ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
डिटॉक्स कॉफी

वजन कमी करण्यासाठी असे करा कॉफीचे सेवन आणि बघा फरक

 खूप जणांसाठी कॉफी म्हणजे जीव की प्राण.. अगदी कोणत्याही वेळी त्यांना कॉफी दिली की ते पिऊ शकतात. पण कॉफी पिताना शरीरात कॅफेन जाणे हे चांगले असले तरी त्याचा खरा फायदा मिळवण्यासाठी म्हणजे त्यामुळे मेटाबॉलिझम चांगले करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी काही बदल करायला हवेत. म्हणजे तुम्हाला त्याचा अधिक फायदा होईल. जे खेळतात किंवा व्यायाम करतात त्यांना वर्कआऊटच्या आधी गरम गरम काळी कॉफी म्हणजेच ब्लॅक कॉफी पिताना तुम्ही अनेकदा पाहिले असेल पण त्याला थोडा ट्विस्ट देऊन कॉफीचे असे सेवन केले तर त्याचा फायदा थेट वजन कमी करणाऱ्यांसाठी फायद्याचे ठरणार आहे. जाणून घेऊया कॉफी नेमकी कशी प्यावी ते

डिटॉक्सवाली कॉफी

डिटॉक्सवाली कॉफी

आता या कॉफीला आपल्याला कॉफी म्हणून चालणार नाही. त्यामुळे त्याला आपण डिटॉक्सवाली कॉफी असे म्हणूया. एका ग्लासात एक चमचा कॉफी घेऊन त्यामध्ये पाणी घालून ती चांगली उकळून घ्या. कॉफी ग्लासात घेतली की, त्यामध्ये तुम्ही थोडा लिंबू पिळा आणि हळद घाला. कॉफीमध्ये हे दोन घटक घातल्यानंतर तुमच्या कॉफीची चव नक्कीच बदलते. पण त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यात मदत मिळते. जर तुम्हाला डिटॉक्स करायचे असेल तर तुम्ही अगदी नक्कीच अशा स्वरुपाची कॉफी प्यायला हवी. या कॉफीमुळे पोट साफ होण्यास मदत मिळते. त्वचा अधिक चांगली दिसू लागते. इतकेच नाही तर या कॉफीमुळे तुमचे वजनही कमी होऊ लागते. तुम्हाला आलेला आळस निघून जातो.
दिवसातून एकदा तुम्ही अशी कॉफी करुन प्या तुम्हाला नक्की फरक जाणवेल 

तूपवाली कॉफी

तूप आणि कॉफी या दोघांचा उपयोग वजन कमी करण्यासाठी केला जातो. तेलापेक्षा तूप हे कायमच पौष्टिक आहे. तुपाचे सेवन केले की वजन नियंत्रणात राहते. त्वचेला चांगली चमक येते. तुम्हाला कॉफी प्यायला आवडत असेल तर तुम्ही कॉफीमध्ये तूप घालून प्यायला हव 

एका ग्लासात एक चमचा किंवा तुम्हाला आवडेल अशी कॉफी घ्या. त्यात पाणी घालून ती चांगली उकळून घ्या. तयार काळी कॉफी घेऊन तुम्ही त्यामध्ये एक चमचा तूप घालायचे आहे. घरगुती तूप असल्यास खूपच चांगले. त्यामुळे अधिकच फरक जाणवतो. 

ADVERTISEMENT

दिवसातून एकदा तुम्हाला अशी तूप कॉफी प्यायला काहीच हरकत नाही. ही कॉफी चवीला अजिबात वेगळी लागत नाही. त्यामुळे फारसा काही फरक पडत नाही. 

कॉफी पिताना

कॉफीचे फायदे अनेक आहेत. पण कॉफीेचे अतिसेवन देखील त्रासदायक ठरु शकते. कॉफीचे सेवन करताना काही गोष्टींचा विचार करायला हवे.

  1. कॉफीचे डाग दातांवर राहिले तर दात पिवळे दिसू लागतात. त्यामुळे त्याचे सेवन केल्यानंतर तुम्ही दात घासायला हवे. 
  2. कॉफी सतत प्यायल्यामुळे त्याचा परिणाम दिसत नाही. त्यामुळे त्याचे सेवन केल्यानंतर तुम्ही काही काळ बंद करा किंवा दिवसातून एकदा कॉफी प्या. त्यामुळे त्याचा परिणाम दिसून येईल. 


आता नक्की अशा स्वरुपाची कॉफी प्या.

कॉफी स्क्रबने आणि त्वचेवर अधिक चमक, सोपी पद्धत

ADVERTISEMENT
24 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT