चेहरा जितका सुंदर तितका तो आकर्षक दिसतो. आकर्षक चेहऱ्याची तुमची व्याख्या काय आहे? नितळ त्वचा, चमकदार त्वचा, पिपंल्स विरहीत त्वचा. त्वचेच्या सुंदरतेची व्याख्या ही ठरलेली असते. तुम्हाला हवी असलेली त्वचा मिळवण्यासाठी जर तुम्ही काही ट्रिटमेंट करत असाल तर सध्या चेहऱ्यासाठी लेझर ट्रिटमेंट ही चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. मायक्रोडर्मा, स्किन पिलींग या सगळ्या ट्रिटमेंटहून अधिक प्रभावशाली अशी ही ट्रिटमेंट असून यामुळे त्वचा चांगली होण्यास मदत मिळते. चेहऱ्यासाठी केल्या जाणाऱ्या या लेझर ट्रिटमेंटविषयी जाणून घेऊया अधिक. या शिवाय लेझर हेअर रिमुव्हलबद्दलही माहिती असायला हवी.
डॉक्टरांच्या मते लेझर ( Laser) हे चेहऱ्यासाठी फारच जास्त फायद्याचे असतात. ज्याप्रमाणे आपण व्यायाम करतो. त्यावेळी आपले टिश्यू फाटले जातात आणि त्या जागी खालून नवे टिश्यू येतात. त्यामुळे त्वचेला पुन्हा एकदा नवा तजेला मिळतो.
अधिक वाचा: नारळपाण्याने करा फेशिअल, त्वचेवर येईल नैसर्गिक चमक
लेझर प्रोसिजर करण्याआधी तुम्हाला याची माहिती असणे फार गरजेचे असते. ही प्रोसिजर पटकन होणारी आहे.
तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मगच तुम्हाला याचे सेशन घ्यायचे असतात. त्यामुळे त्याचा चांगला रिझल्ट मिळतो.
अधिक वाचा : एसपीएफ आणि फाऊंडेशन एकत्र करुन वापरा, होईल त्वचेचे रक्षण