एकत्र वेळ घालवण्याची अशी संधी आम्हाला कधी मिळेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आधी करिअर करण्यामध्ये बिझी आणि मग पैसे कमावण्यामध्ये बिझी. प्रेम करुनही आम्हाला एकमेकांसाठी इतका वेळ कधीच देता आला नव्हता. ही आहे लॉकडाऊनमुळे फुलत गेलेल्या एका अशा जोडप्याची गोष्ट ज्यांना या सध्याच्या दिवसाने बरचं काही दिलं. नात्यात येणारा दुरावा लक्षात येऊनही आहे त्यावर समाधान मानत रुही आणि रोहित आयुष्याचा गाडा ओढत होते. पण नियतीने त्यांना जवळ आणलं आणि त्यांच्यातील दुरावा मिटला. जाणून घेऊया कसा.
My Story : सगळ्यांमध्ये असूनही मला एकटं वाटतं कारण
shutterstock
रोहित आणि रुही खूप मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कामाला. अशी एकही गोष्ट नाही ती त्यांच्या घरात नव्हती. मोठ्या सोसायटीत उंची फ्लॅट, गाड्या, नोकर- चाकर आणि हवी तशी रॉयल लाईफ. पण तरीही त्यांच्या आयुष्यात काही गोष्टींची कमी होती. प्रेमाच्या नात्यात लागणाऱ्या बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडे नव्हत्या. त्यांच्याकडे एकमेकांना देण्यासाठी वेळ नव्हता की, प्रेमाने बोलण्यासाठी शब्द नव्हते. लग्नाआधी प्रेम केलं. पण आता हे प्रेम फारच भविष्याचा विचार करणारे आणि प्रॅक्टिकल झाले होते. सेक्स लाईफ बरी होती. पण त्यामध्येही तोच प्रॅक्टिकलपणा. हे दोघांमध्ये व्हायला हवे म्हणून रुही आणि रोहित हे सगळं करत होते.
My Story …आणि ती रात्र आमच्यासाठी खास ठरली
पण अचानक असं काही झालं की, त्यांचं सगळं आयुष्य बदलून गेले. कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. घरातूनच काम करण्याचे फर्मान काढण्यात आले. पहिले दोन दिवस रुही आणि रोहित काही हलले नाहीत. सगळं आयतं मिळत आहे म्हटल्यावर त्या दोघांना फक्त काम करायचे होते.घरातील नोकर चाकर इतर गोष्टी करत होत्या. पण थोड्या दिवसांनी घरातील नोकरमंडळीही कोरोनाच्या भीतीमुळे कामावर येणं बंद झाली. मग काय आता इतक्या मोठ्या घरात फक्त रुही आणि रोहित. इतर कोणाला घरी बोलवावे तर तेही शक्य नव्हते. कारण सगळीकडे पोलिसांनी लक्ष ठेवायला सुरुवात केली. एकूणच काय आपल्याच घरात रुही आणि रोहित एखाद्या कैद्याप्रमाणे अडकले. आजूबाजूची सगळी हॉटेल्स बंद झाल्यावर मात्र त्यांना अधिक काळजी वाटू लागली. रुहीने या आधी किचनमध्ये फार लुडबुड केली नव्हती. पण आता पोटाचा प्रश्न होता. दिवसातून दोन वेळा तरी खाणे गरजेचे होते. रुहीने किचनकडे मोर्चा वळवला. घरात काय काय आहे ते पाहिले आणि तिला जमेल तसा स्वयंपाक केला. रोहितसाठी रुहीने स्वयंपाक करणेच फार मोठी गोष्ट होती. जेवण कसे झाले? याचा विचार न करता त्याने हातातील काम सोडून किचनमध्ये जाणे पसंत केले. मग काय या छोट्याशा गोष्टीवरुन त्यांच्यात संवाद सुरु झाला. त्यानंतर प्रत्येक दिवस त्यांचा या सगळ्या गोष्टीमध्ये जात होता. घरी लागणाऱ्या सामानाची यादी करणे. हे सामान घेण्यासाठी घराबाहेर पडणे. हातात हात घालून आपल्या नवऱ्यासोबत घरातील सामान घ्यायला जाईल असे वाटले नव्हते. पण आता हा लॉकडाऊन तिच्यासाठी खास झाला होता. रोहित घरी अशीही कधी मदत करेल असे तिला वाटले नव्हते. आता त्यांची रोजची सकाळ एकत्र किचनमध्ये नंतर काम करण्यात जात होती. घरातील स्वच्छता करता करता त्यांची मनंही स्वच्छ होत होती. त्यांच्यामध्ये जवळीकता वाढत होती. त्यांना त्यांच्या शरीराची वेगळी ओढ कॉलेजच्या प्रेमानंतर पहिल्यांदा जाणवली होती. त्यामुळे ते आनंदी होते.
हाच रोहित तिला कायम तिच्यासोबत हवा होता.बदलेली रुही रोहितलाही हवीहवीशी होती. ज्या बेडरुममध्ये त्यांचे प्रॅक्टिकल रिलेशन होते ते आता अधिक जवळचे आणि खास झाले होते. लॉकडाऊन झाले नसले तर कदाचित त्या दोघांना त्यांचे प्रेम अशा पद्धतीने परत मिळाले नसते.
#MyStory: PG मध्ये राहून बॉयफ्रेंड असणं म्हणजे…
shutterstock
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा. आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा.