ADVERTISEMENT
home / रेसिपी
karanji recipe in marathi

दिवाळीसाठी खास करंजी रेसिपीज (Karanji Recipe In Marathi)

करंजी हा महाराष्ट्रीयन फराळातील एक मुख्य पदार्थ आहे. सणासुदीला , लग्नकार्यात करंजीचा फराळ घरोघरी बनवला जातो. गौरीगणपतीच्या नैवेद्यामध्ये आणि दिवाळीच्या फराळात करंजी बनवली जातेच. दिवाळी सणाची माहिती म्हटलं की, फराळ आला आणि फराळ म्हटल्यावर करंजी. मुळात करंजी मोठ्या आकाराची असल्यामुळे या पदार्थामुळे फराळाच्या ताटाला चांगली शोभा येते. शिवाय चवीला खुशखुशीत असल्यामुळे अनेकांच्या आवडीची असते. करंजी दिसायला आणि खायला कितीही छान असली तरी ती बनवण्याची कटकट वाटू शकते. मात्र जर सारण उत्तम जमलं तर करंजी करणं अगदी सोपं आहे. कंरजीचे महाराष्ट्रात अनेक प्रकार बनवले जातात. मैद्याच्या पारीमध्ये तिखट अथवा गोडाचे सारण भरून सारणाच्या कंरज्या (karanji saran recipe in marathi) बनवल्या  जातात. कोणी सुके खोबरे, ओले खोबरे, पुरणाच्या गोड कंरज्या बववतं तर कुणी तिखटाच्या कंरज्या करतं. महत्त्वाचं आहे सारण भरल्यानंतर करंजीची पारी व्यवस्थित बंद करणं. कंरजीची पारी बंद करण्यासाठी त्याला मैद्याच्या  पाण्याचा हात लावला जातो आणि कातणीने सुरेख आकार दिला जातो. तेलात अथवा तुपात तळल्यावर अशा कंरज्या खुशखुशीत होतात. मात्र कंरजी खुळखुळी होऊ नये यासाठी सारण काठोकाठ भरणं ही एक कला आहे. यासाठी जाणून घ्या सणासुदीसाठी खास करंजी रेसिपीज (karanji recipe in marathi) तसंच वाचा मैद्याचे पदार्थ रेसिपी मराठीत, बनवा विविध प्रकारच्या ‘या’ डिश.

बेसन करंजी रेसिपी मराठी (Besan Karanji Recipe In Marathi)

besan karanji recipe in marathi
karanji recipe in marathi

गौरीगणपती आणि दिवाळीला खास कोकणात बेसनाच्या करंज्या केल्या जातात. या कंरज्या साखरेच्या नसून गुळाच्या असल्यामुळे आरोग्यासाठी खूपच चांगल्या असतात.

साहित्य –

  • एक कप मैदा
  • चवीपुरतं मीठ
  • तळण्यााठी तेल
  • दोन वाटी बेसन
  • एक वाटी सुकं खोबरं
  • दोन वाटी गुळ
  • सुक्या मेव्याची पूड
  • एक चमचा पांढरे तीळ
  • चारोळी
  • खसखस
  • वेलची पूड
  • एक वाटी रवा

कृती

ADVERTISEMENT

रवा, बेसन, सुकं खोबरं, तीळ, खसखस वेगवेगळं भाजून घ्या.

गुळ, बेसन मिक्सरमध्ये वाटून घ्या या मिश्रणात सुकं खोबरं, खसखस, सुकामेवा, चारोळी मिक्स करून थोडं भाजून घ्या.

मैदा आणि मीठ एकत्र करून मोहन घालून पीठ मळून घ्या.

अर्ध्या तासाने पीठाचे समान भाग करून पारी लाटून घ्या आणि सारण भरून पारी दुमडा, मुरड घालून करंजी बनवा.

ADVERTISEMENT

करंजीचे तोंड बंद करण्यााठी हाताने मुरड घाला किंवा  कातणीने सुरेख आकार द्या.गरम तेलात खरपूस करंजी तळून घ्या. 

वाचा – खवा पोळी (Khava Poli Recipe In Marathi)

तिखट करंजी रेसिपी मराठी (Tikhat Karanji Recipe In Marathi)

tikhat karanji recipe in marathi
karanji recipe in marathi

डाएटसाठी गोडाचे पदार्थ तुम्ही आहारातून कमी केले असतील तर यंदा सणाला बनवा या तिखटाच्या करंज्या. दोन जेवणाच्या मध्ये  खाण्यासाठी हा एक उत्तम स्नॅक्सदेखील आहे.

साहित्य –

ADVERTISEMENT
  • मैदा एक कप
  • बारीक रवा एक कप
  • गरजेनुसार तूप
  • अर्धा कप सुकं खोबरं
  • चमचाभर पांढरे तीळ
  • एक चमचा लाल तिखट
  • अर्धा चमचा आमचूर पावडर
  • मीठ चवीपुरते
  • एक चमचा पिठीसाखर
  • एक चमचा खसखस

कृती –

तेलाचे मोहन आणि मीठ टाकून बारीक रवा एखत्र करून पीठ मळा.

तीळ, सुखं खोबरं, खसखस भाजून घ्या

मिक्सरमध्ये जाडसर दळून घ्या आणि त्यात मीठ, तिखट  आणि आमचूर पावडर टाका.

ADVERTISEMENT

एक तासाने मैद्याच्या पारी लाटून घ्या आणि त्यात सारण भरून करंजी बनवा.

कंरजी तेलात अथवा तूपात तळून थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा. 

खुशखुशीत शंकरपाळी रेसिपी मराठीतून (Shankarpali Recipe In Marathi)

बेक्ड करंजी रेसिपी मराठी (Baked Karanji Recipe In Marathi)

baked karanji recipe in marathi
karanji recipe in marathi

तेलात तळलेले पदार्थ आरोग्यासाठी हिताचे नसल्यामुळे आजकाल सणासुदीचे पदार्थ जसे की चकली आणि करंजी  बेक्ड केल्या जातात. तुम्ही देखील डाएट कॉन्शिअस असाल तर अशा बेक्ड करंज्या घरच्या घरी नक्कीच करू शकता.

ADVERTISEMENT

साहित्य –

  • दोन वाटी मैदा
  • अर्धी वाटी तूप
  • चिमूटभर मीठ
  • ड्रायफ्रुटची पूड
  • दूध

कृती –

मैद्यामध्ये तूप आणि मीठ टाकून दूधाच्या मदतीने घट्ट मध्यम असे पीठ मळून घ्या.

पीठ अर्धा तास ओल्या फडक्याखाली झाकून ठेवा.

ADVERTISEMENT

पीठाचे छोटे छोटे गोळे करून त्याची पारी लाटून घ्या

पारीमध्ये मिक्स ड्रायफ्रुटचे  सारण भरा आणि  दुमडून मुरड पाडा अथवा कातणीने करंजीचा शेप द्या.

सर्व करंज्या झाल्यावर वरच्या भाजून तूपाने ब्रश करा

बेंकीग ट्रेला तूपाचा हात लावा त्यावर मैद्याने डस्ट्रिंग रा  आणि  सर्व करंजी मांडून ठेवा.

ADVERTISEMENT

ओव्हन प्री हिट करून २८० सें. वर चाळीस मिनीटे करंज्या बेक करा.

करंजी ब्राऊन झाली की ओव्हन बंद करा. 

दिवाळीचा खास फराळ, मराठमोळ्या फक्कड रेसिपीज (Diwali Faral Recipes In Marathi)

साट्याची कंरजी (Layered Karanji Recipe In Marathi)

layered karanji recipe in marathi
karanji recipe in marathi

साटाच्या करंज्या म्हणजे अनेक पदर असलेली करंजी…ही करंजी करायला थोडी अवघड असली तरी दिसायला आणि चवीला मात्र अप्रतिम लागते. बऱ्याचदा गौरीगणपतीच्या फराळासाठी आणि लग्नात रुखवतीसाठी साट्याची करंजी केली जाते.

ADVERTISEMENT

साहित्य –

  • एक वाटी बारीक रवा
  • एक वाटी सुकं खोबरं
  • एक वाटी पिठी साखर
  • थोडा किसलेला सुकामवा
  • चारोळ्या
  • पाव किलो मैदा
  • एक किलो तूप
  • वाटीभर तांदळाची पिठी अथवा कॉर्न फ्लॉवर

कृती

रवा आणि सुकं खोबरे तूपावर भाजून घ्या

मग या सारणात पिठीसाखर, चारोळ्या, सुकामेवा मिसळा आणि डब्यात भरून ठेवा 

ADVERTISEMENT

करंजी करायच्या वेळी मैदा चाळून पाण्याचा आणि तूपाचा हात लावून घट्ट मळून घ्या

एक तास तो पाट्यावर मळून मऊसूत करून घ्या

साटा बनवण्यासाठी तूप आणि तांदळाची पिठी अथवा कॉर्नफ्लोवर एकत्र करून फेटून त्याची पेस्ट तयार करा

मैद्याचे समान तीन भाग करा 

ADVERTISEMENT

या गोळ्यांच्या पोळ्या लाटून घ्या

प्रत्येक पोळीवर साटा  लावा आणि मग त्यावर दुसरी पोळी ठेवत सर्व पोळ्या एकमेकांवर ठेवा

या  सर्व पोळ्यांची एकत्र वळकटी करू मग त्याचे तुमच्या करंजीच्या आकाराप्रमाणे इंचभर तुकडे पाडा.

लाटताना  कापलेली बाजू खाली आणि वर राहिल अशा पद्धतीने करंजीची पारी लाटून घ्या

ADVERTISEMENT

त्यात सारण भरा आणि पारी दुमडून कडेला मुडपून घ्या किंवा कातणीने कापून सुरेख आकार द्या.

काही करंज्या झाल्यावर त्या ओल्या फडक्याखाली झाकून ठेवा नाहीतर पारी सुकून करंजी  फुटण्याची शक्यता असते. 

दहा ते  पंधरा करंज्या झाल्या की मंद गॅसवर तूपात खरपूस तळून घ्या आणि टीश्यू पेपरवर काढा.

करंजी थंड झाली की हवाबंद डब्यात भरून ठेवा. 

ADVERTISEMENT

अनारसे बनवण्याची रेसिपी जाणून घ्या (Anarsa Recipe In Marathi)

ओल्या नारळाची करंजी रेसिपी (Olya Naralachi Karanji Recipe In Marathi)

Olya Naralachi  Karanji Recipe In Marathi
olya naralachi karanji recipe in marathi

ओल्या नारळाची करंजीदेखील महाराष्ट्रात सणासुदीला आवर्जून केली जाते. मात्र ही करंजी जास्त दिवस टिकू  शकत नाही. त्यामुळे या करंज्या एक ते दोन दिवसात खाव्या लागतात.

साहित्य –

  • एक कप मैदा
  • एक कप रवा
  • साजूक तूप
  • अर्धा कप दूध
  • तळण्यासाठी  तेल 
  • एक ते दीड कप ओला खोवलेला नारळ
  • पाऊण कप किसलेला गूळ

कृती

ADVERTISEMENT

गूळ आणि नारळाचा कीस एकत्र करून मोदकाच्या  सारणाप्रमाणे मंद गॅसवर शिजवावे

त्यात आवडीनुसार वेलची पूड घालावी

रवा आणि मैदा पाणी टाकून मळावा. मळताना त्यात तेलाचे मोहन टाकावे.

पीठ घट्ट मळून थोडावेळ झाकून ठेवावे.

ADVERTISEMENT

अर्ध्या तासाने पीठाला दूधाचा हात लावून छान मळून घ्यावे

पीठाचे छोटे गोळे करून त्याच्या पुऱ्या लाटाव्या

त्यात गुळखोबऱ्याचे सारण भरून हाताने मुरड पाडावी अथवा कातणीने करंचीचा आकार द्यावा. 

तेल तापवून त्यात या करंज्या तळून घ्याव्या. 

ADVERTISEMENT

ओल्या नारळाची रेसिपी मराठीत खास तुमच्यासाठी (Olya Naralachi Recipe In Marathi)

मावा करंजी रेसिपी मराठी (Mawa Karanji Recipe In Marathi)

mawa karanji recipe in marathi
mawa karanji recipe in marathi

जर तुम्हाला नेहमीच्या  बेसन अथवा रवा,खोबऱ्याच्या करंजीचा कंटाळा आला असेल तर तुम्ही खास माव्याच्या कंरज्या गणपतीत नैवेद्यासाठी करू शकता.

साहित्य –

  • पाव किलो खवा
  • एक वाटी पिठी साखर
  • थोडा सुकामेवा
  • एक वाटी खोबऱ्याचा कीस

कृती –

ADVERTISEMENT

मावा अथवा खवा तूपावर परतून घ्या

पिठीसाखर, सुकामेवा आणि भाजलेले खोबरे एकत्र करून त्याचे सारण तयार करा.

खव्याचा छोटा गोळा करून तो बटरपेपरवर थापून त्याची पारी तयार करा.

या पारीमध्ये सारण भरा आणि पारीला मुरड घालून ती बंद करा

ADVERTISEMENT

या कंरजीवर तुम्ही चांदीचा वर्ख लावू शकता.

ही न तळलेली कंरजी नैवेद्य दाखवण्यासाठी इन्स्ंटट करता येते. 

वाचा – पालक चकली (Spinach‌ ‌Chakli‌ Recipe In Marathi)

पुरण करंजी किंवा कडबू रेसिपी मराठी (Puran Karanji Recipe In Marathi)

puran karanji recipe in marathi
puran karanji recipe in marathi

पुरणाची कंरजीदेखील खास नैवेद्यासाठी केली जाते. महाराष्ट्रात या करंजीला कडबू असं ही म्हणतात. यासाठीच यंदा  गौरीगणपतीला स्वतः बनवा ही पुरणाची करंजी

ADVERTISEMENT

साहित्य-

  • एक वाटी मैदा
  • चवीपुरते मीठ
  • एक वाटी चणाडाळ
  • एक वाटी गुळ
  • सुकामेव्याचे बारीक तुकडे
  • तेल अथवा तूप
  • मीठ
  • वेलची पावडर

कृती –

पुरणपोळीसाठी जशी करतो तशी चणाडाळ शिजवून घ्यावी.

त्यात गूळ घालावा आणि घट्ट सारण करून घ्यावे

ADVERTISEMENT

पुरण  काढून त्यात सुकामेवा टाकावा

मैद्यामध्ये मोहन आणि मीठ टाकून  घट्ट पीठ मळून घ्यावे आणि ओल्या फडक्यात झाकून ठेवावे

अर्ध्या तासाने मैद्याची पुरी लाटून त्यात पुरण भरा आणि मुरड घालून करंजीचा आकार द्या

तूपात अथवा तेलात मंद गॅसवर कंरज्या तळून घ्या. 

ADVERTISEMENT

मटार करंजी रेसिपी मराठी (Matar Karanji Recipe In Marathi)

matar karanji recipe in marathi
karanji recipe in marathi

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी अथवा मधल्या वेळी खाण्यासाठी, एखाद्या खास कार्यक्रमासाठी तुम्ही मटार करंजीचा बेत करू शकता. या करंज्या खायला स्वादिष्ट  आणि खुशखुशीत लागतात.

साहित्य –

  • दोन कप गव्हाचे पीठ
  • दोन चमचे रवा
  • चवीपुरते मीठ
  • तळण्यासाठी तेल
  • पाव किलो मटार
  • दोन ते चार हिरव्या मिरच्या
  • पाच सहा लसूण पाकळ्या
  • एक आल्याचा तुकडा
  • अर्धी वाटी कोथिंबीर
  • अर्धी वाटी ओलं खोबरे
  • जिरे
  • हळद
  • एक चमचा साखर
  • एक चमचा लिंबाचा रस

कृती –

गव्हाचे पीठ, रवा आणि मीठ  एकत्र करून करंजीचे पीठ मळून घ्या. मळताना थोडं गरम तेलाचे मोहन त्यात टाका. अर्धा तास पीठ झाकून ठेवा.

ADVERTISEMENT

मटारचे दाणे मिक्समध्ये जाडसर वाटून घ्या. त्यात हिरवी मिरची, लसूण  आणि आल्याची पेस्ट मिसळा.

कढईत हळद आणि जिऱ्याची फोडणी द्या त्यात ही पेस्ट आणि मटारचे सारण परतून घ्या.

चवीपुरतं मीठ टाकून भाजी वाफेवर शिजू द्या

वरून ओले खोबरे, लिंबाचा रस, साखर, कोशिबीर पेरा

ADVERTISEMENT

मैद्याचे लहानन गोळे करा आणि पुरी लाटून घ्या.

पुरीमध्ये  सारण भरा आणि त्याला करंजीचा आकार द्या

मध्यम गॅसच्या आचेवर करंजी तळा

या कंरज्या गरमागरम सॉससोबत सर्व्ह करा. 

ADVERTISEMENT

रव्याची कंरजी रेसिपी मराठी (Rava Karanji Recipe In Marathi)

Rava Karanji Recipe In Marathi
karanji recipe in marathi

जर तुम्हाला थोड्या वेगळ्या पद्धतीच्या करंज्या ट्राय करायच्या असतील तर तुम्ही रव्याच्या कुरकुरीत कंरजी बनवू शकता. या कंरज्या देखील जास्त दिवस टिकतात.

साहित्य –

  • एक कप मैदा
  • चवीपुरतं मीठ
  • तळण्यासाठी तेल
  • एक कप किसलेले सुकं खोबरं
  • दोन चमचे तूप
  • अर्धा कप बारीक रवा
  • एक चमचा खसखस
  • अर्धा कप पिठी साखर
  • सुकामेवा 
  • पाव कप पिठीसाखर

कृती

एका कढईत सुके खोबरे, खसखस भाजून घ्या

ADVERTISEMENT

तूपावर रवादेखील खरपूस भाजा

सुकं खोबरं, खसखस आणि रवा एकत्र करा आणि सुकामेवा मिसळा.

सारण थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर मिसळा.

मिश्रण तुम्ही आधीच करून ठेवू शकता. 

ADVERTISEMENT

मैदा मीठ आणि तेलाचे मोहन टाकून मळून घ्या.

अर्ध्या तासाने त्याच्या त्याच्या पारी लाटून घ्या आणि करंजी बनवा. 

कंरज्या झाल्यावर त्या मंद आचेवर तेलात तळा आणि टीश्यू पेपरवर काढून ठेवा.

तिळाची कंरजी रेसिपी मराठी (Til Karanji Recipe In Marathi)

Til Karanji Recipe In Marathi)
karanji recipe in marathi

श्रावणात सदासुदीला काही  ठिकाणी तिळाची करंजी करण्याची पद्धत आहे. तीळ आरोग्यासाठी उत्तम असल्यामुळे पावसाळ्यात थंड हवामानात या करंज्या आवर्जून खाव्या.

ADVERTISEMENT

साहित्य –

  • पाव किलो रवा
  • मैदा पाव किलो
  • मीठ चवीनुसार
  • तळण्यासाठी तेल
  • अर्धा किलो पांढरे तीळ
  • अर्धा किलो गूळ
  • एक वाटी सुखं खोबरं किसेलेले
  • सुकामेवा 

कृती

तीळ भाजून मिक्सरमध्ये वाटून घ्या

त्यात भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचा  कीस, वेलची पूड, सुकमेवा मिसळा. 

ADVERTISEMENT

रवा आणि मैदा एकत्र करून त्याचे मीठ आणि पाणी टाकून पीठ मळून घ्या.

अर्ध्या तासाने त्याच्या छोट्या  छोट्या पुऱ्या बनवा

पारीमध्ये सारण  भरा आणि मुरड घालून करंजी तळा.

थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा. 

ADVERTISEMENT

गुजिया (Gujiya)

Gujiya
karanji recipe in marathi

उत्तर भारतात होळीच्या  सणाला गुजिया बनवल्या जातात. आजकाल संपूर्ण महाराष्ट्रात गुजिया मिळत असल्यामुळे घरच्या घरी करंजीचा प्रकार ट्राय करायला तुम्हाला नक्कीच आवडेल.

साहित्य –

  • एक कप मैदा
  • एक कप रवा
  • उकळलेले पाणी
  • एक वाटी पिठी साखर
  • एक वाटी भाजलेला खवा
  • एक वाटी भाजलेले डेसिकेडेड कोकनट
  • तळण्यासाठी तूप
  • सुकामेवा
  • चारोळी

कृती –

एका कढईत तूप गरम करा णि त्यात रवा, सुकं खोबरं भाजून घ्या. तूपात सुकामेवा भाजून त्याची पूड तयार करा. सारणात पिठीसाखर मिसळा.

ADVERTISEMENT

खवा तूपात भाजून ते मिसळा आणि मिश्रण एकत्र करा.

मैद्यात थोडं गरम मीठ टाकून घट्ट पीठ मळून अर्धा तास झाकून ठेवा.

पीठ मळताना मोहन घाला.

पीठाच्या पुऱ्या लाटून घ्या आणि त्यात सारण भरून करंजीप्रमाणे आकार द्या.

ADVERTISEMENT

तुम्ही करंजीच्या साच्याने करंजीचा आकार देऊ शकता. 

गुजिया तळून घ्या आणि थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा.

तुम्हाला हवं असेल तर साखरेच्या पाकात त्या डीप करा आणि सर्व्ह करा. 

पाकातील चंद्रकला करंजी रेसिपी मराठी (Chandrakala Karanji Recipe In Marathi)

Chandrakala Karanji Recipe In Marathi
karanji recipe in marathi

गुजियाप्रमाणेच चंद्रकला आणि लवंगलतिका हा संपूर्ण भारतातील एक लोकप्रिय पदार्थ आहे. सणासुदीला गोडाच्या पदार्थांमध्ये हे पदार्थ आवर्जून केले जातात.

ADVERTISEMENT

साहित्य –

  • एक कप रवा
  • अर्धी वाटी दही
  • अर्धी वाटी साखर
  • थोडं पाणी
  • मीठ चवीप्रमाणे
  • तूप
  • तळण्यासाठी तेल

कृती –

रव्यात थोडं दही आणि तूपाचं  मोहन टाकून पीठ मळून घ्या.

पीठ मऊ करण्यासाठी थोडावेळ झाकून ठेवा.

ADVERTISEMENT

साखर आणि पाणी एकत्र करून पाक तयार करा

पीठाच्या पुऱ्या लाटा त्यांना चंद्रकलेचा आकारात कापून घ्या

चंद्रकला तयार झाल्या की त्या तेलात खरपूस तळून घ्या.

तुपात बुडवून तयार करा या  पाकातील चंद्रकला.

ADVERTISEMENT

वरीलपैकी विविध आणि चविष्ट अशा करंजी रेसिपी मराठी नक्की करून पाहा आणि तुम्हाला हा लेख आवडला तर आम्हाला नक्की सांगा. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा (diwali wishes in marathi) तुम्हा सर्वांना.

03 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT