ADVERTISEMENT
home / Fitness
Benefits Of Black Salt In Marathi

काळे मीठ खाण्याचे फायदे (Kalya Mithache Fayde In Marathi)

 

‘मीठाशिवाय जेवण पूर्ण कसे होणार…’ मीठ हे एखाद्या बेचव पदार्थामध्ये जरासे घातले तर जेवणाला चव येते. अशा या मीठाचा केवळ पदार्थाची चव वाढवणे इतकाच उपयोग नाही. तर त्याच्या वेगवेगळ्या स्वरुपानुसार त्याचे आरोग्यदायी आणि सौंदर्यवर्धक असे अनेक फायदे आहेत. आपण रोजच्या जेवणात प्रोसेस केलेले पांढरे मीठ वापरतो. पण या शिवाय अनेक जण जेवणात खडे मीठही वापरतात. बाजारात एकूण पाच प्रकारचे मीठ मिळतात. रोजचे पांढरे मीठ, सैंधव, काळे मीठ, रॉक सॉल्ट, समुद्री मीठ असे हे मीठाचे प्रकार चवीलाही थोड्या फार प्रमाणात वेगळे असतात. शिवाय यांचा रंगही एकमेकांहून थोड्या फार फरकाने वेगळाच असतो. काळे मीठ हे चवीला अधिक चविष्ट असते. काळ्या मीठामध्ये इतर मीठाच्या तुलनेत लोह आणि खनिजाचा अधिक साठा असतो. रोजच्या पांढऱ्या मीठापेक्षा काळे मीठ हे अधिक फायद्याचे असते. काळ्या मीठामध्ये पोटॅशिअम, आर्यन आणि कॅल्शिअम असते. जे आरोग्यासाठी फारच फायद्याचे ठरते. आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही काळे मीठ हे फारच लाभदायी आहे. म्हणूनच काळे मीठ खाण्याचे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत. चला करुया सुरुवात.

काळे मीठ खाण्याचे फायदे (Health Benefits Of Black Salt In Marathi)

Benefits Of Black Salt In Marathi

Benefits Of Black Salt In Marathi

 

काळे मीठ खाण्याचे फायदे जाणून घेताना आरोग्यासाठी त्याचे नेमके कोणते फायदे आहेत ते जाणून घेणे देखील गरजेचे आहे. आहारात काळ्या मिठाचे फायदे काय ते जाणून घेऊयात.

ADVERTISEMENT

साखर नियंत्रणात ठेवते (Controls Sugar Level)

 

मधुमेहाचा त्रास जर तुम्हाला असेल तर तुमच्यासाठीही काळे मीठ फारच फायद्याचे आहे. काळे मीठ तुमच्या शरीरातील इन्सुलिन नियंत्रित ठेवण्याचे काम करते. त्यामुळे शरीरातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. जर तुमच्या घरात मधुमेही असतील तर अशांनी याची काळजी घेणे फारच गरजेचे आहे. मधुमेहावरील घरगुती उपाय म्हणून तुम्ही तुमच्या आहारात काळ्या मीठाचा समावेश करा. त्यामुळे तुमची साखर नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल.

क्रॅम्ब्सवर लाभदायक (Treat Cramps)

 

सांधेदुखी किंवा अंगदुखी होत असेल तर त्यासाठीही काळे मीठ फारच फायद्याचे असते. तुम्ही काळे मीठ तव्यावर गरम करुन गरम फडक्यावर ते मीठ घेऊन ते शेका. त्यामुळे सांधेदुखी कमी होण्यास मदत मिळेल. या शिवाय तुम्हाला सतत क्रॅम्ब्स येत असतील तर तुम्ही काळे मीठ गरम पाण्यात घेऊन त्याने आंधोळ करा त्यामुळे शरीराला आराम मिळण्यास मदत मिळेल. जेवणानंतर कळे मीठ पाण्यात घालून प्यायल्याने देखील शरीराला कॅल्शिअम मिळते ज्यामुळे हाडे बळकट राहण्यास मदत मिळते.

वजन कमी करण्यास मदत (Weight Loss)

 

वजन कमी करण्यासाठी काळे मीठ फायदेशीर ठरते. काळ्या मीठामध्ये असलेले घटक शरीरातील चरबी विरघळवण्यास मदत करते. दररोज सकाळी कोमट पाण्यामध्ये जर तुम्ही थोडेसे काळे मीठ घालून ते पाणी प्यायलात तर वजन कमी होण्यास मदत मिळेल. जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही काळ्या मिठाचे सेवन करु शकता. काळ्या मीठामध्ये असलेली पोषकत्वे ही फारच लाभदायी असतात त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्ही याचे सेवन करण्यास काहीच हरकत नाही. असं म्हणतात की, पांढरं मीठ हे वजन वाढवते तर काळे मीठ वजन नियंत्रणात ठेवण्याचे काम करते.

वाचा – Medical Benefits Of Black Pepper In Marathi

ADVERTISEMENT

उच्च रक्तदाबासाठी फारच फायदेशीर (Treats High Blood Pressure)

 

रक्तदाब असणाऱ्यांसाठी पांढऱ्या मीठाचे अति सेवन हे धोकादायक ठरते. पण काळ्या मीठाच्या सेवनामुळे अनेक आजार नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. शरीराला आवश्यक असलेले अनेक घटक हे सैंधव मीठापासून मिळतात. काळ्या मीठामधील अनेक घटक शरीराला मिळाले नाही तर काही आरोग्यविषयक समस्या नक्कीच जाणवू शकतात. जर तुम्हाला रक्तदाबाच्या कारणामुळे मीठाचे सेवन करु नका असा सल्ला दिला असेल तर तुम्ही अशावेळी काळ्या मीठाचे सेवन करायला हवे. काळ्या मिठाचे सेवन केल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल.

पचनास मदत करते (Help To Digest)

 

जर तुम्हाला पचनाचा त्रास होत असेल तर तुम्ही काळ्या मीठाचे सेवन करायला हवे.काळे मीठ खाल्लायमुळे गॅसेसचा होणारा त्रास कमी होतो. जर तुम्हाला पोटासंदर्भात काही त्रास असतील तर तुम्ही जेवणात काळ्या मीठाचा उपयोग करायला हवा. काळ्या मीठाच्या सेवनामुळे तुम्हाला पचनाशी निगडीत कोणतीही समस्या होत नाही.  काळ्या मीठामुळे पोटात अँन्झाईम्स अॅक्टिव्ह होतात. हे इन्झाईम्स पचन सुधारण्याचे काम करतात.

 

 

ADVERTISEMENT

सौंदर्यासाठी काळ्या मिठाचे फायदे (Beauty Benefits Of Black Salt In Marathi)

सौंदर्यासाठी काळ्या मिठाचे फायदे

Black Salt Benefits In Marathi

काळ्या मीठाचा उपयोग हा त्वचेसाठीही केला जातो. त्वचेसाठी आणि सौंदर्याच्या दृष्टिकोनातून त्याचे बरेच फायदे आहेत. नेमका सौंदर्याच्या दृष्टिकोनातून त्याचे फायदे काय आणि त्याचा उपयोग कसा करायचा त्यासाठी जाणून घेऊया काळ्या मिठाचे फायदे 

उत्तम क्लिन्झर (Excellent Cleanser)

चेहऱ्यासाठी उत्तम क्लिन्झर शोधत असाल तर तुम्ही काळ्या मीठाचा उपयोग करु शकता. चेहरा ओला करुन अगदी थोडेसे काळे मीठ घेऊन ते चेहऱ्याला चोळा. अगदी हलक्या हाताने तुम्ही हे मीठ चेहऱ्याला चोळा. त्यामुळे चेहरा स्वच्छ होण्यास मदत मिळेल. मीठ हे उत्तम एक्सफोलिएटर आहे. चेहरा डीप क्लीन करण्यासाठी काळे मीठ हे उत्तम असते. त्यामुळे चेहऱ्याची स्वच्छता योग्य पद्धतीने राखली जाते. धूळ, माती या कारणामुळे त्वचेवर पिंपल्स येण्याची शक्यता असते अशावेळी डीप क्लिनिंग ही फारच महत्वाची असते. पिंपल्स आल्यावर तुम्ही त्यावर पाण्यात भिजवलेले काळे मीठ घाला आणि तसेच ठेवून द्या. त्यामुळे काही दिवसातच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये झालेला बदल दिसून येईल.

ADVERTISEMENT

रक्ताचा पुरवठा सुरळीत करते (Promotes Blood Circulation)

चेहरा अधिक सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी रक्त पुरवठा हा सुरळीत असावा लागतो. जर चेहऱ्यावर रक्त पुरवठा सुरळीत असेल तर चेहरा हा अधिक चांगला दिसू लागतो. जर तुमचा चेहरा कोरडा आणि त्यावरील त्वचा ही अनाकर्षक असेल तर तुमच्या त्वचेवरील रक्ताचा पुरवठा हा सुरळीत नाही असे समजावे. मीठ चोळल्यामुळे चेहऱ्यावरील नसांना आराम मिळतो. त्यामुळे त्यातून रक्तपुरवठा अधिक सुरीत होऊ लागतो. जर तुमची त्वचा खूप संवेदनशील असेल तर तुम्ही चेहऱ्यावर मीठाचा उपयोग सतत करु नका. कारण त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर रॅशेश येण्याची शक्यता असते.

कोंडा कमी करते आणि केसांची वाढ चांगली करते (Cures Dandruff And Healthy Hair Growth)

केसांच्या समस्यांपैकी एक गंभीर समस्या म्हणजे कोंडा. जर तुम्हाला कोंड्याचा त्रास असेल तर तुमच्यासाठी काळे मीठ हा एक उत्तम उपाय आहे. काळ्या मिठामुळे कोंड्याची समस्या कमी होऊन केसांची वाढ होण्यास नक्कीच मदत मिळते.केसांवर त्याचा थेट उपयोग करु नका. केसांसाठी त्याचा वापर करताना तुम्ही टोमॅटोचा किंवा संत्र्याचा रस घेऊन त्यामध्ये काळे मीठ घाला. हा रस तुम्ही केसांना लावा. असा रस केसांना लावल्यामुले कोंड्याचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. आठवड्यातून फक्त एकदाच तुम्ही याचा उपयोग करा. त्यामुळे तुमच्या कोंड्याचा त्रास कमी होईल.

नखांचा पिवळेपणा घालवते (Corrects Yellow Nails)

नखं ही टणकं आणि गुलाबी असली की ती अधिक चांगली, हेल्दी समजली जातात. पण काही जणांची नखं ह काही कारणामुळे पिवळी पडतात. काळ्या मीठामध्ये कॅल्शिअम असते जे नखांना मजबूती आणण्याचे काम करते. एका भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यामध्ये साधारण एक चमचा इतके काळे मीठ घालावे. त्यामध्ये नखं बुडवून ठेवावीत. त्यामुळे नखांवरील पिवळेपणा निघून जातो. शिवाय कमजोर झालेली नखं ही अधिक चांगली दिसून लागतात. नखं अशी कमजोर आणि पिवळी झाली असेल तर तुम्ही काळ्या मिठाचा असा उपयोग नक्की करा. तुम्हाला नखांमध्ये झालेला फरक नक्की जाणवेल.

पोअर्स स्वच्छ करते (Healthy Pores)

काळे मीठ हे एक्सफोलिएटरचे काम करते. त्वचेसाठी ते एक उत्तम एक्सफोलिएटर आहे. पोअर्सची स्वच्छता योग्यपद्धतीने झाली की, त्वचेच्या समस्या सतत होत नाहीत. पोअर्सची स्वच्छता करण्यासाठी काळे मीठ हे उत्तम आहे. म्हणूनच अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये मिठाचा उपयोग केला जातो. कोणत्याही सुगंधी तेलामध्ये तुम्ही काळे मीठ घालून त्याचा उपयोग बॉडी स्क्रब म्हणून केला जातो. त्यामुळे शरीरावरील मृत त्वचा निघून जाण्यास मदत मिळते. अगदी त्याच पद्धतीने चेहऱ्यावर अगदी हलक्या हाताने याचा उपयोग केल्यास पोअर्सच स्वच्छता होते आणि चेहरा अधिक सुंदर दिसू लागतो. 

ADVERTISEMENT

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1. काळे मीठ जेवणात वापरता येते का ?

घरात शक्यतो सगळ्या जेवणामध्ये काळे मीठ वापरले जात नाही. त्यासाठी आपण प्रोसेस मीठच वापरतो. पण काळे मीठ जेवणात घातल्यास काहीच हरकत नाही. कारण काळ्या मीठाची चव ही अधिक चांगली असेते. त्यामुळे तुम्ही जेवणात याचा उपयोग करण्यास काहीच हरकत नाही. तुम्ही जेवणात काळे मीठ किंवा सैंधव वापरण्याचा विचार करत असाल तर त्याचा वापर बिनधास्त करा.

2. मीठाचे जास्त सेवन आरोग्यासाठी हानिकारक असते का ?

हो, अति मीठ खाणे शरीरासाठी मुळीच चांगले नाही. मीठाच्या अतिसेवनाचा धोका हा ह्रदयाला होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्य असेल तर मीठाचे सेवन हे प्रमाणात असू द्या. खूप जणांना जेवणात वरुन मीठ घेण्याची सवय असते ही सवय देखील चांगली नाही.त्यामुळेही आरोग्याच्या काही तक्रारी उद्भवण्याची शक्यता असते.

3. काळे मीठ आणि रोजच्या मीठात काय फरक असतो ?

काळ्या मीठामध्ये अधिक नैसर्गिक घटक असते. त्यामध्ये प्रोसेस केलेली नसते. त्यामुळे हे मीठ रोजच्या मीठाच्या तुलनेत नक्कीच चांगले असते. तुम्हाला अधिक नैसर्गिक गोष्टी वापरायच्या असतील तर तुम्ही नक्कीच काळ्या मीठाचे सेवन करायला हवे.

15 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT