ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
केएल राहुलने केला आथियाबरोबर फोटो पोस्ट, लवकरच स्वीकारणार का नाते याबाबत चाहते उत्साही

केएल राहुलने केला आथियाबरोबर फोटो पोस्ट, लवकरच स्वीकारणार का नाते याबाबत चाहते उत्साही

बॉलीवूड आणि क्रिकेटर यांचे नाते आता काही नवीन नाही. युवराज सिंग – हेजल किच, विराट कोहली – अनुष्का शर्मा, झहीर खान – सागरिका घाटगे, हरभजन सिंग – गीता बसरा, हार्दिक पंड्या – नताशा अशा अनेक जोड्या सुखाने संसार करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून अनेक मुलींच्या गळ्यातील ताईत बनलेला उत्तम बॅट्समन म्हणून ओळख असणारा केएल राहुलदेखील यात मागे नाही. केएल राहुल याचे  नाव  नेहमीच आथिया शेट्टी अर्थात सुनील शेट्टीची मुलगी हिच्याबरोबर जोडण्यात आले आहे. दोघांनाही खूप वेळा एकत्र पाहिले गेले आहे आणि दोघेही नेहमीच एकमेकांच्या फोटोवरही कमेंट्स करत असतात. मात्र आपल्या नात्याबद्दल दोघांनीही कधीही होकार अथवा नकार दिलेला नाही. मात्र आथियाच्या वाढदिवसानिमित्त राहुलने पोस्ट केलेल्या फोटोमुळे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. 

चित्रीकरणादरम्यान महिलेला छेडल्याप्रकरणी या प्रसिद्ध अभिनेत्याला अटक, चित्रपटातून बाहेर

राहुल आणि आथिया लवकरच करणार का लग्न?

केएल राहुल सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहे. मात्र आथियाच्या फोटोंवर कमेंट्स  आणि इमोजी द्यायला अजिबात विसरत नाही. आथिया शेट्टीचा नुकताच वाढदिवस झाला आणि राहुलने आथियाबरोबरील एक फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला ज्याला कॅप्शन दिली ‘मॅड चाईल्ड’ अर्थात ‘वेडी मुलगी’. आथिया आणि राहुल गेले काही वर्ष एकत्र आहेत आणि राहुलच्या खेळावर अथवा फोटोंवर केवळ आथियाच नाही तर तिचे वडील सुनील शेट्टीही कमेंट देत असतात.  त्यामुळे या दोघांमध्ये मैत्रीपेक्षाही अधिक काहीतरी आहे असं त्यांच्या चाहत्याना वाटत आहे. मात्र कधीही दोघांनीही कबूल केलेले नाही. पण इतर जोड्यांप्रमाणे दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार का आणि आपल्या नात्याचा स्वीकार करणार का असा प्रश्न आता त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. आथियाने आतापर्यंत बॉलीवूडमध्ये केवळ दोन चित्रपट केले आहेत. तिचा अजूनही बॉलीवूडमध्ये जम बसलेला नाही. मात्र अनेक फॅशन शो आणि ब्रँडसाठी आलियाचे नाव पुढे येते. कारण आलियाचा फॅशन सेन्स खूपच चांगला आहे. त्यामुळे आलिया आता चित्रपटातच राहते की फॅशनच्या दुनियेत काही पुढे करते हेदेखील पाहावे लागणार  आहे. पण ती आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमीच अॅक्टिव्ह असते आणि खूप मजेशीर पोस्ट करत असते. त्यामुळे ती अतिशय मस्तीखोर असावी असे तिच्या  चाहत्यांना वाटते. आता राहुलच्या पोस्टनंतर तर हा अंदाज नक्कीच खरा ठरला असेल. 

Bigg Boss 14: जास्मिनला वाचवल्यामुळे एजाज-पवित्रामध्ये भांडणाची ठिणगी

ADVERTISEMENT

राहुल नेहमीच करतो आथियाच्या पोस्टवर कमेंट

आथियाने शेअर केलेल्या पोस्टवर केएल राहुलची कमेंट नाही असं सहसा होत नाही. त्यामुळे या दोघांमध्ये नक्कीच मैत्रीपेक्षा काहीतरी अधिक आहे अशी चर्चा गेले  काही वर्ष रंगली आहे. मात्र अजूनही दोघांनी याबाबत खुलासा केलेला नाही. पण आपल्या सोशल मीडियावर दोघेही एकत्र फोटो पोस्ट करायला अथवा कमेंट करायला लाजत नाहीत. दोघेही बिनधास्त एकमेकांना सोशल मीडियावर एकमेकांबद्दल काय वाटते ते सांगत असतात. पण तरीही आजपर्यंत दोघांनाही कोणतीही रोमँंटिक पोस्ट टाकली नसली तरीही आथियाच्या वाढदिवसाला पोस्ट केलेला फोटो बरंच काही सांगून जात  आहे. दोघांची जोडीही कमाल दिसत आहे. त्यामुळे आता अजून एक बॉलीवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटर अशी जोडी लवकरच पाहायला मिळेल अशी चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. ही जोडी कधी आपल्या लग्नाची तारीख जाहीर करणार याचीही उत्सुकता आता चाहत्यांना लागली आहे आणि लवकरच हा दिवस येऊ दे अशी इच्छाही. 

इन्स्टाग्रामवर दीपिकालाही मागे टाकलं श्रद्धा कपूरने, सर्वात जास्त आहेत फॉलोव्हर्स

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

05 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT