ADVERTISEMENT
home / मनोरंजन
राकेश बापटला शेट्टी कुटुंबाकडून पसंती, काय आहे राकेशचं करिअर

राकेश बापटला शेट्टी कुटुंबाकडून पसंती, काय आहे राकेशचं करिअर

राकेश बापट (Raqesh Bapat) हे मराठमोळं नाव सध्या गाजतंय ते म्हणजे शमिता शेट्टी (Shamita Shetty) सह त्याचं नाव जोडलं गेल्यामुळे. पण राकेशने आपल्या मेहनतीने या इंडस्ट्रीमध्ये आपली अशी ओळख गेल्या काही वर्षात निर्माण केली आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटांमधील एक नावाजलेला चेहरा म्हणजे राकेश बापट. Bigg Boss OTT मध्ये राकेश बापट आणि शमिताची ओळख झाली आणि यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. तर आता दोघांच्याही लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. इतकंच नाही तर शमिताची आई आणि शमिताची बहीण शिल्पा शेट्टी कुंद्रा (Shilpa Shetty Kundra) यांनीही राकेशला आपली पसंती दर्शविली असल्याचे दिसून येत आहे. नुकताच राकेश शेट्टी कुटुंबासह अलिबागला पिकनिकला जाताना आणि त्याशिवाय शिल्पाची मुलगी समिशा (Samisha Kundra) हिच्या वाढदिवसाला दिसला. त्यामुळे राकेश शेट्टी कुटुंबात चांगलाच रूळला असल्याचेही दिसून येत आहे. तर राकेशच्या कुटुंबीयांनीही शमिताला पसंती दर्शविली होती. 

अधिक वाचा – माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये नव्या व्यक्तिरेखेची एन्ट्री, कोण आहे जेसिका?

मॉडेल आणि अभिनेता राकेश 

राकेशने आपल्या करिअरची सुरूवात एक मॉडेल म्हणून सुरू केली तर ‘तुम बिन’ या हिंदी चित्रपटातून त्याने बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. राकेशला या चित्रपटाने एक वेगळी ओळख तर मिळवून दिली. मात्र त्याला या इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागली आहे. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये राकेशने अनेक चित्रपट केले. तर ‘सात फेरे’, ‘कुबूल है’, ‘मर्यादा’ अशा अनेक हिंदी मालिकांमध्येही राकेशने काम केले आहे. त्याला सोशल मीडियावरही तुफान फॅन फॉलोईंग आहे. 

केवळ अभिनयच नाही तर राकेश हा शिल्पकलेतही तितकाच पारंगत आहे. राकेश दरवर्षी गणपतीची उत्तम मूर्ती बनवून घरात गणपतीची पूजा करतो. इतकंच नाही तर टीव्ही मालिकेतील अनेक कलाकारांनाही त्याने त्याची ही कला शिकवली आहे. याशिवाय राकेश उत्तम चित्रकार असून बासरी वाजवण्यातही पारंगत आहे. राकेशकडे अनेक कला असून तो नेहमीच एक उत्तम माणूस म्हणूनही अनेकांसमोर आला आहे. याशिवाय राकेशने हँडमेड शूज बनविण्याची कलाही पारंगत केली आहे. सध्या तो स्वतः शूज तयार करून स्वतः वापरत आहे आणि ही कला लवकरच तो त्याच्या चाहत्यांसमोरही घेऊन येणार असल्याचे त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. याशिवाय राकेश नव्या वर्षामध्ये अभिनय आणि निर्मितीसंस्था अशी दुहेरी जबाबदारीदेखील सांभाळणार आहे.

ADVERTISEMENT

अधिक वाचा – संगीतकार – गायक बप्पीदा यांचे जगाला ‘अलविदा’

लवकरच करणार साखरपुडा 

बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर लव्ह बर्ड्स (Love Birds) शमिता शेट्टी आणि राकेश बापट हे सध्या एकमेकांबरोबर चांगला वेळ घालवत आहेत. दरम्यान हे दोघे लवकरच साखरपुडा (Raqesh Bapat and Shamita Shetty are getting engaged soon) करणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. मात्र यावर अजून कोणतेही शिक्कामोर्तब झालेले नाही. पण राकेश आणि शमिता मात्र सध्या त्यांचा हा प्रेमाचा प्रवास नक्कीच एकमेकांबरोबर साजरा करताना दिसत आहेत. व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) च्या निमित्ताने दोघेही सतत एकमेकांसह आहेत. याशिवाय शमिताच्या वाढदिवसालाही ती पूर्ण दिवस आपल्या कुटुंबासह आणि राकेशसह एकत्र होती. आता राकेश नक्की आपल्या कलांपैकी कोणती कला व्यवसाय म्हणून पुढे घेऊन जातोय आणि त्याचे करिअर कशा पद्धतीने घडवतोय हेदेखील त्याच्या चाहत्यांना पाहायचे आहे. तर लवकरच राकेश आणि शमिता लग्नबंधनात अडकावेत असंही त्यांच्या चाहत्यांना वाटते आहे. 

अधिक वाचा – गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये बप्पी लाहिरीचं नाव का नोंदवलंय, जाणून घ्या

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
17 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT