ADVERTISEMENT
home / त्वचेची काळजी
Lychee peels benefits in Marathi

लिची खाल्ल्यावर फेकू नका साल, त्वचेची निगा राखण्यासाठी करा असा वापर

उन्हाळ्यात मिळणारं एक स्वादिष्ट आणि गारेगार फळ म्हणजे लिची… लिचीची लालचुटूक फळं पाहिली की कोणालाही ते खाण्याचा मोह आवरणार नाही. लिचीमध्ये पाण्याचा अंश अधिक असल्यामुळे लिची खाण्यामुळे तुमचं शरीर हायड्रेट राहतं. व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन, फोलेट, नियासिन, रायबोफ्लेविन अशी अनेक पोषक तत्त्वं असल्यामुळे लिची खाण्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती वाढते. वजन कमी करण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी लिची खाणं फायद्याचं ठरतं. लिचीचं फळ अनेक गुणधर्मांनी भरलेलं आहेच पण याची सालेदेखील गुणकारी आहेत. लिची खाल्ल्यावर जर तुम्ही साल फेकून देत असाल, तर असं मुळीच करू नका. कारण त्वचेची निगा राखण्यासाठी यापासून तुम्ही अनेक घरगुती उपाय करू शकता.

लिचीच्या सालींचे फायदे – Lychee Peels Benefits 

लिचीच्या सालींचा वापर करून तुम्ही त्वचेची निगा राखू शकता. यासाठी जाणून घ्या कसा करावा त्वचेसाठी लिचीच्या सालींचा वापर

लिचीच्या सालींचा स्क्रब –

लिचीच्या सालींचा वापर तुम्ही त्वचेसाठी स्क्रब करण्यासाठी वापरू शकता. नैसर्गिक स्क्रब तयार करण्यासाठी लिचीची साले मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. ज्यामध्ये तांदळाचे पीठ, कोरफडाचा गर आणि गुलाबपाणी मिसळा. सर्व साहित्य एकजीव करा आणि चेहऱ्यावर फेस स्क्रब लावा. स्क्रब सुकल्यावर बोटांनी गोलाकार मसाज करून स्क्रब काढून टाका. साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ करा. या स्क्रबमुळे तुमच्या त्वचेवरील काळेडाग, मृत त्वचा आणि धुळीचे कण स्वच्छ होतात आणि त्वचा तजेलदार दिसू लागते.

मान स्वच्छ करण्यासाठी बॉडी पॅक –

मानेवर घाम आणि अस्वच्छतेमुळे काळे डाग पडतात. मान स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिचीच्या सालींचा पॅक लावू शकता. लिचीच्या साली मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यात लिंबाचा रस, नारळाचे तेल, चिमूटभर हळद टाकून पेस्ट तयार करा आणि ती मानेवर लावा. मानेवर मसाज करा ज्यामुळे मानेवर जमा झालेली डेड स्किन निघून जाईल आणि मान स्वच्छ दिसू लागेल.

ADVERTISEMENT

पायांच्या टाचांसाठी बॉडी पॅक –

पायाच्या टाचा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिचीच्या सालींचा वापर करू शकता. यासाठीदेखील लिचीच्या साली मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यामध्ये मुलतानी माती, बेकिंग सोडा, अॅपल सायडर व्हिनेगर मिसळा. पॅक तुमच्या टाचांवर आणि पावलांवर लावा आणि काही मीनिटे तसाच ठेवा. पाय स्वच्छ करा आणि त्यानंतर टाचा मऊ ब्रशने घासून स्वच्छ करा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

03 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT