ADVERTISEMENT
home / मनोरंजन
‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये नव्या व्यक्तिरेखेची एन्ट्री, कोण आहे जेसिका

‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये नव्या व्यक्तिरेखेची एन्ट्री, कोण आहे जेसिका

टेलीव्हिजन आणि प्रेक्षकांचे एक अतूट नातं असतं. एकदा एखादी मालिका प्रेक्षकांना आवडली की तिचा टीआरपी गगनाला भिडू लागतो. मालिकेत काम करणारी पात्रं त्यांना आपल्या घरातील, शेजारी राहणारी वाटू लागतात. प्रेक्षक अशा मालिकांमधील भूमिकांसोबत सहज समरस होतात. मग अशा वेळी मालिकात घडणाऱ्या गोष्टी प्रेक्षकांच्या मनाप्रमाणेच घडाव्या असंही त्यांना वाटू लागतं. सध्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने असंच लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. या मालिकेतील नेहा आणि यशची जोडी, यश आणि समीरची मैत्री, यश आणि आजोबाचं नातं, ऑफिस आणि घरातील मंडळी, नेहाच्या शेजारी राहणारे काकाकाकू आणि परीचा निरागसपणा प्रेक्षकांना खूप आवडत आहे. सहाजिकच इतर मालिकांपेक्षा या मालिकेला प्रेक्षकांकडून जास्त चांगला प्रतिसाद मिळतोय. मात्र या मालिकेत आता प्रेक्षकांना एक नवं वळण पाहायला मिळणार आहे. हा बदल प्रेक्षक सहन करू शकतील का?

‘रॉकेट बॉईज’ आधुनिक भारत घडवणाऱ्या शास्त्रज्ञांना मानवंदना – सिद्धार्थ रॉय कपूर

काय आहे हे नवं वळण

माझी तुझी रेशीमगाठमध्ये नुकतंच प्रेक्षकांनी पाहिलं कि नेहाला देखील तिचं यशवर प्रेम असल्याची जाणिव होतेय. पण नेहाने अजून यशसमोर ही गोष्ट कबूल केली नाही आहे. याच भावनेतून तिने ऑफिस सोडून जाण्याचा निर्णय मागे घेतला आहे आणि यशने तिचा मान राखत सर्वांसमोर नेहाला एक चांगली सहकारी म्हणून कंपनीने जाऊ दिलं नाही असं सांगितलं आहे. आता यशच्या चांगल्या स्वभावामुळे आणि त्याच्या सहवासात येणाऱ्या अनुभवातू हळू हळू नेहा ही गोष्ट स्वीकारेल आणि यशला जाहीर प्रेमाची कबुली देईल असं प्रेक्षकांना वाटत आहे. मात्र सरळ मार्गाने प्रेमकहाणी मालिकेत कधीच पूर्ण होऊ शकत नाही. प्रेमकथेमध्ये काहितरी ट्विस्ट असायलाच हवा अशी प्रथाच जणू टेलीव्हिजन विश्वात आहे. यासाठीच आता या मालिकेत एक नवं वळण देण्यात येणार आहे. आता या मालिकेत जेसिका नावाच्या नवीन व्यक्तिरेखेची एन्ट्री होणार आहे.

अनुपम खेर यांच्या आईनेही धरला ‘श्रीवल्ली’वर ठेका, व्हिडिओ झाला व्हायरल

ADVERTISEMENT

कोण आहे जेसिका ?

जेसिकाची व्यक्तिरेखा रशियन अभिनेत्री जेन कटारिया साकारणार आहे. यशचा मित्र समीर म्हणजेच अभिनेता संकर्षण कऱ्हाडेची या मालिकेत मुख्य भूमिका आहे. विशेष म्हणजे यशच्या प्रेमकहाणीला पुढे नेण्यात समीरचा खूप मोठा वाटा असणार आहे. आता समीर जेसिका ही यशची एक्स गलफ्रेंड असल्याचं नेहाला सांगणार आहे. सहजिकच जेसिकाच्या एन्ट्रीमुळे एक नवा ट्विस्ट निर्माण होईल. नेहाला यशची एक्स गर्लफ्रेंड जेसिकामुळे जेलसी निर्माण होणार हे समीरला पक्कं माहीत आहे. पण ही गोष्ट यशला देखील समजेल का? यशसाठी असलेलं प्रेम जेसिकाच्या येण्यामुळे नेहा व्यक्त करू शकेल का? हेच आता प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.

‘लग्न सासूचं, पुन्हा करवली सुनबाईच’- अग्गबाई सासूबाई आता कन्नडमध्ये

16 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT