ADVERTISEMENT
home / मनोरंजन
अजून एका अभिनेत्याची ‘गुड न्यूज’ची घोषणा, दुसऱ्यांदा होणार बाबा

अजून एका अभिनेत्याची ‘गुड न्यूज’ची घोषणा, दुसऱ्यांदा होणार बाबा

गेल्या काही दिवसांपासून टीव्ही आणि बॉलीवूडसृष्टीमधून बऱ्याच ‘गुड न्यूज’ मिळत आहे. अभिनेत्री पूजा बॅनर्जी, करिना कपूर, अनुष्का शर्मा यांनी नुकतेच आपल्या गरोदरपणाची बातमी शेअर केली आणि आता त्यात अजून एका अभिनेत्याने आपल्याकडील गुड न्यूज शेअर केली आहे. करणवीर बोहरा आणि त्याची पत्नी टीजय पुन्हा एकदा आई – वडील होणार असल्याचं सोशल मीडियावरून शेअर करण्यात आलं आहे. करणवीरने स्वतः टीजयचे फोटो शेअर करत ही गोड बातमी आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. करणवीर आणि टीजयला आधीच दोन जुळ्या मुली आहेत. 2016 मध्ये लग्नानंतर अनेक वर्षांनी या दोघींना टीजयने जन्म दिला होता. आता पुन्हा एकदा हा आनंद आयुष्यात आल्याचं दोघांनीही म्हटलं आहे.

Good News: विरूष्काने दिली गोड बातमी, लवकरच येणार पाहुणा

करणवीरने भावूक होत केली पोस्ट

करणवीरने आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीपासून केली आणि त्याने अनेक चित्रपटांमधूनही काम केले आहे. करणवीरचे अनेक चाहते आहेत. करणवीरने आपल्या आयुष्यातील ही आनंदाची बातमी आपल्या सर्व चाहत्यांसह शेअर केली आहे. त्याने अत्यंत भावूक पोस्ट लिहित आपल्याला वाढदिवसाचं मिळालेलं सर्वात सुंदर गिफ्ट असल्याचं म्हटलं आहे. ‘देवच खरं तर निर्माता आहे, आपल्या हाताने तो प्रत्येक लहानसहान गोष्ट घडवत असतो. आपण फक्त त्याच्या हातचे खेळणं आहोत, तो जे काही देईल त्याची आपण वाट पाहत असतो. आम्हाला दिलेल्या या उत्तम आशिर्वादासाठी आम्ही अत्यंत आभारी आहोत. आम्हाला पुन्हा आईवडील बनविण्यासाठी त्याने आमची निवड केली असून आम्ही त्याचे शतशः आभारी आहोत. येणाऱ्या बाळाला खूप खूप प्रेम. आतापर्यंत सर्वात सुंदर वाढदिवसाचे गिफ्ट मला मिळाले आहे’ अशा आशयाची कॅप्शन करणवीरने फोटोखाली लिहिली आहे. इतकंच नाही तर त्याने काढलेले फोटोही तितकेच सुंदर आहेत. आपल्या पत्नीसह एका बाळाच्या निर्मितीचा असणारा एक सुंदर फोटो त्याने शेअर केला असून दोघांच्याही चेहऱ्यावरील आनंद दिसून येत आहे. दोघांवरही त्यांच्या मित्रमैत्रिणींनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. 

Good News: करिना कपूर पुन्हा होणार आई, घरात येणार पाहुणा

ADVERTISEMENT

करणवीर आणि टीजयला आहेत जुळ्या मुली

बेला आणि विएना या दोन जुळ्या मुलींना टीजयने 2016 मध्ये जन्म दिला. त्यानंतर टीजय आपल्या मुलींच्या संगोपनाचे अनेक व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावरून पोस्ट करताना दिसत असते. करणवीरच्या दोन्ही मुली गोंडस असून नेहमीच अॅक्टिव्ह असलेल्या दिसून येतात. अगदी लहानपणापासून ते आता चार वर्षांच्या होईपर्यंतचे त्यांचे अनेक व्हिडिओ दोघांच्याही सोशल अकाऊंटवर आहेत. आता या दोघीही ताई होणार असून त्या दोघींचाही फोटो करणवीरने पोस्ट केला आहे. याचवर्षी या बाळाचा जन्म होणार असून दोघींच्या फोटोसह 2020 असंही पुढे लिहिण्यात आलं आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर समीरा रेड्डी, भारती सिंह, सुरभी ज्योती या त्याच्या मित्रमैत्रिणींनी त्या दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. करणवीरचा आज वाढदिवस असून अनेकांनी त्याला या गुड न्यूजसह शुभेच्छा दिल्या आहेत आणि हा वाढदिवस अधिक गोड झाल्याचेही म्हटले आहे. तसंच टीजयने मनापासून करणला शुभेच्छा देत असाच आनंद आयुष्यात मिळत राहो असंही म्हटलं आहे.

Good News: अभिनेत्री पूजा बॅनर्जी होणार आई, लॉकडाऊनमध्येच केलं लग्न

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा  

28 Aug 2020
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT