मला आजही आठवतंय जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो तो दिवस. मी तुला पाहिलं आणि तू छान स्माईल दिलीस आणि मी प्रेमातच पडले. लव्ह अॅट फर्स्ट साईट म्हणतात ते आणि तुलाही ते कळलं होतं. हो ना…त्यानंतरच्या अनेक भेटीनंतर अखेर आपण डेटवर गेलो. मला आजही आठवतंय की, तू मला कंफर्टेबल वाटावं म्हणून तू सतत माझ्या आसपास असायचास. पण माझ्या हेही लक्षात आहे की, आपल्यातल्या सुंदर नात्याला जेव्हा पहिल्यांदा तडा गेला. तू मला पहिल्यांदा असं सांगितलंस की, तूला माझ्याशी बोलायचं आहे. ज्या दिवशी तू आपलं नातं तोडून माझ्यापासून दूर जायचं ठरवलंस. त्या दिवशी आपल्यात किती वाद झाले होते. तू आत्तापर्यंत माझ्याशी जे जे खोटं बोलत होतास, इतक्यात दिवसात आपल्या सुरू झालेली भांडण आणि दुरावा या सगळ्याचा अर्थ आता मला त्या दिवशी कळू लागला. तरीही मला आपलं नातं तुटू द्यायचं नव्हतं. एक संधी हवी होती ते पुन्हा पहिल्यासारखं करायची पण तू तुझ्या मतावर ठाम होतास की, तुला हे नातं ही नकोय आणि मीही. त्या दिवशी मला तुझी प्रचंड चीड येत होती. मला केलेले सगळे प्रोमिसेस तोडून मला असं तुटलेल्या अवस्थेत सोडल्याबद्दल खूप राग येत होता. तुझा राग, देवाचा राग…माझा स्वतःबद्दलही मला राग येत होता की, मी कशी तुझ्या प्रेमात एवढी बुडले की, मला तुझं खरं रूप दिसलंच नाही. या नात्यात मी कुठे कमी पडले होते की, हे नातं फक्त काही दिवसांचा खेळ होतं.
मी तुला कशी विसरेन? कारण हा माझ्यावर झालेला एक मोठा आघातही होता आणि सर्वात मोठी आयुष्यभरासाठी मिळालेली शिकवणही होती. मला माहीत होतं की, यानंतर मी पुन्हा कधीच कोणाच्या प्रेमात पडणार नाही. कारण काही गोष्टी आपल्या आयुष्यात फक्त एकदाच होतात आणि मी ती संधी गमावून बसले होते.
आता जेव्हा मी मागे वळून बघते तेव्हा मला आठवतं की, अगदी बेशुद्ध होईपर्यंत मी कशी रडले होते. तेव्हा माझी मलाच समजूत काढणं भाग होतं की, सगळं ठीक होईल. तुझ्या त्या जोडीदाराला विसर. निगेटीव्ह भावनांना आणि रागाला तिलांजली दे. तुझ्या तुटलेल्या हृद्याचे तुकडे उचल आणि पुन्हा जोड. तुला नक्कीच खरं प्रेम मिळेल.
ब्रेकअपवर मात कशी करावी हे देखील वाचा
माझ्या आयुष्यात पुन्हा प्रेम आलं पण ते पहिल्या प्रेमासारखं अवखळ आणि जादुई वाटलं नाही. पण त्या प्रेमाने माझ्या आयुष्याला स्थिरता आणि मनाला शांतता नक्कीच दिली. पहिल्या नात्यासारखा मूर्खपणा मी यावेळी केला नाही. हेही खरं आहे की दुसरं नातंही फार टिकलं नाही. पण यावेळी माझ्या अंतर्मनाला ते संपल्यावर जास्त त्रास झाला नाही. दुसऱ्या वेळी मी ब्रेकअपला शांतपणे आणि समंजसपणाने सामोरे गेले.
आपल्या ब्रेकअप(breakup)नंतर झालेल्या रिलेशनशिपमध्ये मला तिच एक्साईटमेंट, पॅशन आणि इंटेसिटी पुन्हा अनुभवता नाही आली. कारण त्या सर्व रिलेशनशिप्स खूपच रिएलिस्टीक होत्या. यामागे एक कारण असू शकतं की, आता मला कळलं होतं की, मला माझ्या पार्टनरकडून आणि नात्याकडून काय हवंय. परत कधी ते पपी लव्ह अनुभवता आलं नाही पण जे होतं ते खरं होतं आणि नॉर्मल होतं.
पहिलं प्रेम एखाद्या रोलरकोस्टर राईडसारखं होतं भरपूर इमोशन्स असलेलं. पण दुसऱ्यांदा प्रेम तेवढंच मनाला शांतता देणारं होतं. पहिल्या ब्रेकअपवेळी मला असं खूप वाटलेलं की हे नातं तुटू नये. पण आता ते नातं तुटलं हे योग्य वाटतं. कारण आज मी त्या प्रसंगानंतर जी व्यक्ती आहे ती कदाचित होऊ शकले नसते.
आज माझ्या मनात तुझ्याबद्दल कोणतीही कटुता नाही. कारण पहिल्या फसलेल्या प्रेमाने मला आयुष्यातील बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या आणि मला अजून चांगली प्रेयसी बनवलं.
जेव्हा प्रेमाचा पाठलाग थांबतो
खरं नातं तेव्हा सुरू होतं जेव्हा तुमच्यातील आकर्षणाचा, फ्लर्टींगचा मजेशीर काळ आणि पहिल्या किसची जादू ओसरते. तू ज्या प्रकारे माझ्याशी वागलास त्यातून मी खूप महत्त्वाची गोष्ट शिकले. ती म्हणजे आनंदी कसं राहावं आणि आयुष्यातील ती ओढ संपल्यावरही समाधानी कसं राहावं.
आयुष्यात चांगल्या गोष्टी घडण्यासाठी वाईटातून जावंच लागतं
जर कोणीतरी पहिलं होतं तर दुसरं, तिसरं आणि अजून कोणीतरीही आयुष्यात नक्कीच येईल. माझ्या आयुष्यातही ती फेज आली होती. जेव्हा तू मला सोडलंस आणि माझ्या आयुष्यात दुसरं प्रेम आलं. तेव्हा मला कळलं की, जोपर्यंत मी जुन्या नात्यातून बाहेर पडणार नाही तोपर्यंत मला अजून चांगलं आणि त्यापेक्षा सुंदर नात शोधता येणार नाही.
नात्यातून केव्हा बाहेर पडावं
आमच्या नात्यात अशा घटना अनेक वेळा आल्या जेव्हा मला वाटलं की, आमचं नात काही टिकणार नाही आणि आम्हाला दोघांनाही आयुष्याकडून वेगळ्या गोष्टी हव्या आहेत. पण त्या क्षणी तुझ्यापासून दूर जाण्याचा विचाराने मला थांबवलं. तुझ्यानंतर आयुष्यात आलेल्या प्रत्येक नात्यात मी ती चूक केली नाही आणि मला कळलं की कुठे थांबावं. माझ्या पहिल्या नात्याचा परिणाम भविष्यातील नात्यांवर झाला असं नाही. पण मी इतकी खंबीर नक्कीच झाले होते की, नातं ताणायचं नाही हे मला कळलं होतं. काही माणसांना आपल्या आयुष्यातून जाऊ देणं हेच चांगलं असतं.
प्रेमाचा प्रवास नाही सोपा
एखाद्यावर प्रेम करणं ही गोष्ट सोपी नाही. प्रत्येक नात्यात भांडण होतात. काही बाबतीत तुमचं एकमत असतं काही बाबतीत दोघांचेही मतभेद असू शकतात. बट ईट्स ओके. माझ्या तुटलेल्या नात्यातून मला एक गोष्ट नक्कीच कळली की, तुमच्या आणि पार्टनरच्या विचारात तफावत असू शकते आणि त्यामुळे वादही होऊ शकतात. पण शेवटी त्यावर बोलूनच तुम्हाला तोडगा काढावा लागतो. एकमेंकाचा ईगो बाजूला ठेवावा लागतो. नाहीतर ते नातंच संपुष्टात येईल. जसं आमच्याबाबतीत झालं.
हा जगाचा अंत नाही
तुमचं ब्रेकअप झाल्या झाल्या तुम्हाला वाटतं की, आता आयुष्यात काहीच उरलं नाही. आपण यातून कसे बाहेर पडू पण असं नाहीयं. या परिस्थितीतून बाहेर पडणं कितीही कठीण वाटत असलं तरी ते शक्य होतंच. तुझं आयुष्यातून निघून जाणं मला बरंच काही शिकवून गेलं. मी तुझ्यावर इतकं जीवापाड प्रेम केलं आणि तरीही तू माझं हार्टब्रेक केल्यावर मी त्या दुःखातून सावरले आणि त्यामुळे आता मला आयुष्यात कोणतंही संकट आलं तरी मी त्याच्याशी धीटपणे लढू शकते.
आता आयुष्यात मी एका अशा आनंदी वळणावर आहे की, मी तुला आता दोष देत नाही. तुझ्यानंतर मी पुन्हा तशी चूक कधीच केली नाही. पण माझ्या आयुष्यात अर्थपूर्ण नाती आणि सुंदर माणसं नक्कीच आली. आता नात्याबाबत मी तेवढी हळवी राहिली नाहीयं. महत्त्वाचं म्हणजे तुलाच धन्यवाद. कारण आता मला प्रेम करण्याचीही भीती वाटत नाही.
P.S. माझ्या मनात आजही कधी कधी तुझा विचार येतो. येणारच ना कारण, तूच माझं पहिलं प्रेम होतास आणि माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धडाही.
वरील कथा आणि त्यातील अनुभवावरून तुम्हाला नक्कीच कळलं असेल की, एक नातं तुटल्याने ना आयुष्य संपत ना जग थांबतं. त्यामुळे ब्रेकअप झाला तरी खचू नका. आयुष्यात येणाऱ्या पुढील व्यक्तीची निवड नीट करा आणि मुख्य म्हणजे आनंदी राहा. तुमच्याकडेही असा एखादा अनुभव असेल तर आमच्यासोबत नक्की शेअर करा.
हेही वाचा –
प्रेम करता? घरी सांगायचय? तुमच्यासाठी खास टीप्स
‘प्रेम कधीच इतकं तितकं नसतं; ते एक तर असतं किंवा नसतं’
जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’