लॉकडाऊनमध्ये सगळा देश थांबला आहे. अनेक कंपन्या, उद्योगधंदे पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. याचा परिणाम मनोरंजन विश्वालाही झाला आहे. सगळ्या मालिका आणि चित्रपटांचे शुटिंग पूर्णत: बंद आहे. मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत काही मालिका सुरु राहिल्या. पण त्यांचेही नवे एपिसोड संपल्यानंतर त्यांनी जुन्या काही भागांवर आपले काम भागवून नेले आणि प्रेक्षकांचे मनोरंजन केले. पण आता तेच तेच भाग पाहूनही लोक कंटाळली आहेत. प्रेक्षकांमध्ये आलेली मरगळ झटकण्यासाठी आणि त्यांना घरीच रोखून धरण्यासाठी कपिल शर्मा लवकरच येणार आहे. कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा’ चे शुटिंग सुरु होणार आहे असे कळत आहे. पण आता हे शुटिंग लॉकडाऊन असताना कसे होईल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर जाणून घ्या या विषयी अधिक
‘मुंबई पोलीस’ ट्िवटर हँडलवरून सेलिब्रिटींना देण्यात येणाऱ्या ‘अफलातून’ उत्तराचीच सध्या चर्चा
असे होणार शुटिंग?
Social distancing सगळ्या देशात लागू केली असताना या शोचे शुटिंग कसे होईल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मिळालेल्या माहितीनुसार कपिल शर्माचे शुटिंग हे सगळ्या नियमांचे पालन करुनच केले जाणार आहे. गेल्या महिन्यापासून कोणतेही नवे चित्रपट रिलीज झाले नसल्यामुळे या कार्यक्रमात तुम्हाला कोणतेही सेलिब्रिटी पाहायला मिळणार नाही. शिवाय कोणत्याही ऑडिएन्सशिवाय हे शुटिंग होणार आहे अशी माहिती मिळत आहे.कदाचित कपिल शर्मा घरातून ही एखादी स्टँडअप कॉमेडी शूट करेल असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. परदेशातही असे कॉमेडी शोज सध्या कोणत्याही ऑडिएन्सशिवाय शूट केले जात आहे. त्यामुळे कपिल शर्माही या गोष्टींच्या विचाराधीन असल्याचे कळत आहे.
महाभारत मालिकेबाबतच्या या गोष्टी वाचून व्हाल अवाक
कपिल शर्माकडून मिळाली नाही माहिती
आता कपिलचा शो सुरु होणार आणि सूत्रांनी त्याच्या शोच्या शुटिंग संदर्भातील माहिती जरी दिली असली तरी देखील कपिल आणि त्याच्या टिमकडून या संदर्भात कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे कपिल शर्मा शो सुरु होईल की नाही हे कपिल शर्माने माहिती दिल्याशिवाय कळणार नाही. पण तो पुन्हा एकदा हसवायला येईल अशी प्रत्येकालाच आशा आहे.
दाखवले जात आहेत जुने भाग
सध्या सगळ्याच टीव्ही शोजच्या बाबतीत सांगायचे झाले तर जुनेच एपिसोड दाखवत आहे. द कपिल शर्मा शो चेही जुनेच काही भाग प्रसारीत केले जात आहे. आता काहींना तेच तेच भाग पाहूनही कंटाळा आला आहे. म्हणूनच काही जुन्या मालिका सुरु करण्यात आल्या आहेत. लोकांनी घरीच बसून वेळ घालवावा असे अनेकांना वाटत आहे.
तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी मी निशःब्द झालो आहे’
सध्या कपिल काय करत आहे?
कपिल शर्मा शोसंदर्भातील सगळ्या बातम्या जरी कितीही बाहेर येत असल्या तरी सध्या कपिल घरीच आहे. त्याच्या कोणत्याही सोशल मीडिया अकाऊंटवरुन अशी घोषणा करण्यात आलेली नाही. काहीच दिवसांपूर्वी त्याने त्याच्या मुलीचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला होता. चैत्र महिन्यातील नवरात्रीत त्याने कन्या पूजन केले होते. त्यावेळी अनायराची पूजा करण्यात आली. त्यावेळी त्याने मुलीचे क्युट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.
आता कपिल शर्मा या संदर्भातील घोषणा कधी करतो याची वाट त्याचे चाहते करत आहेत हे मात्र नक्की!
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा.