ADVERTISEMENT
home / आरोग्य
Benefits Of Pointed Gourd In Marathi

परवळचे आश्चर्यचकित करणारे फायदे | Benefits Of Pointed Gourd In Marathi

पडवळची भाजी हे आपल्याला अनेकांना माहीत आहे. पण तुम्ही कधी परवळ हा प्रकार ऐकला आहे का? हो, तर तुम्हाला पडवळ (snake gourd) आणि परवळ (pointed gourd in marathi) यामधील फरक नक्कीच माहीत असेल. परवल या भाजीला वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळी नावे आहेत. हिंदीत याला पर्वल किंवा परवल असे म्हणतात. तामिळमध्ये ‘कोवाककई’, कन्नडमध्ये ‘थोंडे काई’, बंगाली, संस्कृत आणि आसामीमध्ये याला ‘पोटोले’ असे म्हणतात. याशिवाय खूप जण याला परोरा असे देखील म्हणतात. या भाजीला वेगवेगळी नावे असली तरी ही भाजी एकच आहे. तोंडलीसारखी दिसणारी भाजी चवीला थोडी वेगळी असते. तोंडलीची भाजी रेसिपी नक्की करा. परवळ ही थोडीशी काकडीसारखी असते. याचे वैज्ञानिक नाव (Trichosanthes dioica) असे म्हणतात. आयुर्वेदिक भाज्यांमध्ये परवळ pointed gourd in marathi याचा समावेश होतो. परवळमध्ये व्हिटॅमिन A,B1,B2,C,कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅनेशिअम, फॉस्फरस असे काही घटक असतात. जे अनेक आजारांवर फायदेशीर ठरतात. आयुर्वेदिक वनस्पती प्रमाणे ही आयुर्वेदिक भाजी असल्यामुळे तिचे फायदे हे भरपूर आहेत. जाणून घेऊया परवळचे असेच आरोग्यदायी फायदे 

परवळचे फायदे (Benefits Of Pointed Gourd In Marathi)

Benefits Of Pointed Gourd In Marathi

परवळची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. पद्धत कोणतीही असली तरी त्याचे फायदे अनेक आहेत. जाणून घेऊया pointed gourd in marathi

पचनाला करते मदत (Help To Digest)

परवळामध्ये असलेल्या बिया पचनासाठी फारच फायद्याच्या असतात. या बियांच्या सेवनामुळे पोटांचे विकार बरे होण्यास मदत मिळते. खूप जणांना विष्ठेचा त्रास असतो. खूप जणांचे पोट सहज साफ होत नाही. अशांसाठी ही भाजी खूपच फायद्याची आहे. परवळमधील घटक पोट साफ करण्यासाठी फारच फायद्याच्या ठरतात.  ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे अशांनी तर अगदी हमखास या भाजीचे सेवन करायला हवे.

साखर ठेवते नियंत्रणात (Control Blood Sugar Level)

असंतुलित अशा आहारामुळे खूप जणांना हल्ली मधुमेहाचा त्रास होऊ लागला आहे. जर तुम्हालाही तुमच्या लाईफस्टाईलमुळे मधुमेह झाला असेल तर आहारात परवळची भाजी असू द्या. यामधील घटक रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. याशिवाय याची पाने जर वाटली आणि त्याचा रस केला तरी देखील मधुमेहाचा त्रास कमी होऊ शकतो.

ADVERTISEMENT

प्रतिकारशक्ती वाढवते (Improve Immunity)

परवळमध्ये अनेक औषधीय घटक असतात. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत मिळते. हवामानाच्या बदलामुळे अनेकदा ताप, सर्दी होण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी जर तुम्ही परवळाची भाजी किंवा परवळाचा रस प्यायला तर तुम्हाला त्याचा फायदा होण्यास मदत मिळते.

वजन कमी करण्यास करते मदत (Helps To Lose Weight)

काही भाज्या खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक असलेले फायबर मिळते. अशा भाज्यांमध्ये परवळची भाजी मोडते. परवळच्या भाजीचे सेवन केल्यामुळे लगेच भूक लागत नाही. त्यामुळे साहजिकच ज्यांना वजन कमी करायचे आहे. अशांसाठी ही भाजी वरदान आहे. तुम्ही अगदी हमखास या भाजीचे सेवन करा तुम्हाला तुमच्या वजनात झालेला फरक नक्की जाणवेल.

अँटी-एजिंग (Anti Aging)

परवळमध्ये व्हिटॅमिन A, C असते या शिवाय यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट घटक हे अँटी- एजिंगसाठी फायदेशीर असतात. परवळची भाजी खाल्ल्यामुळे चेहऱ्यावर अकाली येणाऱ्या सुरकुत्या, काळंवडलेला चेहरा कमी होण्यास मदत मिळते. यामध्ये रक्त शुद्धीकरणाची क्षमता असल्यामुळे चेहरा स्वच्छ होण्यास मदत मिळते.

पाईल्सचा त्रास (Reduce Piles)

बद्धकोष्ठतेचा त्रास सुरु झाल्यानंतर खूप जणांना पाईल्सचा त्रास होऊ लागतो. पाईल्सचा त्रास म्हणजेच विष्ठेच्या जागेवरील मांस वाढू लागते. इतकेच नाही तर मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे हा त्रास जास्त होऊ लागतो. पाईल्सच्या त्रासामध्ये अनेकदा विष्ठेतून रक्तही जाते. अशावेळी विष्ठा सुलभ आणि सुरळीत होण्यासाठी तुम्ही परवळची भाजी खायला हवी. त्यामुळे तुमच्या पोटाचे विकार कमी होण्यास मदत मिळेल.

ADVERTISEMENT

व्हिटॅमिन्सचा साठा (Great Source Of Vitamin)

व्हिटॅमिन्सचा साठा हा शरीराच्या वेगवेगळ्या कारणांसाठी महत्वाचा असतो. उत्तम त्वचा, केस यासाठी व्हिटॅमिन्स फायद्याचे असतात. परवळमध्ये व्हिटॅमिन A,B1,B2,C,कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅनेशिअम, फॉस्फरस असे काही घटक असतात. ज्याचा फायदा वेगवेगळ्या पद्धतीने शरीराला होतो.

कोलेस्ट्राल ठेवते नियंत्रणात (Controls Cholesterol)

परवळमध्ये फॅटचे प्रमाण कमी असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळते. जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करायचे असेल तर तुम्ही आहारात परवळचे सेवन करायला हवे. त्याच्या सेवनामुळे तुमचे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.

रक्त शुद्धीकरणास करते मदत (Blood Purifier)

रक्ताचे शुद्धीकरणे हे वेगवेगळ्या कारणांसाठी फारच फायद्याचे असते. रक्त शुद्धीकरणामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत मिळते.  इतकेच नाही तर शरीराची शुद्धी झाल्यामुळे अनेक रोगापासून तुम्ही लांब राहता त्यामुळे परवळचे सेवन करायला हवे.

परवळच्या खास रेसिपी (Parwal Recipes)

बाजारात परवळची भाजी दिसली आणि तिचा आहारात समावेश करायचा असेल तर तुम्ही काही सोप्या पद्धतीने ही भाजी बनवू शकता. जाणून घेऊया परवळच्या अशाच काही रेसिपी

ADVERTISEMENT

परवळची सुकी भाजी (Parwalchi Sukhi Bhaji)

Parwalchi Sukhi Bhaji

खूप जणांकडे परवळची भाजी ही सुक्या पद्धतीने केली जाते. ही भाजी कशी करायची ते जाणून घेऊया
साहित्य:  ¼ किलो परवळ, सुकी लाल मिरची, तमालपत्र,जीरा, आलं-लसूण, कांदा, टोमॅटो, हळद, लाल तिखट, मीठ, कोथिबीर
कृती :
परवळ स्वच्छ करुन घ्या. त्याच्या साली काढून घ्या. एका कढईत तेल गरम करुन त्यामध्ये परवळ साधारण 3 मिनिटांसाठी फ्राय करा. जास्त वेळ शिजवू नका.
त्याच तेलात फोडणीसाठी तमालपत्र, जीरा, हिंग, लाल सुकी मिरचीची फोडणी द्या. फोडणी छान तडतडली की त्यामध्ये आलं-लसूण ठेचून घाला. कांदा घालून चांगला लाल होऊ द्या. त्यामध्ये हळद, तिखट, गरम मसाला घालून टोमॅटो घाला. तो चांगला गळला की, आता त्यामध्ये तेलात परतलेले परवळ घाला.
आता पूर्ण परवळ शिजू द्या. भाजी चांगली शिजली की, कोथिंबीर भुरभुरा. तुमची परवळची भाजी तयार

परवळची मिठाई (Parwal Mithai)

Parwal Mithai

परवळच्या भाजीपासून एक उत्तम मिठाई तयार केली जाते. तुमच्या कोणत्याही मिठाईला मागे टाकेल अशी ही परवळची भाजी आहे.
साहित्य:  6 परवळ, खवा, लागेल इतके मिक्स ड्रायफ्रुट्स (मनुका सोडून), साखर, वेलची पूड

कृती:

परवळच्या साली काढून घ्या. परवळाला उभी चीर देऊन ते तुटणार नाही याची काळजी घ्या. हाताने किंवा चमच्याने त्यामधील बिया काढून घ्या.
एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करुन त्यामध्ये साखर घाला. त्यामध्ये स्वच्छ केलेले परवळ घाला. परवळ चांगले शिजले आणि पारदर्शक झाले की ते बाहेर काढा.
एका भांड्यात तूप गरम करुन त्यामध्ये तुम्ही खवा आणि साखर घाला. त्यामध्ये वेलची पूड घाला. ड्रायफ्रुट घाला. तयार खवा परवळमध्ये भरा.
आवडत असल्यास वरुन चांदीचा वर्ख लावा. तुमची मिठाई तयार 

आचारी परवळ (Achari Parwal)

Achari Parwal

भाजी थोडी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला खायची असेल तर तुम्ही आचारी परवळ अशी भाजी करु शकता.
साहित्य:  2 मोठा चमचा धणेपूड, 1 मोठा चमचा बडीशेप, 1 मोठा चमचा जीरे, ¼ चमचा मेथी दाणे, 3-4 लाल सुक्या मिरच्या, कलौंजी, हळद, तिखट, मोहरी, हिंग,परवळ

ADVERTISEMENT

कृती:
एका पॅनमध्ये धणे, बडीशेप, जीरे, मेथी दाणे, सुक्या मिरच्या आणि कलौंजी भाजून घ्या. त्या चांगल्या भाजल्यानंतर वाटून त्याचा आचारी मसाला बनवा.
भाजी करण्यासाठी परवळच्या साली काढून स्वच्छ करुन ते उभे चिरा. कढईत तेल गरम करुन त्यामध्ये मोहरी, हिंग घालून त्यामध्ये परवळ घाला. हळद, तिखट घालून त्यामध्ये तयार केलेला आचारी मसाला घाला आणि भाजी चांगली शिजू द्या.
तुमची आचारी परवळ तयार.

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1. परवळचे सेवन कोणी करु नये?

परवळचे सेवन हे कोणालाही तोटयाचे नाही. अगदी कोणीही परवळचे सेवन करु शकतात. पण काही जणांना काही स्वरुपाच्या एलर्जीच असतात. जर तुम्हाला अशा काही एलर्जी असतील तर तुम्ही परवळचे सेवन टाळा.

2. परवळच्या बिया खाऊ शकतो का?

परवळाच्या बिया आरोग्यासाठी फारच फायद्याच्या असतात. त्याच्या सेवनामुळे पोटाचे विकार बरे होण्यास मदत मिळते. म्हणूनच भाजी करताना त्या बिया कोवळ्या असतील तर त्या तशाच वापरण्याचा सल्ला दिला जातो. काही जण या बिया सुकवून त्याचा वापर देखील करतात. 

3. कारलं आणि परवळ एकाच प्रकाराचे आहेत का?

नाही, कारल आणि परवळ या दोन्ही भाज्या वेगळ्या आहेत. त्या एका गटातही मोडत नाही. परवळामध्ये मोठ्या प्रमाणात मॉईश्चर असते. ते काकडीप्रमाणे असते. तर कारले हे अगदीच सुके असते. त्यामुळे या दोन्ही भाज्या सारख्या नाहीत तर वेगळ्या आहेत.

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

शेपूची भाजी खाण्याचे फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकीत | Shepuchi Bhaji Benefits In Marathi

मुंग्या येणे लक्षणं आणि घरगुती उपाय (Mungya Yene Upay In Marathi)

खसखस खाण्याचे फायदे, कसा करायचा उपयोग घ्या जाणून (Benefits Of Poppy Seeds In Marathi)

ADVERTISEMENT
22 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT