ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
चेहऱ्यावरील नको असणारे केस हटवण्यासाठी करू शकता लेझर ट्रीटमेंटचा उपयोग

चेहऱ्यावरील नको असणारे केस हटवण्यासाठी करू शकता लेझर ट्रीटमेंटचा उपयोग

चेहऱ्यावरील नको असलेले केस ही नक्कीच आपल्यासाठी एक डोकेदुखी ठरणारी बाब असते. यासाठी आपण तात्पुरते उपाय म्हणून थ्रेडिंग, वॅक्सिंग याचा आधार घेतो. पण तुम्हाला यावर कायमस्वरूपी उपाय हवा असेल तर त्यासाठी लेझर ट्रिटमेंटदेखील उपलब्ध आहे. हल्ली हा उपाय आपल्याला बऱ्याच ठिकाणी ऐकू येतो. पण त्याची पूर्ण माहिती मात्र फारच कमी जणांना माहिती आहे. त्यामुळे हे करायला हवं की नको असादेखील आपल्याला प्रश्न पडतो. तसंच बाकीच्या पर्यायांपेक्षा हा पर्याय थोडा महागही आहे आणि त्यामुळे हे करायचं की नाही असा प्रश्न निर्माण होतो. पण तुम्हाला जर असे प्रश्न असतील तर आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देत आहोत. ही लेझर ट्रिटमेंटबद्दलची माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. 

लेझर ट्रिटमेंटबद्दल सर्व माहिती – Everything About Laser Treatment

Shutterstock

लेझर ट्रिटमेंट रिडक्शन आणि हेअर रिमूव्हलची ही एक पद्धत आहे. तुम्हाला नको चेहऱ्यावरील केस लेझर लाईटच्या सहाय्याने कायमचे काढून टाकले जातात. अर्थात मुळापासून हे केस काढण्यात येतात. त्यामुळे याचा परिणाम जास्त काळ राहातो. 

ADVERTISEMENT

लेझर करण्यापूर्वी नक्की कोणत्या टेस्ट केल्या जातात?

सर्वात पहिले डॉक्टर तो एरिया तपासतात जिथे तुम्हाला लेझर करून घ्यायचं आहे. त्या एरियाची त्वचा (स्किन टाईप, रंग) तसंच तिथल्या केसांचा रंग, thickness इत्याही सर्व काही तपासल्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या लेझरची (heating pulse length) आणि किती वेळासाठी (pulse width) लेझरचा उपयोग करता येईल हे सांगितलं जातं. 

लेझर करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या?

Shutterstock

तुम्ही जर लेझर ट्रिटमेंट घ्यायची ठरवलंच असेल तर तुम्ही लेझर सेशनच्या आधी काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. 

ADVERTISEMENT
  • सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही योग्य डॉक्टर निवडणं आवश्यक आहे. ज्या डॉक्टरला चांगला अनुभव असेल आणि त्याची योग्य माहिती असेल अशाच डॉक्टरकडे जा. तसंच त्यांच्याकडे असणारा टेक्निशियन हादेखील well-trained अर्थात प्रशिक्षित असायला हवा. 
  • लेझर सेशन होण्यापूर्वी उन्हात जाऊ नका. अजिबात त्वचा टॅन होऊ देऊ नका. तसंच लेझर ट्रिटमेंट झाल्यानंतरही तुम्ही उन्हात जाऊ नका. 
  • सेशनपूर्वी आणि नंतर तुमची त्वचा योग्य प्रमाणात थंड करून घ्या. 

लेझर सेशन म्हणजे नक्की काय?

असा प्रश्न सहसा सगळ्यांना पडतो. खरं तर तुमची त्वचा आणि केसांवरून लेझर आणि heating pulse निवडण्यात येते. सर्वात पहिले technician तुमची त्वचा (जिथे लेझरचा उपयोग करायचा आहे तो भाग) तयार करून घेतात आणि तो भाग शेव्ह करून त्याच्या आजूबाजूच्या त्वचेला ice पॅक अथवा जेल पॅक लावून एकदम थंड करण्यात येतं. जेणेकरून गरम pulse मुळे बाहेरील त्वचेला कोणतंही नुकसान पोहचू नये. त्यानंतर लेझर करण्यात येणाऱ्या भागावर जेली लावण्यात येते. या जेलीच्या मदतीने लेझर probe त्वचेवर अगदी सहजपणाने स्लाईड करू शकतं. त्यानंतर त्या भागावर लेझर शूट करण्यात येतं. सेशन संपण्यापूर्वी तो भाग जास्त कुलिंगसह एकदम थंड करण्यात येतं. सेशननंतर सनस्क्रिन लावणं अत्यंत आवश्यक आहे. 

लेझर ट्रिटमेंटदरम्यान त्रास होतो का?

लेझरमध्ये जास्त प्रमाणात हिट असते त्यामुळे कधीतरी जळजळ जाणवते. पण यामध्ये दुखत नाही. तसंच लेझर सेशनच्या पूर्वी आणि नंतर त्वचा थंड करण्यासाठी कुलिंग जास्त प्रमाणात केलं जातं. त्यामुळे त्वचा सुन्न होते त्यामुळे जास्त त्रास होत नाही. त्यासाठी कुलिंग करून घेणं गरजेचं आहे. 

स्ट्रेच मार्क्सपासून मिळवा सुटका घरगुती उपाय करून

सेशनमध्ये किती वेळ लागतो?

ADVERTISEMENT

Shutterstock

सेशनची वेळ ही तुमच्या चेहऱ्याच्या भागानुसार किती वेळ लागतो  ते ठरतं. जसं तुम्हाला जर upper lip साठी लेझर करायचं असेल तर 1-5 मिनिटांचा कालावधी लागतो आणि जर गालांच्या आसपासचा भाग असेल तर त्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. 

लेझरचे किती सेशन करणं गरजेचं आहे?

तुमच्या त्वचेचा रंग, केसांचा रंग, केसांचा जाडपणा आणि लेझर टाईप या सगळ्यांवर हे अवलंबून आहे. या सगळ्याच्या आधारावर किती सेशन करायला हवं हे अवलंबून आहे. 

लेझर सेशनच्या मध्ये केसांची वाढ होते का?

हा प्रश्न योग्य आहे. सेशनच्या मध्ये नक्कीच केसांची वाढ होते. तुम्हाला हवं तर अशावेळी तुम्ही शेव्ह अथवा वॅक्स करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की, लेझर सेशन आणि वॅक्सिंग सेशनमध्ये किमान 12 दिवसांचं अंतर असायला हवं. जर तुम्ही शेव्ह करणार असाल तर किमान 2 दिवसांचं अंतर राखा. याबद्दल तुम्ही तुमच्या डॉक्टरांना नक्की विचारून घ्या. 

ADVERTISEMENT

चेहऱ्यावरील केस काढताय? मग माहीत करुन घ्या या महत्वाच्या गोष्टी

लेझर सेशननंतर नक्की काय काळजी घ्यायची? – Things to Take Care of After Laser Session

Shutterstock

लेझर सेशन झाल्यानंतर त्वरीत सनस्क्रीन न लावता बाहेर पडू नका. जितकं कमी तितकं उन्हातून बाहेर जा. त्याशिवाय आपलं नॉर्मल cleansing, moisturizing रूटीन तुम्ही करू शकता. पण anti-acne, anti-aging सारख्या केमिकल असणाऱ्या उत्पादनांचा वापर लेझर सेशन झाल्यानंतर 24-36 तासांपर्यंत करू नका. 

ADVERTISEMENT

याचे काही दुष्परिणाम आहेत का?

यामुळे कधीतरी तुम्हाला खाज(itching), redness अथवा सूज येऊ शकते. तुमची त्वचा थंड केल्यानंतर anti-inflammatory लोशन लावा आणि त्यानंतर 1-2 दिवसात हे नीट होईल. बऱ्याच rare केस मध्ये त्वचेवर पुरळ अथवा स्किन discoloration सारखी समस्या होते. 

अप्पर लीपवरील केस काढताय, मग तुम्ही अशी घ्यायला हवी काळजी

लेझरचा खर्च किती येतो?

सर्व लेझरची किंमत वेगवेगळी असते. तुम्ही कोणतं लेझर करून घेत आहात यावर ते अवलंबून असतं. तुम्ही लेझर करून घेणार असल्याचा भाग,  त्याचा आकार, त्याला किती वेळ लागणार, त्याचे किती सेशन होणार इत्यादी गोष्टींंचा विचार करून मगच त्याचा खर्च डॉक्टरांद्वारे सांगण्यात येतो. लेझर करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी सर्व तपशील ठरवून मगच निर्णय घ्या. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

ADVERTISEMENT

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

04 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT