Advertisement

बॉलीवूड

Video : सोशल मीडियावर अभिनेत्री कंगनाने केला धक्कादायक खुलासा

Aaditi DatarAaditi Datar  |  Mar 30, 2020
Video : सोशल मीडियावर अभिनेत्री कंगनाने केला धक्कादायक खुलासा

Advertisement

कंगना रणौत ही बॉलीवूड अभिनेत्री नेहमीच काही ना कारणाने वादग्रस्त ठरत आली आहे. मग तिचं मीडियासोबतच वागणं असो हृतिकसोबतंच वादग्रस्त नातं असो वा तिची बहिण रंगोलीच्या इतर सेलेब्सवरील कमेंट असो. कंगनाने पुन्हा एकदा एक वादग्रस्त खुलासा केल्याने बॉलीवूड आणि फॅन्समध्ये चर्चांना उधाण आलंय.

सेल्फ क्वारंटाईनच्या काळात इतर सेलेब्सप्रमाणे कंगनाही तिच्या फॅन्ससोबत संवाद साधत आहे. सध्या चैत्र महिन्यातलं नवरात्र सुरू आहे. या दरम्यान कंगना रोज एका व्हिडिओतून आपल्या फॅन्सशी संवाद साधत आहे. ज्यामध्ये कोणती पुस्तक वाचावी ते इतर विविध विषयांवर ती बोलते. पण कंगना कधीच तिच्या फॅन्सशी संवाद साधण्याची संधी सोडत नाही. नुकताच तिने असा एक व्हिडिओ शेअर केला आणि आपल्या आयुष्यातली कठीण काळ फॅन्सना सांगितला.

या व्हिडिओमध्ये मणिकर्णिका कंगनाने खुलासा केला की, ती वयाच्या पंधराव्या वर्षी घरातून अभिनेत्री होण्यासाठी पळून गेली होती. घर सोडल्यावर दोन वर्षातच ती ड्रग एडिक्ट झाली होती. कंगना सांगते की, हा काळ वाईट नाहीयं. तुम्ही तसा विचार करू नका. खरंतर वाईट काळ हा चांगला काळ असतो. मित्रांनो वयाच्या 15 किंवा 16 व्या वर्षी जेव्हा मी घर सोडून पळून गेले होते तेव्हा मला असं वाटायचं की, मी आकाशातले तारेसुद्धा तोडू शकेन. पण घर सोडलं, अभिनेत्री झाले आणि दीड ते दोन वर्षातच व्यसनाधीन झाले. माझं पूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झालं. मी अशा लोकांमध्ये सापडले की, ज्यांच्यापासून मला मृत्यूच वाचवू शकत होता. हे सर्व माझ्या आयुष्यात तेव्हा झालं जेव्हा मी फक्त टीएनजर होते. त्याचवेळी माझ्या एका चांगल्या मित्राने माझी ओळख योगाशी करून दिली आणि राजयोग हे पुस्तक मला दिलं. त्यानंतर मी स्वामी विवेकानंद यांना माझा गुरू मानलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःला घडवलं.

तिने हेही सांगितलं की, ती गर्दीत हरवून गेली असती जर तिच्या आयुष्यात कठीण काळ आला नसता. ती मानते की, आध्यात्मिक मार्गदर्शनाशिवाय तिला इच्छाशक्ती विकसित करता आली नसती आणि परिणामी तिला स्वतःचं ग्रुमिंग आणि मानसिक आरोग्य विकसित करता आलं नसतं.

सध्या कंगना सेल्फ आयसोलेशन आणि सोशल डिस्टन्सिंग फॉलो करत स्वतःच्या घरी मनालीमध्ये आहे. काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या घरच्यांसोबत वाढदिवसाचं साधेपणाने सेलिब्रेशन केलं. यावेळी तिने देवाचं दर्शन घेतलं आणि सुंदर गुलाबी रंगाची साडी नेसून घरच्यांसोबत फोटोही काढले होते.

कंगना रनौतला आवरता आला नाही पाणीपुरी खाण्याचा मोह

रणबीर- आलियावर कंगना पुन्हा बरसली, साधला निशाणा

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.