ADVERTISEMENT
home / आरोग्य
रात्रीच्या जेवणात हे पदार्थ खाल तर व्हाल लठ्ठ

रात्रीच्या जेवणात हे पदार्थ खाल तर व्हाल लठ्ठ

लठ्ठपणा हा आजकाल अनेकांच्या चिंतेचा विषय झाला आहे. कोरोनाच्या काळात मागच्या वर्षभरापासून घरात राहिल्यामुळे शारीरिक हालचाल खूप मंदावली आहे. घरातील छोटी मोठी कामे आणि थोडासा व्यायाम यामुळे हवी तशी शारीरिक मेहनत होत नाही. सहाजिकच याचा विपरित परिणाम अनेकांच्या शरीरावर झाला आहे. व्यायामाचा अभाव तर आहेच पण याला जोड अपथ्यकारक पदार्थांची मिळत आहे. रात्री उशीरा झोपणे, रात्रीच्या जेवणात पिझ्झा, बर्गर सारखे पदार्थ खाणे यामुळेही तुमचे वजन वाढू शकते. यासाठीच जाणून घ्या लठ्ठपणा टाळण्यासाठी रात्रीच्या जेवणात कोणते पदार्थ खाणे आवर्जून टाळणे गरजेचं आहे. 

तळलेले पदार्थ

पाऊस आणि तळलेले पदार्थ याचं अतूट नातं आहे. पावसाला सुरूवात झाली की घरोघरी भजी, बटाटावडा अशा पदार्थांचा खंमग सुंगध दरवळू लागतो. मात्र हे पदार्थ खाण्याचा कितीही मोह झाला तरी ते रात्री मुळीच खाऊ नका. कारण रात्री तेलकट पदार्थ खाण्यामुळे शरीरात फॅट जास्त प्रमाणात जमा होते. शिवाय अशा पदार्थांमुळे रात्री अॅसिडिटी आणि अपचनाचा त्रास जाणवू लागतो. यासाठीच रात्री असे पदार्थ खा जे पचायला हलके असतील. 

चॉकलेट

चॉकलेट म्हणजे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वाचा आवडती वस्तू.  आजकल लॉकडाऊनमुळे घरात चॉकलेटचा  स्टॉक हा असतोच. शिवाय बऱ्याच जणांना रात्री झोपेतून उठून काहीतरी खायची सवय असते. अशा वेळी फ्रीजमधील चॉकलेटवर ताव मारला जातो. काही लोकांना रात्री जेवणानंतर चॉकलेट खाण्याची सवयच असते. त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतरही नित्यनेमाने ते चॉकलेट खातात. मात्र सावध व्हा कारण ही सवय तुमचं वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. यासाठी रात्रीच्या जेवणानंतर चॉकलेट मुळीच खाऊ नका.

चायनीज नूडल्स

ADVERTISEMENT

pexels

चायनिजच्या नुसत्या वासानेही तुम्हाला कडकडून भुक लागू शकते. पण असे चमचमीत चायनिज पदार्थ अथवा नूडल्स तुम्हाला कितीही आवडत असले तरी रात्रीच्या जेवणात असे पदार्थ खाऊ नका. कारण मॅगी अथवा नूडल्स मैद्यापासून तयार केलेले असतात. या पदार्थांमध्ये मुळीच फायबर नसतात. जेव्हा तुम्ही रात्री असे पदार्थ खाता तेव्हा तुमच्या पोटावर पचनाचा अतिरिक्त ताण येतो. फायबर्स नसल्यामुळे हे पदार्थ लवकर पचत नाहीत आणि तुमचे वजन वाढू लागते. 

बर्गर अथवा पिझ्झा

आजकाल कामाच्या धकाधकीत लोकांचा फास्टफूड खाण्याकडे कल वाढला आहे. बर्गर, पिझ्झा सारखे फास्टफूड खाणे कितीही सोयीचे असले तरी आरोग्यासाठी मुळीच चांगले नाहीत. कारण असे मैद्यापासून बनवलेले, हाय कॅलरिज पदार्थ रात्री खाल्यास तुमच्या आतड्यामध्ये बराच काळ तसेच राहतात. ज्यामुळे तुमच्या शरीरात फॅट्स वाढू लागतात आणि तुमचे वजन झपाट्याने वाढते.

सोडायुक्त पेय –

रात्रीचे जेवण पचावे यासाठी अनेकांना सोडायुक्त पेय पिण्याची सवय असते. मात्र यामुळे तुम्हाला बरे वाटत असले तरी ते शरीरासाठी योग्य नाही. या पेयांमध्ये अती प्रमाणात साखर असते. नियमित अशी पेय घेतल्यामुळे तुमचे पोट सुटू लागते. सहाजिकच अॅसिडिटी जरी कमी झाली तरी काहीच दिवसांमध्ये तुमचे वजन यामुळे जास्त वाढू शकते. 

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – pexels

अधिक वाचा  –

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो वांग्याचा रस

लिक्विड डाएटच्या मदतीने महिन्याभरात करा वजन कमी

ADVERTISEMENT

भुईमूगाच्या शेंगांचे अफलातून फायदे, वजन ठेवते नियंत्रणात

14 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT