ADVERTISEMENT
home / मेकअप
हिवाळ्यात चेहऱ्यावर फाऊंडेशन लावण्यापूर्वी अशा घ्या काळजी

हिवाळ्यात चेहऱ्यावर फाऊंडेशन लावण्यापूर्वी अशा घ्या काळजी

मेकअप चांगला दिसण्यासाठी आधी मेकअप बेस करावा लागतो. प्रायमर आणि फाऊंडेशनच्या मदतीने तुम्ही मेकअपचा बेस तयार करता. मेकअप करताना फाऊंडेशनमुळे तुमचा स्किन टोन इव्हन म्हणजेच एकसमान दिसू लागतो. यामुळे तुम्हाला चेहऱ्यावर एक स्मूद टेक्चरही मिळतं. पण ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने फाऊंडेशन लावता. शिवाय प्रत्येक ऋतू नुसार फाऊंडेशन लावण्याच्या पद्धतीमध्ये थोडा बदल करणं गरजेचं आहे. जर तुम्ही हिवाळ्यात म्हणजेच थंडीत तुमची त्वचा कोरडी झालेली असते. अशा त्वचेवर तुम्ही थेट फाऊंडेशन लावलं तर ते काही वेळाने क्रॅकी दिसू शकतं. यासाठीच जाणून घ्या या दिवसांमध्ये त्वचेवर फाऊंडेशन लावताना नेमकी  काय काळजी घ्यावी.

चेहरा मॉईस्चराईझ करा –

कधीही मेकअप करण्यापूर्वी त्वचा मॉईस्चराईझर करणं खूप गरजेचं आहे. मात्र हिवाळ्यात तुमच्या  त्वचेला मॉईस्चराईझिंगची जास्त गरज असते. त्यामुळे नेहमीप्रमाणे तुमची त्वचा आधी क्लिन आणि मग मॉईस्चराईझ करण्यास विसरू नका. कारण जर तुम्ही त्वचेला मॉईस्चराईझ न करताच मेकअप केला तर काही वेळातच तुमचं फाऊंडेशन खराब होऊन मेकअप क्रॅकी होऊ शकतो. हिवाळ्यात ही समस्या तुम्हाला सतत जाणवते यासाठी फाऊंडेशन लावण्यापूर्वी त्वचा मॉईस्चराईझ करण्याची टाळाटाळ मुळीच करू नका. 

Shutterstock

ADVERTISEMENT

आधी हायड्रेडिंग प्रायमर लावा –

मेकअप करताना फाऊंडेशन लावण्याआधी चांगला प्रायमर लावावं. मात्र जर तु्म्ही थंडीत मेकअप करणार असाल तर प्रायमर लावण्याची जास्त गरज आहे. जर तुम्ही या काळात फाऊंडेशन आधी हायड्रेटिंग प्रायमर लावलं तर तुमचा मेकअप जास्त काळ टिकतो. शिवाय त्वचा आतून जास्त काळ हायड्रेट राहण्यास मदत होते. हायड्रेटिंग प्रायमरमुळे तुमची त्वचा कोरडी होत नाही आणि अशा त्वचेवर फाऊंडेशन व्यवस्थित लागतं. यासाठी तुम्ही हायड्रेटिंग करणारं कोणतंही जेलबेस  अथवा वॉटरबेस फाऊंडेशन वापरू शकता. 

Shutterstock

फाऊंडेशनचा प्रकार योग्य निवडा –

वातावरणातील बदलानुसार तुमच्या त्वचेतही अनेक बदल होतात. त्यामुळे त्वचेच्या गरजेनुसार तुम्हाला फाऊंडेशनचा प्रकार निवडावा लागेल. थोडक्यात थंडीच्या दिवसांमध्ये पावडर बेस फाऊंडेशन तुमच्या मुळीच उपयोगाचं नाही. कारण त्यामुळे तुमची त्वचा मॅट आणि कोरडी दिसेल. कारण पावडर बेस फाऊंडेशन तुमच्या त्वचेतील तेल शोषून घेईल आणि त्वचा निस्तेज दिसू लागेल. या दिवसांसाठी खास क्रिम बेस, जेल बेस अथवा वॉटर बेस फाऊंडेशन निवडा.  अशी फाऊंडेशन तुमच्या त्वचेवर सहज पसरतात आणि त्वचेला हायड्रेट ठेवतात.

ADVERTISEMENT

Shutterstock

फाऊंडेशन लावताना काय काळजी घ्याल –

हिवाळ्यात फाऊंडेशन कसं लावावं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. कारण या दिवसांमध्ये तुमची त्वचा आधीच खूप कोरडी आणि निस्तेज झालेली असते. अशा त्वचेवर ब्रशने फाऊंडेशन लावल्यास त्वचेला त्रास होऊ शकतो. कारण  कोरडी झाल्यामुळे तुमची त्वचा अती संवेदनशील होते. ब्रशमुळे अशा त्वचेवर ओरखडे उठू शकतात. तुम्ही हिवाळ्या ब्युटी ब्लेंडर अथवा हाताच्या बोटांनी फाऊंडेशन लावू शकता. ब्युटी ब्लेंडरने फाऊंडेशन लावण्यासाठी ते काही वेळ पाण्यात बूडवून ठेवा. ज्यामुळे ते मूळ आकारापेक्षा दुप्पट मोठं होईल. मग त्यातील पाणी नीट पिळून घ्या आणि अशा मऊ झालेल्या ब्युटी ब्लेंडरने चेहऱ्यावर फाऊंडेशन लावा. लक्षात ठेवा फाऊंडेशन लावताना ब्युटी ब्लेंडर चेहऱ्यावर घासू नका तर फक्त डॅब करा. 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

फाऊंडेशन आणि कन्सिलरची शेड निवडताना काय घ्यावी काळजी

फाऊंडेशन लावण्यासाठी करु शकता या ब्रशचा उपयोग

तेलकट त्वचेसाठी बेस्ट फाऊंडेशन (Best Foundation For Oily Skin In Marathi)

03 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT