साऊथचा प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी सरजा अचानक आपल्यातून निघून गेल्याचे दु:ख सरजाच्या कुटुंबाला आणि संपूर्ण फॅन्सला झाले होते. पण आता ज्यु. चिरंजीवी सरजा आला आहे. हो तुम्ही वाचत आहात ती बातमी अगदी खरी आहे. चिरजींवी सरजाची पत्नी मेघना सरजा आई झाली असून त्यांच्या कुटुंबात आणि फॅन्समध्ये आनंदाचे वातावरण आहे. चिरंजीवीच्या जाण्याचे दु:ख कधीच भरुन निघणार नाही. पण त्या दु:खात सुखाची एक सावली बनत चिरंजीवी कुटुंबामध्ये आनंदाचे क्षण आले आहेत. इतकेच नाही तर त्याचे जन्मल्यानंतरचे फोटोही सोशल मीडियावर जबरदस्त वायरल होत आहे.
सोनाली खरेचे 8 वर्षांनी दसऱ्याच्या दिवशी होणार दणक्यात कमबॅक, दिसणार शेफच्या भूमिकेत
आनंदी आनंद
चिरंजीवी अचानक गेल्यामुळे अनेकांना धक्का बसला होता.त्याच्या जाण्याने संबंध साऊथ फिल्म इंडस्ट्री हादरली होती. अनेकांना या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. तो गेला त्यावेळी त्याची पत्नी मेघना ही गरोदर होती. तिच्यासाठी हा धक्का फारच मोठा होता. तिने सरजाच्या मृत्यूनंतर आपल्या भावनाही व्यक्त केल्या होत्या. शिवाय तिने आई होणार असल्याची गोड बातमी देखील दिली होती. त्या आनंदाच्या बातमीनंतर आता त्यांच्या घरात नवा पाहुणा आला म्हटल्यावर आनंद होणे हे अगदी साहजिकच आहे. मेघनाला मुलगा झाला असून चिरजींवीच्या रुपात तो हे बाळच त्यांच्या घरी आल्याच्या भावना सगळ्या फॅन्सनी व्यक्त केल्या आहेत.
डोहाळ जेवणाचे फोटो झाले होते व्हायरल
चिरंजीवी गेल्यानंतर ही आनंदवार्ता दिल्यानंतर मेघनाची काळजी चिरंजीवीच्या फॅन्सना होती. पण मेघनाने तिचे दु:ख आनंदात बदलून सरजाला आवडेल अशी गोष्ट त्याच्या अनुपस्थिततीत करण्यासाठी तिने फक्त आणि फक्त आनंद तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन व्यक्त केल्या होत्या. तिच्या डोहाळ जेवणाचे फोटो तर फारच प्रसिद्ध झाले होते. तिच्या डोहाळ जेवणानंतरच ती अधिक प्रकाशझोतात आली होती. तिने या डोहाळजेवणासाठी खास चिरंजीवी सरजाचे एख कटआऊट बनवले होते. त्यामुळे तो कुठेही गेला नाही. तो आमच्यात असल्याच्या भावना तिने व्यक्त केल्या होत्या. या भावनांनी तिच्या फॅन्सनाही भावूक करुन टाकले.
जानला घरी ठेवण्यासाठी शहजादला घरातून केले बेघर, लोकांनी व्यक्त केली नाराजी
ज्यु. चिरंजीवीचे फोटो आतापासूनच झाले व्हायरल
गुरुवारी ही आनंदाची बातमी कळल्यानंतर लगेचच काही वेळात ज्यु. चिरंजीवी सरजाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. चिरंजीवी सरजाचा भाऊ ध्रुव याने त्या छोट्या बाळाला हातात घेतलेले अनेक फोटो ट्विटर आणि सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे फोटो मोठ्या प्रमाणात ट्विटही केले जात आहे. त्यामुळे आता आणखी एका स्टार किडच्या स्वागतासाठी गळे सज्ज झाले आहेत. त्यामुळे त्याच्या फॅन्समध्ये आनंद पसरला आहे.
आता मेघना तिच्या फॅन्ससाठी आणखी फोटो कधी टाकणार याची वाट अनेक जण पाहात आहेत.
नेहा कक्कर खरंच करतेय लग्न, रोका व्हिडिओ वायरल