ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
Karan Johar Had Plans Of Making A Biopic On Yuvraj Singh But Dropped It Due To Differences

करण जौहरने रद्द केली युवराज सिंहची बायोपिक, कारण वाचून व्हाल हैराण

बॉलीवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेंड आहे. ज्यामुळे निरनिराळ्या प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचा जीवनप्रवास बायोपिकच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत आहे. यात खेळाडूंची बायोपिक बनवण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. आजवर अनेक खेळाडूवर आधारित चित्रपट बॉलीवूडमध्ये तयार झाले आहेत. ज्यांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. काही दिवसांपूर्वीच निर्माता लव रंजनने माजी क्रिकेटपटू सौरभ गांगुलीवर आधारित बायोपिक तयार करणार अशी चर्चा होती. मात्र त्याआधीच करण जौहरने क्रिकेटर युवराज सिंहवर आधारित बायोपिकचा निर्णय घेतला होता. करणला युवराजचे आयुष्य चित्रपटातून मांडण्याची इच्छा होती. याबाबत युवराजशी बोलणी होऊन चित्रपटाची तयारी सुरू देखील झाली होती. मात्र अचानक दोघांमध्ये मदभेद झाल्यामुळे करणने युवराजच्या बायोपिकचा विचार रद्द केला आहे.

वैभव तत्त्ववादीचा ‘ग्रे’ रहस्यमयी आणि थरारक अनुभव देणारा चित्रपट

करणने का रद्द केला युवराजच्या बायोपिकचा विचार

युवराज सिंहचे जीवन एखाद्या चित्रपटाप्रमाणे रंजक आहे. त्याच्या जीवनात आजवर अनेक चढउतार आले आहेत. युवराजने क्रिकेटच नाही तर कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर मात करत आयुष्याचा सामना जिंकला आहे. त्यामुळे करणने युवराजवर आधारित बायोपिकचा विचार केला होता. यासाठी त्याने युवराजसोबत मिटींग करून याबाबत चर्चा केली होती. युवराजची भूमिका साकारण्यासाठी करणने सिद्धांत चतुर्वेदीची निवड केली होती. त्याच्या मते सिद्धांतचा चेहरा युवराजशी मिळता जुळता आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत करण आणि युवराजमध्ये मतभेद झाले. युवराजला त्याच्या भूमिकेसाठी ह्रतिक रोशन किंवा रणबीर कपूर हवा होता. करणच्या मत या दोघांचा चेहरा युवराजशी मुळीच जुळत नाही असे होते. युवराजला मात्र त्याच्या बायोपिकमध्ये ए-लिस्टर अभिनेताच हवा होता. ज्यामुळे  करणने युवराजच्या बायोपिकचा विचार सध्या रद्द केला आहे.

अभिनेत्री धनश्री काडगावकरचा कमबॅक, या मालिकेतून येणार प्रेक्षकांसमोर

ADVERTISEMENT

करणला पटलं नाही युवराजचं मत

करण जौहरला त्याचा चित्रपट नेहमी प्रेक्षकांना आवडेल असा करायचा असतो. युवराजच्या भूमिकेसाठी ए लिस्टर अभिनेता घेण्याची त्याला मुळीच गरज वाटत नाही. कारण जर यासाठी एखाद्या नवा चेहरा घेतला तर तो लोकांना आवडेलच पण त्या भूमिकेला न्याय देण्यासाठी तो जास्तीचा वेळदेखील देऊ शकेल. करणच्या मते युवराज एक राष्ट्रीय आयकॉन आहे. त्याची कथा पाहण्यासाठी लोकांना स्टार कास्टची गरज नक्कीच नसेल. युवराजचे नाव आणि अभिनय यावरच चित्रपट चालेल. पण सध्या तरी युवराज करणच्या या मताशी मुळीच सहमत नाही. त्यामुळे युवराजवर बायोपिक करण्याचा निर्णयच करणला रद्द करावा लागला आहे. 

बॉलीवूड आणि ड्रग्ज कनेक्शन, आजवर या सेलिब्रेटींची नावे आली आहेत पुढे

07 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT