैवतंत्रज्ञानाचे प्रत्यारोपण केले जाते असे दाखवले आहे. यानंतर जॉन अब्राहम एक सुपर सोल्जर बनतो जो कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यासाठी तयार असतो. टीझरच्या शेवटी आपल्याला दिसते की त्याच्या डोळ्यांतून निळ्या रंगाच्या ठिणग्या येत आहेत. म्हणजेच या चित्रपटात जॉन अब्राहमकडे काही विशेष शक्ती असलेल्या बघायला मिळणार आहेत.

येत्या 1 एप्रिल रोजी ऍक्शनप्रेमी चाहत्यांना अटॅक – 1 या ऍक्शनपॅक्ड साय-फाय चित्रपटाची मेजवानी मिळणार आहे. 

अधिक वाचा – मौनी रॉयनंतर एकता कपूरची आणखी एक ‘नागिन’ अडकतेय लग्नाच्या बंधनात

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा  MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
04 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT