ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
lipstick-shades-you-can-apply-with-white-outfit-in-summer-in-marathi

उन्हाळ्यात वापरा पांढऱ्या कपड्यांसह लिपस्टिक्सच्या या शेड्स, दिसा स्टायलिश

जेव्हा उन्हाळ्याचा हंगाम सुरू होतो तेव्हा अनेक महिला आपला वॉर्डरोब बदलतात. त्यांच्या कपड्यांचा केवळ पॅटर्न, फॅब्रिक स्टाईलच बदलत नाही तर रंगांच्या निवडीतही फरक पडतो. कडक उन्हात अनेकदा लाईट रंग वापरणे महिलांना आवडते. असे रंग जे आपल्या शरीराला थंडावा देतील. जास्तीत जास्त महिला या काळात पांढऱ्या रंगाचे कपडे (White Colour Cloths) निवडतात. पांढरा एक असा रंग आहे जो डोळ्यांना थंडावा तर देतोच पण शरीरामध्ये जास्त उष्णता साठवू देत नाही. तुम्ही शर्टापासून ते साडीपर्यंत कोणत्याही पांढऱ्या कपड्यांना उन्हाळ्यात प्राधान्य देऊ शकता. पांढऱ्या कपड्यांसह कोणता मेकअप करायचा असा पण आता तुम्हाला प्रश्न पडू शकतो. तर पांढरे आऊटफिट्स घातल्यावर तुमची लिपस्टिक शेड (Lipstick Shade) नक्कीच तुमचा ओव्हरऑल लुक बदलू शकते. त्यासाठी काही ठराविक लिपस्टिक शेड्स तुम्ही वापरायला हव्यात. याबाबत काही फॅशन टिप्स (Fashion Tips)

वेळेनुसार लावा लिपस्टिक शेड्स 

जेव्हा तुम्ही पांढऱ्या कपड्यांनुसार मेकअप करणार असाल तेव्हा तुम्ही वेळ कोणती आहे हे लक्षात ठेवायला हवे. उदा. तुम्ही जर सकाळच्या वेळात पांढरे कपडे घालणार असाल तर त्यासह तुम्ही ग्लॉससह लाईट पिंक (गुलाबी) अथवा ब्राऊन अशा शेड्स वापरायला हव्यात. या शेड्स तुम्हाला POPxo मेकअप कलेक्शनमध्येही मिळतील. तर संध्याकाळच्या वेळात तुम्ही पांढरे कपडे परिधान करणार असलात तर यावेळी लिप ग्लॉस लाऊ नका. या वेळात तुम्ही मॅट फिनिश लिपस्टिकचा वापर करावा. वास्तविक उन्हामुळे चेहऱ्यावर अधिक शाईन असते. त्यामुळे ग्लॉस लावल्यास विचित्र दिसू शकते. तसंच संध्याकाळी तुम्ही थोड्या गडद रंगाच्या लिपस्टिक शेड्सचाही वापर करू शकता. 

कार्यक्रमानुसार वापरा लिपस्टिक शेड्स 

जेव्हा तुम्ही पांढऱ्या कपड्यांसह लिपस्टिक शेड कोणती लावायची हे ठरवता तेव्हा तुम्ही कोणत्या कार्यक्रमांना जात आहात याबाबतही विचार करण्याची गरज आहे. उदाहरणार्थ तुम्ही कॅज्युअल व्हाईट कपडे घालणार असाल तर लिपस्टिक न लावता केवळ लिप ग्लॉस लावा. जर एखाद्या पार्टीला जाण्यासाठी पांढरे कपडे घालणार असाल आणि तुम्हाला बोल्ड टच हवा असेल तर तुम्ही चेरी रेड लिपस्टिकचा वापर करावा. ही तुम्हाला अधिक आकर्षक आणि सुंदर दिसेल. दरम्यान यावेळी डोळ्यांचा मेकअप गडद करू नका जेणेकरून तुमची लिपस्टिक शेड अधिक उठावदार दिसेल. ऑफिसमधील सटल लुकसाठी तुम्ही पांढऱ्या आऊटफिट्ससह लाईट गुलाबी रंगातील शेड्स निवडू शकता. 

स्किन टोननुसार निवडा शेड 

पांढऱ्या कपड्यांसह कोणती लिपस्टिक लावल्यास स्टायलिश दिसू शकता हे तुमच्या स्किनटोनवरही अवलंबून आहे. उदाहरणार्थ तुमची त्वचा थोडी डस्की असेल तर तुम्ही लाईट शेड लिपस्टिक वापरू नका. यामुळे चेहरा वॉश्डआऊट दिसून येतो. उन्हाळ्यात व्हाईट आऊटफिट्ससह मीडियम टोन शेड्स अर्थात गडद गुलाबी, चेरी रेड, मरून असे शेड्स तुम्ही वापरावेत. तुमचा स्किन टोन गोरा असेल तर तुम्ही गडद रंग सहसा लाऊ नका. तुम्ही न्यूड शेड अथवा ब्राईट शेड निवडू शकता. यामुळे तुम्हाला पॉप टच मिळते आणि न्यूड शेड्स कॅज्युअल लुकसाठी अगदी परफेक्ट आहेत. 

ADVERTISEMENT

हीदेखील आहे योग्य पद्धत 

जेव्हा तुम्ही लिपस्टिक विकत घेता तेव्हा तुम्ही पांढऱ्या कपड्यात याची निवड करू शकता. तसंच रंगसंगतीनुसार निवड करू शकता. उदा. तुम्ही काळा – पांढरा ड्रेस घातला असेल तर यासह तुम्ही कॉफी कलर अथवा ब्राऊन शेड्स लिपस्टिक वापरा. त्याशिवाय तुमच्या आवडीनुसार मात्र याच शेडमध्ये लिपस्टिक्सची निवड केल्यास तुमचा लुक अधिक उठावदार दिसेल आणि उन्हाळ्यातही तुम्ही अप्रतिम स्टाईल करू शकाल. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

12 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT