ADVERTISEMENT
home / मनोरंजन
kon honar karodpati - sony marathi show

‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर होईल मयूरीची स्वप्नपूर्ती

माणूस कोणत्याही मोठ्या संकटात सापडला, तरी त्याचं ज्ञानच त्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करू शकतं. ज्ञान तुम्हांला कधीही  उपयोगी पडू शकतं आणि हीच तुमची खरी ताकद आहे. ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात याच ज्ञानाच्या साथीने स्पर्धक एक करोड रुपये जिंकू शकतात. हा शो सामान्य माणसांसाठी आहे. आपल्या ज्ञानाच्या बळावर पैसे जिंकून आपली स्वप्नपूर्ती करणे हेच या शो मधून शिकायला मिळते. जर आपल्याला ज्ञान असेल आणि प्रसंगावधान असेल तर नक्कीच आपल्याला आपल्या स्वप्नापासून आणि ध्येयापासून कोणीही दूर ठेऊ शकत नाही हे पुन्हा एकदा या भागातून सिद्ध होईल. सामान्य विद्यार्थिनी असणारी मयुरीचं स्वप्नं कसं पूर्ण होणार हेच या भागात पाहायला मिळणार आहे.  

अधिक वाचा – कोण होणार करोडपती’मध्ये कर्मवीर म्हणून खेळणार नाना पाटेकर

एमबीबीएस विद्यार्थिनीचं होणार स्वप्नं पूर्ण

Kon honar karodpati – Sony Marathi

या आठवड्यात मुंबईची मयुरी वावदाने ‘कोण होणार करोडपती’ च्या हॉट सीटवर खेळायला आली आहे. मयूरी एमबीबीएसची विद्यार्थिनी आहे. मयूरीच्या आईचं स्वप्नं होतं हॉट सीटवर खेळायला यायचं, पण त्यांना ती संधी मिळाली नाही. हॉट सीटवर बसण्याची आणि कुटुंबावरचं कर्ज फेडण्याची संधी आता मयूरीला मिळाली आहे. ही संधी सोडायची नाही आणि जिंकून जायचं ही जिद्द मयुरीची आहे. फारच कमी कालावधीमध्ये या शो ने मराठी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.  सचिन खेडेकर हे उत्तम संचालक असून हॉट सीटवर असलेल्या सर्व स्पर्धकांना सांभाळून घेतात आणि त्यांना बोलतंही करतात. मयुरीला तिच्या स्वप्नाविषयी विचारलं असता कुटुंबावर असलेलं कर्ज फेडता यावं, असं ती म्हणाली. आपल्या ज्ञानाच्या जोरावर इथपर्यंत पोचलेली मयूरी तिच्या कुटुंबाला या खेळामुळे कर्जमुक्त करेल का हे पाहणं आता सर्वांसाठीच उत्सुकतेचे ठरणार आहे. तसंच या खेळातील कर्मवीर भागही प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहेत. खूपच कमी वेळामध्ये या शो ने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे आणि दर आठवड्याला नक्की कोण कोण कर्मवीर असणार याचीही उत्सुकता लागून राहाते. 

अधिक वाचा – शेरशाहसाठी कियारा अडवाणीने नेसलेल्या साडीची किंमत ऐकून व्हाल थक्क

ADVERTISEMENT

घरबसल्या जिंका पैसे 

घरबसल्या लखपती होण्याची संधी सोनी मराठी वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे. कोण होणार करोडपती’ टीव्हीवर पाहता-पाहता प्रेक्षक खेळू शकतात ‘कोण होणार करोडपती प्ले अलॉंग’! आणि जिंकू शकतात एक लाख रुपये आणि हॉटसीटवर येण्याची संधीदेखील प्रेक्षकांना मिळू शकते. हा शो गेले अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासह प्रेक्षकांच्या संसारालादेखील हातभार लावण्याचे काम करत आहे. तुम्हालाही जिंकण्याची संधी आहे. सामान्य जनतेसाठीच हा शो असल्यामुळे प्रेक्षक म्हणून तुम्ही यामध्ये सहभागी होऊन आपलं नशीब नक्कीच आजमावून पाहू शकता. नुकताच हा शो मराठीमध्ये सुरू झाला असून हे या शो चे तिसरे पर्व आहे. हिंदीमधील शो चे सूत्रसंचालन गेले कित्येक वर्ष अभिताभ बच्चन करत आहेत तर मराठीसाठी ही धुरा सचिन खेडेकरने सांभाळली आहे. आपल्या सूत्रसंचालनाने अनेकांना सचिन खेडेकर यातून बोलते करत असल्याचेही दिसून येते. सचिन खेडेकर यांचा चाहतावर्गही मोठा आहे. सामान्य माणसांना कसे बोलते करायचे हे सचिनला अप्रतिम जमते. त्यामुळेच मराठीतील हा शोदेखील प्रेक्षकांना भावतोय असे दिसून आले आहे. 

अधिक वाचा – कपिलच्या शो मध्ये पुन्हा दिसणार प्रेक्षक, दिला संकेत

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

27 Jul 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT