भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक महत्वपूर्ण व्यक्ती म्हणून महात्मा गांधी यांचे नाव आवर्जून घेतले जाते. अंहिसेची कास धरत त्यांनी असहकाराच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गाने स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी लोकांना कायम प्रवृत्त केलं. अशा या थोर व्यक्तीची जयंती देशभरात 2 ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात येते. देशासाठी त्यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या जयंतीला नव्या पिढीलाही त्यांच्या कामगिरीची आठवण राहणे गरजेचेच आहे. म्हणूनच या गांधीजयंतीला तुम्ही गांधीजींचे विचार, Mahatma Gandhi Jayanti Quotes In Marathi, Mahatma Gandhi Jayanti Sandesh In Marathi, Mahatma Gandhi Jayanti Thoughts In Marathi, Mahatma Gandhi Che Vichar In Marathi नक्कीच शेअर करा. इतर कोणत्याही दिवसांप्रमाणे तुम्ही नक्कीच गांधी जयंतीच्याही शुभेच्छा द्या. तुमच्यासाठी आम्ही गांधीजीचे विचार आणि शुभेच्छा संदेश यांची एक यादीच केली आहे. म्हणजे तुम्हाला ते पाठवणे अगदी सोपे जाईल.
Mahatma Gandhi Marathi Quotes | गांधीजीचे हे 10 विचार तुम्हाला नक्कीच प्रेरणा देतील
- इतरांच्या सेवेत स्वत:ला समर्पित करा.. तुम्हाला तुमचा ‘स्व’ सापडेल.
- जग बदलायचं असेल आधी स्वत:ला बदला.
- असे जगा की उद्या तुम्ही मरणार आहात आणि असे शिका की तुम्ही नेहमीसाठी जगणार आहात.
- पहिले ते तुमच्याकडे लक्ष देणार नाहीत, नंतर ते तुमच्याकडे पाहून हसतील.. आणि नंतर ते तुमच्याशी भांडतील तेव्हा तुम्ही जिंकाल.
- तुम्ही मला साखळदंडात बांधून ठेऊ शकता.. यातना देऊ शकता…एवढेच नाही तर माझे शरीर नष्ट करु शकता; पण तुम्ही माझे विचार कधीच बंदीस्त करुन ठेऊ शकत नाही.
- विश्वास ठेवणे एक गूण आहे, अविश्वास दुर्बलतेची जननी आहे.
- जेव्हा मी निराश होतो.. तेव्हा मी स्मरणात आणतो की, संपूर्ण इतिहासात सत्य आणि प्रेमाच्याच मार्गाचा विजय झाला आहे.
- आपल्या योजनेवर विश्वास ठेवणारा एक सूक्ष्म जीव संपूर्ण इतिहास बदलू शकतो.
- माझा धर्म सत्य आणि अंहिसेवर आधारीत आहे. सत्य माझा परमेश्वर आणि अंहिसा त्याला प्राप्त करण्याचे साधन
- केवळ प्रसन्नताच एकमेव अत्तर आहे, जे तुम्ही इतरांवर शिंपडल्यास त्यातील काही थेंब नक्कीच तुमच्यावर पडतील.
- मानवतेवरील विश्वास गमावू नका. मानवता एखाद्या सागराप्रमाणे आहे. जर या सागराचे काही थेंब वाईट असले तरी संपूर्ण सागर वाईट असू शकत नाही.
- ज्या दिवशी एक महिला रात्री रस्त्यावर एकट्याने फिरू शकेल, त्या दिवशी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं असं आपण म्हणू शकतो.
- व्यक्ती हा आपल्या विचारांनी घडणारा प्राणी आहे, तो जो विचार करतो तसाच तो बनतो.
सावरकरांचे विचार (Savarkar Thoughts In Marathi)
Mahatma Gandhi Sandesh In Marathi | गांधी जयंतीसाठी खास शुभेच्छा संदेश
- रघुपति राघव राजाराम.. पतित पावन सीताराम… राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाच्या शुभेच्छा
- अहिंसेचे पुजारी, सत्याच्या वाटेवरुन चालणारे, ईमानदारीचे धडे देणारे… बापूजी… महात्मा गांधी जयंतीच्या शुभेच्छा
- डोळ्याबदली डोळा ही संपूर्ण जगाला आंधळी करु शकतो, गांधी जयंतीच्या शुभेच्छा
- माझे आयुष्य हे संदेश एक संदेश आहे- महात्मा गांधी, गांधी जयंतीच्या शुभेच्छा
- खादी माझी शान आहे…कर्म ही माझी पूजा..माझे कर्म खरे आहे…आणि माझा देश माझा जीव आहे… गांधी जयंतीच्या शुभेच्छा
- बापूजींवर प्रेम करण्यासाठी… तुम्हाला गांधीजींचे विचार जाणून घेणे फारच गरजेचे आहे… तरचं तुम्ही गांधीजींच्या प्रेमात पडाल… गांधी जयंतीच्या शुभेच्छा
- जो देवावर विश्वास ठेवत नाही तो मनुष्य नाही.. आणि जो गांधीजींना मानत नाही तो भारतीय नाही… गांधी जयंतीच्या शुभेच्छा
- जो पर्यंत आपल्या आयुष्यात गांधीजी आहे तो पर्यंत आपल्यासोबत काहीच वाईट होणार नाही… गांधी जयंतीच्या शुभेच्छा
- गांधीच्या विचारांची धरा कास… कारण आता त्यांच्या विचारांची देशाला फार गरज आहे… गांधी जयंतीच्या शुभेच्छा
- गांधी जयंतीला सुट्टी देण्याऐवजी विद्यार्थ्यांना गांधीजीचे विचार शिकवा… गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
- विनम्रतेने तुम्ही संपूर्ण जगाला बदलू शकता… गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
- शक्ती ही शारीरिक क्षमतेने येत नाही तर एका अतूट इच्छा शक्तीने येते… गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
- थोडा सा अभ्यास हा खूप साऱ्या उपदेशांपेक्षा उत्तम आहे… गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
- विश्वासाला नेहमी तर्काची जोड असलीच पाहिजे. जेव्हा विश्वास आंधळा होतो, तेव्हा तो मरतो… गांधी जयंतीच्या शुभेच्छा
15 ऑगस्टसाठी खास शुभेच्छा संदेश (Independence Day Quotes In Marathi)
Mahatma Gandhi Che Vichar In Marathi | गांधी जयंतीसाठी खास व्हॉटसअप मेसेज
- आरोग्यच तुमचा खरा दागिना आहे. सोन्या, चांदीपेक्षाही याचे मूल्य जास्त आहे.
- पृथ्वी सगळ्यांसाठी आवश्यक संसाधनांची निर्मिती करत असते. पण ती लालूस पूर्ण करु शकत नाही.
- आपण आपला स्वाभिमान कोणाला देऊच शकला नाही, तर तो तुमच्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही.
- गरिबीही हा सगळ्यात मोठा विध्वंस आहे.
- अहिंसा ही सध्याच्या काळाची गरज आहे.. कारण जगामध्ये अराजकतेने डोकं वर काढलं आहे.
- जग बदलण्यासाठी प्रत्येक वेळी काही मोठ करण्याची गरज नाही… कारण शांततेनेही बऱ्याच गोष्टी होऊ शकतात.
- गांधी जयंतीला एकच सांगणे… जगा तर गांधीजींसारखे जगा नाहीतर तुमच्या जगण्याला नाही अर्थ
- श्रद्धाचा अर्थ आहे आत्मविश्वास आणि आत्मविश्वासचा अर्थ आहे ईश्वरावर विश्वास… गांधी जयंतीच्या शुभेच्छा
- सलाम या महान नेत्याला ज्याने देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्राणाची आहुती दिली… गांधी जयंतीच्या शुभेच्छा
- अहिंसा,सत्य आणि सहिष्णुता… याचे रुप म्हणजे महात्मा.. गांधी जयंतीच्या शुभेच्छा
- भविष्य या गोष्टीवर अवलंबून आहे की, तुम्ही आज काय करत आहात… गांधी जयंतीच्या शुभेच्छा
- मौन हा सर्वात सशक्त भाषणाचा मार्ग आहे. जे हळूहळू सर्व जगाला ऐकू जाईल… गांधी जयंतीच्या शुभेच्छा
- एक चांगला माणूस प्रत्येक सजीवाचा मित्र असतो… गांधी जयंतीच्या शुभेच्छा
वाचा – महात्मा फुले कोट्स मराठीत (Mahatma Phule Quotes In Marathi)
Mahatma Gandhi Thoughts In Marathi | गांधीजीचे अहिंसा विचार
- अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर बलवानांचे शस्त्र आहे.
- अशी अनेक ध्येय आहेत ज्यासाठी मी जीव द्यायला तयार होईन, पण असे एकही ध्येय नाही ज्यासाठी मी कोणाचा जीव घेईन.
- डोळ्यासाठी डोळा संपूर्ण जगाला आंधळे करुन सोडेल.
- विध्वंस हा सर्वंकषतावादाच्या नावाखाली केला गेला की, स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या नावाखाली-(त्यातील) मृतांसाठी, अनाथांसाठी आणि गृहहीनांसाठी काय फरक असणार?
- ईश्वर सत्य आहे असे म्हणण्यापेक्षा सत्य हेच ईश्वर आहे असे म्हणा
- अहिंसा ही मनुष्याची सर्वात मोठी ताकद आहे. हे जगातील कोणत्याही हत्यारापेक्षा अधिक ताकदवान आहे.
- स्वत्व शोधण्याचा सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे स्वत:ला दुसऱ्यांच्या सेवेत झोकून देणे.
- विनम्रतेने तुम्ही संपूर्ण जगाला हादरवू शकता.
- जिथे प्रेम आहे तिथेच खरे जीवन आहे.
- जास्त काम नाही तर काम नसले माणसाला मारत असते.
प्रजासत्ताक दिनासाठी खास शुभेच्छा संदेश आणि स्टेटस (Republic Day Wishes In Marathi)
Best Gandhi Jayanti Quotes In Marathi | गांधीचे 10 सर्वोत्तम विचार
- आनंद तेव्हाच मिळतो. ज्यावेळी तुम्ही जो विचार करता, जे बोलता आणि जे कृतीत आणता.. ते सामंजस्याने केलेले हवे.
- तेव्हाच बोला जेव्हा तुमचे बोलणे मौन धारण करण्यापेक्षा जास्त महत्वाचे असेल.
- माझ्या परवानगीशिवाय मला कोणीही दुखावू शकत नाही.
- व्यक्तीची ओळख त्याच्या कपड्यावरुन नाही तर त्याच्या चारित्र्यावरुन होते.
- एखादी व्यक्ती केवळ आपल्या विचाराने बनते, जो तो विचार करतो तोच तो बनत असतो.
- जेव्हा तुमचा सामना तुमच्या विरोधकांशी होईल.. त्यावेळी त्याला प्रेमाने जिंका.
- क्रोध आणि असहिष्णुता हे खरे शत्रू आहेत.
- शक्ती शारिरीक क्षमतेमुळे येत नाही. तर ती तुमच्या ईच्छाशक्तीमुळे येते.
- एक चांगली व्यक्ती ही प्रत्येक सजीवाचा चांगला मित्र असते.
- कमजोर व्यक्ती कधीही माफी मागत नाही. पण क्षमा करणे हे एका ताकदवान व्यक्तीचे विशेष आहे.
वाचा – Best Vishwas Nangare Patil Suvichar
Mahatma Gandhi Quotes On Education In Marathi | बापुजींचे शिक्षणावर आधारीत विचार
- मला देवाकडून मिळाले आहे. ते मी देवाच्या चरणी अर्पण करतो.
- रोजच्या प्रार्थनेत शब्द नसले तरी चालेल. पण हृदय हवे… कारण हृदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत.
- ज्या व्यक्तीमध्ये विचार करण्याची क्षमता असते. त्या व्यक्तीला शिक्षकाचीही गरज नसते.
- आपल्या ज्ञानावर अधिक विश्वास ठेवणे मुर्खपणा आहे. या गोष्टीची आठवण करुन देणे गरजेचे आहे की, सगळ्या मजबूत कमजोर पडू शकतो आणि हुशार व्यक्तीकडून चुका ही होऊ शकतात.
- तुम्ही जे काही करत असाल तर इतरांसाठी कदाचित नगण्य आहे पण तुम्ही ते करणे गरजेचे असते.
- मौन सगळ्यात सशक्त भाषण आहे, हळूहळू लोक तुमचे ऐकायला लागतील.
- तुम्ही आज काय करता त्यावर तुमचे भविष्य अवलंबून आहे.
- जर तुम्ही रामासारखे वागू शकत नसाल तर तुमच्या रामायणपठणाला काहीच अर्थ नाही.
- जर तुम्ही काहीही केले नाही तर तुमच्या आयुष्य जगण्याला काहीच अर्थ राहणार नाही.
- चूक स्विकारणे हे केर काढण्यासारखे आहे. जे तुमचे मन स्वच्छ आणि साफ करते.
यशाची व्याख्या सांगणारे सक्सेस कोट्स (Best Success Quotes In Marathi)
बापूसंदर्भात पडणारे (FAQ’s)
1- महात्मा गांधीजींना महात्मा का म्हणतात?
मोहनदास करमचंद गांधी यांना सगळ्यात आधी महात्मा ही पदवी सगळ्यात आधी रवींद्रनाथ टागोर यांनी दिली. रवींद्रनाथ टागोरांनी गांधीजींना लिहिलेल्या पत्रात त्यांचा महात्मा असा उल्लेख केला आहे. त्यानंतर लोक तिला प्रेमाने महात्मा म्हणायला सुरुवात केली. महात्मा म्हणजे महान आत्मा…. कारण त्यांनी देशाला त्यांच्या विचारातून दिशा देण्याचे काम केले.
2- महात्मा गांधी यांनी जगाला कसे बदलले?
महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देताना असहकार आणि अहिंसेची शिकवण दिली. त्यांनी लोकांना सगळ्याकडे पाहण्याची एक वेगळीच दृष्टी दिली. त्यांच्या या शिकवणीचा प्रभाव जगावर झाला.आजही गांधीजींचे विचार जगभरात मानले जातात.
3- महात्मा गांधी यांचे साहित्य?
महात्मा गांधी यांनी अनेक साहित्य लिहिले आहे.
- Indian Home Rule (हिंद स्वराज्य)
- गांधीजींची संक्षिप्त आत्मकथा
- गांधीजीचे जीवन त्यांच्याच शब्दांत
- गांधी विचार दर्शन : अहिंसाविचार
- गांधी विचार दर्शन : राजकारण
- गांधी विचार दर्षन : सत्याग्रह प्रयोग
- गांधी विचार दर्शन : सत्याग्रह विचार
- गांधी विचार दर्शन : सत्याग्रहाची जन्मकथा
- गांधी विचार दर्शन : हरिजन
- नैतिक धर्म
- माझ्या स्वप्नांचा भारत
4- महात्मा गांधीचा संदेश?
महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा आणि सहिष्णुतेचा संदेश दिला. त्यांनी त्यांचे विचार त्यांच्या साहित्यातून मांडले.
5- गांधीजींचे शेवटचे शब्द कोणते होते?
नथुराम गोडसे यांनी गांधीजी यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पण मरताना त्यांनी ‘हे राम’ असे म्हटले. असे त्यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकात म्हटले आहे.