ADVERTISEMENT
home / आरोग्य
know-how-excessive-consumption-of-caffeine-is-harmful-in-marathi

कॅफिनचे अधिक सेवन आहे शरीरासाठी घातक, तज्ज्ञांकडून सल्ला

जेव्हा जेव्हा माणूस थकतो तेव्हा आपल्याला उत्साह यावा यासाठी चहा अथवा कॉफीचे सेवन करण्यात येते. चहा आणि कॉफीत आढळणारे कॅफीन तुम्हाला एनर्जी अर्थात अंगात उत्साह आणण्यास मदत करतात. विशेषतः ज्या व्यक्ती नाईट शिफ्टमध्ये काम करतात, त्यांच्यासाठी कॅफेन उत्साही राहण्यासाठी केवळ साधन नाही तर हे जागं राहण्यासाठीही खूपच महत्त्वाचे आहे. कॅफेनपासून अनेक फायदे मिळतात यामध्ये कोणतंही दुमत नाही. अर्थात तुमचा रक्तदाब जर लो असेल तर कॅफनचे सेवन लाभदायी ठरते. तसंच तुम्हाला सर्दी खोकला असेल तर कॉफीच्या सेवनाने अधिक चांगले वाटते. पण कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन हे नक्कीच शरीराला घातक ठरते. हेच समीकरण कॅफेनलादेखील लागू होते. यामुळे तुम्हाला दुष्परिणामांनाही सामोरे जावे लागू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे. कॅफेनच्या अत्याधिक सेवनाने नक्की काय त्रास होतो हे जाणून घेऊया. 

हृदयावर होतो वाईट परिणाम 

जेव्हा तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त कॅफेनचे सेवन करता, तेव्हा याचा परिणाम म्हणजे तुमचा रक्तदाब अधिक वाढतो. जे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. तुमच्या हृदयाचे ठोके यामुळे वाढण्याची शक्यता असते. ज्यामुळे तुम्हाला आरोग्याची समस्या चालू होते. त्यामुळे तुम्ही जर रक्तदाबाचे रूग्ण असाल तर तुम्ही याची विशेष काळजी घ्यायला हवी. तुम्ही दिवसातून किती कप चहा अथवा कॉफी पित आहात याकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यायला हवे. तुम्ही अत्यंत मर्यादित आणि प्रमाणात याचे सेवन करावे. 

डोकेदुखी आणि चिंता करण्याची समस्या 

तसं तर थकवा आल्यावर अथवा डोकेदुखी होत असेल तर आपण चहा वा कॉफीचे सेवन करतो. यामुळे शरीराचा अलर्टनेस वाढतो. वास्तविक एडेनोसाईनच्या प्रभावाला ब्लॉक करण्यासाठी याची मदत मिळते. तसंच एड्रेलाईन रिलीज करण्यासाठी हे ट्रिगर करते. ज्यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जेचा स्तर वाढतो. पण याचे सेवन अधिक केल्यास, तुम्हाला डोकेदुखी, चिंता आणि भय या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे याचे तुम्ही वेळीच योग्य सेवन करायला हवे. 

शरीर डिहायड्रेट होणे 

कॅफिन एक डाययुरेटिकप्रमाणे काम करते. ज्याचा अर्थ आहे की, तुम्हाला सतत लघ्वीसाठी जावे लागते. तसंच वारंवार लघ्वीला गेल्यामुळे शरारामध्ये अधिक प्रमाणात मीठ आणि पाणी निघून जाते आणि शरीर डिहायड्रेट होते अर्थात शरीराची हायड्रेशन लेव्हल कमी होते. त्यामुळे तुम्ही कॅफेनचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. तसंच तुम्ही कॅफेन घेत असाल तर दिवसभरात आपण किती पाणी पित आहोत याकडे नक्की लक्ष द्या. दिवसभरात किमान 8-9 ग्लास पाणी प्यावे. डिहायड्रेशन टाळण्यासाठी तुम्ही पाणी पिण्याची सवय लावायला हवी. 

ADVERTISEMENT

झोपेची समस्या 

कॅफेनमध्ये अशी काही तत्व असतात, जी तुमच्या शरीराला अलर्ट करण्यास फायदेशीर ठरतात. त्यामुळे आवश्यकतेपेक्षा अधिक कॅफेनचे सेवन केल्यास, तुम्हाला झोपेच्या समस्येला सामोरे जावे लागते. असे पाहण्यात आले आहे की, ज्या व्यक्ती अधिक कॅफेनचे सेवन करतात, त्या व्यक्तींना रात्री उशीरापर्यंत झोप येत नाही. अशा व्यक्ती अनेकदा इनसोमनिया समस्येशी झगडतात. तसंच तुम्ही नेहमी हे लक्षात ठेवा की, झोपण्याच्या आधी किमान तीन – चार तास आधी तरी कोणत्याही पद्धतीचे कॅफेन तुम्ही पिऊ नये अथवा पदार्थांमधूनही घेऊ नये. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

12 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT