home / मनोरंजन
कोएना मित्रा

सर्जरीनंतर या अभिनेत्रीला झाला होता खूप त्रास

एखादी अभिनेत्री आधी कशी होती आता कशी दिसते? हे पाहण्यामध्ये खूप जणांना इंटरेस्ट असतो. सेलिब्रिटींच्या आयुष्यात झाकून पाहायला खूप जणांना आवडते. काही सेलिब्रिटी अचानक गायब होतात. त्यांचा शोध काही काळासाठी घेतला जातो. पण त्यानंतर मात्र आपणही अशा सेलिब्रिटींबद्दल फारशी चर्चा करत नाही. काळाच्या पडद्याआड गेलेली अशीच एक सेलिब्रिटी म्हणजे कोएना मित्रा…. काही काळ कोणालाही न दिसणाऱ्या अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील धक्कादायक प्रकार सांगितला आहे. तिच्या सर्जरीनंतर या अभिनेत्रीला कोणीही काम दिलेले नाही. तिने काय सांगितले ते जाणून घेऊया.

तनिषा मुखर्जीने केलं लग्नाचं सत्य उघड, यासाठी पायात घालते जोडवी

मुलाखतीत केला खुलासा

कोएना मित्राने काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली होती. त्यामध्ये तिने तिच्या प्लास्टिक सर्जरीबद्दल सांगितले. ती म्हणाली की, हो मी बऱ्याच प्लास्टिक सर्जरी केेलेली आहे. पण ज्या दिवसापासून मी हे सगळ्यांना सांगितले त्या दिवसापासून तिला काम मिळणे बंद झाले आहे. कोएना आधी दिसायला फारच वेगळी होती. पण तिच्या प्लास्टिक सर्जरीनंतर तिने नाक, डोळे असे अवयव थोडे वेगळे दिसू लागले. त्यामुळेच तिच्या मागे सगळ्यांचा ससेमिराच लागला. मी काहीतरी वेगळेच केले आहे असे समजून खूप जणांनी माझ्याशी बोलणं सोडून दिलं. इतकंच नाही तर मला काम देणेही बंद केले. त्यामुळे माझे आयुष्य एका दिवसात बदलून गेले.

नाही पश्चाताप

कोएनाचे बदललेले रुप

हल्ली अनेक सेलिब्रिटी आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा आधार घेतात. असे अनेक सेलिब्रिटी तुम्हाला आठवतील. पण कोएना मित्राने सर्जरी केल्यानंतर तिच्या चेहऱ्यामध्ये झालेला बदल हा खूप जणांसाठी स्वागतार्ह नव्हता. कारण त्यानंतर ती अधिकच खराब दिसू लागली. त्यामुळेच की, काय तिच्यावर टीका होऊ लागली. पण आपल्या प्लास्टिक सर्जरीबद्दल काहीही पश्चाताप नसल्याचे कोएनाने सांगितले. त्यामुळे तिने तिच्या बदललेल्या रुपाचा आणि माझे आयुष्य हे माझे आहे मी काहीही करेन असे सांगत तो विषय तिने मिटवला. पण असे करुनही तिला कोणतेही काम मिळाले नाही. 

अखेर आमिर अली आणि संजिदा शेख विभक्त

म्युझिक व्हिडिओचा होती हिट चेहरा

साधारण 90च्या काळात आयटम साँगचा एक चांगलाच ट्रेंड होता. या ट्रेंडनुसार अनेक आयटम साँगसाठी खास चेहरे असायचे. संजय दत्तसोबत ‘साकी साकी’ या गाण्यावर मस्त डान्स करुन हिट झालेली कोएना मित्रा सगळ्यांच्याच लक्षात राहिली. उंच आणि परफेक्ट फिगर अशी ओळख असलेली कोएना अनेक विनोदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. पण त्यानंतर ती फारशी काही दिसली नाही. ती दिसली ते थेट बदललेली. तिचा बदलता चेहरा तिच्या करिअरसाठी घातक ठरला कारण त्यानंतर ती कधीही कोणत्याही चित्रपटात झळकू शकली नाही. केवळ कार्यक्रमांना हजेरी लावताना कोएना दिसून येते. तिला काम न मिळण्यामागे समाज आणि या समााजातील लोक कारणीभूत असल्याचे ती मानते

आता कोएना मित्राच्या या प्लास्टिक सर्जरीबद्दल तुम्हाला काय वाटते. आम्हाला नक्की कळवा.

धक्कादायक! कपिल शर्मा फेम या अभिनेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

10 Jan 2022

Read More

read more articles like this
good points logo

good points text