ADVERTISEMENT
home / xSEO
karlyache fayde in marathi

जाणून घ्या कारल्याचे फायदे | Karlyache Fayde In Marathi

कारले (bitter gourd in marathi) ही एक कडवट, तुरट चवीची आरोग्यदायी फळभाजी आहे. कडवटपणामुळे अनेकांना कारलं खाण्याचा कंटाळा येतो. मात्र या कारल्याचे फायदे (karlyache fayde in marathi) अनेक आहेत. कारल्याचे फायदे वाचाल तर दररोज कारलं खाण्यास नक्कीच सुरूवात कराल. कारल्यामध्ये भरपूर प्रमाणात अॅंटी ऑक्सिडंट, फ्लेव्होनॉईड्स आणि इतर पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमच्या अनेक आरोग्य समस्या सहज दूर होतात. ज्यांना फिट राहायचं आहे त्यांच्यासाठी तर कारल्याशिवाय कोणताही डाएट प्लॅन अपूर्णच ठरेल. वजन कमी करायचं असो किंव्हा मधूमेह नियंत्रित ठेवायचा असो कारलं खाणं तुमच्या नक्कीच फायद्याचं ठरू शकतं. यासाठीच जाणून घ्या कारलं खाण्याचे आणि कारल्याचा रस पिण्याचे हे काही अफलातून फायदे. 

कारल्याचे फायदे (Benefits Of Bitter Gourd In Marathi)

Karlyache Fayde In Marathi
Benefits Of Bitter Gourd In Marathi

निरोगी जीवनशैलीसाठी आहारात कारल्याचा समावेश करण्याचा विचार करणार असाल तर त्याआधी जाणून घ्या कारल्याचे फायदे (Benefits Of Bitter Gourd In Marathi).

रक्त शुद्ध होते (Blood Purifier)

निरोगी राहण्यासाठी शरीरातील रक्त शुद्ध असायला हवे. रक्त अशुद्ध असेल तर अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. मात्र कारलं खाण्याचा सर्वात मोठा फायदा हा की त्यामुळे शरीरातील रक्त शुद्ध होते. जे लोक नियमित कारले खातात त्यांना आजारपण कमी येते शिवाय त्यांच्या त्वचेवर नैसर्गिक चमक असते. रक्त शुद्ध असल्यास तुमच्या त्वचेवर एक प्रकारचा नैसर्गिक ग्लो येतो. निरोगी राहण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी कारले फायदेशीर आहे. 

मधुमेहींसाठी उत्तम (Good for Diabetics)

मधुमेहींसाठी तर कारले (bitter gourd in marathi) हे एक रामबाण उपायच आहे. कारण मधुमेहींची मुख्य समस्या ही रक्तातील साखर अनियंत्रित होणे ही असते. पण कारल्यामुळे मधुमेहींच्या रक्तातील साखरेची पातळी लगेच कमी होते. ज्यामुळे शरीरात इन्सुलीनचे प्रमाण नियंत्रित राहते आणि कारल्यामुळे मधुमेहींचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. यासाठीच मधुमेहींनी नियमित आहारातून कारले खावे. 

ADVERTISEMENT

कोलेस्ट्रॉल कमी होते (Decrease Cholesterol Levels)

शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले तर त्याचा ताण ह्रदय आणि रक्ताभिरणावर होतो. रक्तवाहिन्या कोलेस्ट्ऱॉलमुळे ब्लॉक झाल्या तर ह्रदयाचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. मात्र जर तुम्ही नियमित कारले खात असाल तर तुमचे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. ह्रदयाचे आरोग्य जपण्यासाठी आहारात कारल्याचा समावेश करणं फायदेशीर ठरू शकतं. 

Benefits Of Bitter Gourd In Marathi
Benefits Of Bitter Gourd In Marathi

त्वचा निरोगी राहते (Promote Skin Health)

कारल्यामध्ये मुबलक अॅंटी ऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन्स असतात. ज्याचा तुमच्या त्वचेवर चांगला परिणाम होतो. यातील व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सीमुळे त्वचा निरोगी राहते. ज्यांना सतत पिंपल्स अथवा त्वचेच्या समस्या होत असतील अशा लोकांनी कारलं अथवा कारल्याचा रस घेतल्यास या समस्या कमी होतात आणि त्वचेवर नैसर्गिक ग्लो येण्यास मदत होते. यासाठीच त्वचा निरोगी आणि चमकदार राहावी यासाठी दररोज सकाळी कारल्याचा रस घ्या. 

केसांसाठी फायदेशीर (Good For Hair)

कारले (bitter gourd in marathi) त्वचेप्रमाणेच केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. धुळ, माती, प्रदूषण, केमिकल्सचा परिणाम केसांवर सतत होत असतो. केसांच्या समस्येसाठी अपुरे पोषणही कारणीभूत ठरू शकते. कारल्यामध्ये असलेले अॅंटि ऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन्स त्वचेप्रमाणेच केसांवरही चांगला परिणाम करतात. ज्यामुळे केसांमध्ये कोंडा होणे, केस गळणे अशा समस्या हळू हळू कमी होतात.

वजन कमी करण्यास उपयुक्त (Helps In Weight Loss)

वाढते वजन ही एक खूप मोठी समस्या आहे. कारण आजकाल आधुनिक जीवनशैली आणि चुकीचा आहार यामुळे झपाट्याने वजन वाढताना दिसून येते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही जर खूप प्रयत्न केले असतील तर आणखी हा एक उपाय जरूर करा. नियमित कारलं  खाण्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते. कारण कारल्यामध्ये खूप कमी कॅलरीज असतात शिवाय फायबर्सचे प्रमाण सर्वाधिक असते. कारलं खाण्यामुळे तुमचे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते कारण कारल्यामध्ये अॅंटी ऑक्सिडंट असतात.

ADVERTISEMENT

रोग प्रतिकार शक्ती वाढते (Boosts Your Immune System)

रोगप्रतिकार शक्ती कमी असेल तर कोणतेही आजारपण सहज होण्याचा धोका असतो. यासाठी प्रत्येकाने प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. कारल्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमची रोग प्रतिकार शक्ती मजबूत होते. ज्यामुळे आजारपण नेहमी दूर राहते. यासाठी घरात प्रत्येकाच्या आहारात नियमित कारले असावे. कोरोना सारख्या महामारीनंतर प्रत्येकाला प्रतिकार शक्ती वाढवण्याचे महत्त्व नक्कीच पटले असेल तेव्हा आता प्रत्येकाने आहारात कारल्याचा समावेश करायलाच हवा.

परवळचे आश्चर्यचकित करणारे फायदे | Benefits Of Pointed Gourd In Marathi

डोळ्यांसाठी गुणकारी (Great For Eyes)

मोबाईल आणि स्क्रीनच्या अती वापरामुळे अथवा वयानुसार अनेकांना डोळ्यांच्या समस्या जाणवू शकतात. यासाठीच डोळ्यांचे आरोग्य राखण्याचा  कारल्याचा रस घेणे हा उत्तम मार्ग आहे. कारल्यामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात आढळते. ज्याचा चांगला परिणाम तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यावर होतो. डोळ्यांना आजारपणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि दृष्टी तेजस्वी करण्यासाठी व्हिटॅमिन ए गरजेचे असते. जर तुम्ही नियमित कारले खाल्ले तर त्यामुळे शरीराला पुरेसे व्हिटॅमिन ए मिळते आणि डोळे निरोगी राहतात. 

यकृत करते स्वच्छ (Liver Cleanser)

यकृतासाठी तर कारले म्हणजे एक उत्तम औषधच आहे. कारण त्यामुळे यकृताचे कार्य सुधारते शिवाय यकृत डिटॉक्स होण्यास मदत होते. मद्यपान करणाऱ्या लोकांच्या यकृतामध्ये विषद्रव्ये साठल्यामुळे त्यांना यकृताच्या अनेक समस्या निर्माण होतात. अशा लोकांना इनफेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. मात्र कारलं खाण्यामुळे यकृत, आतडी आणि किडनी स्वच्छ आणि निरोगी होते. 

ADVERTISEMENT

कारल्याचा रस पिण्याचे फायदे (Benefits Of Karela Juice In Marathi)

कारल्याचा रस पिण्याचे फायदे
Benefits Of Bitter Gourd In Marathi

कारले (bitter gourd in marathi) ही एक बहुगुणी भाजी आहे. त्यामुळे कारल्याची भाजी अथवा कारल्याचे विविध पदार्थ खाण्यासोबतच दररोज कारल्याचा रस घेणे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. कारण कारल्याचा रसामधुन कारल्यामधील सर्व गुणधर्म सहज शरीरात जातात. कारल्याची भाजी करताना त्याचास कडूपणा कमी करण्यासाठी काही प्रक्रिया केल्या जातात. ज्यामध्ये कधी कधी कारल्यामधील पोषक घटक कमी होण्याची शक्यता असते. मात्र कारल्याच्या रसातून सर्व पोषक घटक शरीराला मिळतात. कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे नियमित कारल्याचा रस घेतल्यास आजारपण दूर राहते, हाडे मजबूत होतात आणि जखमा लवकर भरून निघतात, त्याचप्रमाणे यातील व्हिटॅमिन ए मुळे त्वचा आणि डोळे निरोगी राहण्यास मदत होते. यासोबतच कारल्यामध्ये झिंक, लोह, कॅल्शिअम, फायबर्स पोटॅशियम, फॉलेटही भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे संपूर्ण आरोग्य सुदृढ आणि ठणठणीत राहते. यासाठीच निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने कमीत कमी एक ग्लास कारल्याचा रस नियमित प्यायला हवा. हेल्दी लाईफसाठी व्हेजिटेबल ज्युस लिस्टमध्ये आता कारल्याचा समावेशही नक्की करा.

कारल्याचे फायदे आणि काही निवडक प्रश्न- FAQs 

karlyache fayde in marathi
Karlyache Fayde In Marathi

कारले दररोज खाणे योग्य आहे का ?

नियमित कारले खाण्यास काहीच हरकत नाही कारण कारले खाण्याचे शरीरावर फायदेच होतात. मात्र कारले प्रमाणात खावे अती प्रमाणात खाऊ नये. 

कारले कोणी खाऊ नये ?

गरोदर महिलांनी कारले खाऊ नये अथवा खाण्याची इच्छा असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण कधी कधी कारलं खाण्याचे दुष्परिणाम बराच काळ टिकण्याची शक्यता असते ज्याचा गर्भावर परिमाण होऊ शकतो. 

कारले खाण्याचे काही दुष्परिणाम आहेत का ?

कारले आरोग्यासाठी हितकारक असले तरी अती प्रमाणात कारले मुळीच खाऊ नये. असं केल्यास पोटदुखी, मळमळ, उलटी जुलाब होण्याची शक्यता असते.

ADVERTISEMENT
09 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT