ADVERTISEMENT
home / मनोरंजन
‘नागिन 6’ मध्ये महक चहल आणि रिद्धिमा पंडितची एन्ट्री

‘नागिन 6’ मध्ये महक चहल आणि रिद्धिमा पंडितची एन्ट्री

टेलीव्हिजनवरील सुपरहिट ठरलेला ‘नागिन’ शो पुन्हा नव्या सीझनसह परत येत आहे. काही आठवड्यापूर्वीच एकता कपूरने  ‘नागिन 6’ ची घोषणा एका शोमध्ये प्रेक्षकांसमोर केली होती. मात्र त्यावेळी तिने फक्त तिच्या नव्या सीझनच्या नव्या नागिणीच्या नावाची हिंट दिली होती. तिने दिलेल्या हिंटनुसार नव्या नागिणीचे नाव ‘म’ वरून सुरू होणारे होते. ज्यामुळे चाहत्यांनी ‘म’ वरून सुरू होणाऱ्या अनेक अभिनेत्रींच्या नावाचा अंदाज बांधायला सुरूवात केली होती. मात्र आता नव्या नागिणीची प्रतिक्षा संपली आहे. कारण एकताच्या नागिन 6 साठी या दोन अभिनेत्रींच्या नावाबाबत शिक्कामोर्तब झालं आहे.

यामी गौतमने उघड केलं सौंदर्यांचं रहस्य, अशी पडली गालावर खळी

‘नागिन 6’ मध्ये होणार या दोन अभिनेत्रींची एन्ट्री

नागिन 6 मध्ये कोण नवीन नागिण असणार यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये आता महक चहल आणि रिद्धिमा पंडितची एन्ट्री झाली आहे. रिद्धिमा यापूर्वी बिग बॉस ओटीटीमधून प्रेक्षकांसमोर आली होती. एकता कपूर आणि रिद्धिमा एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. त्याचप्रमाणे महक चहल रोहीत शेट्टीच्या खतरों के खिलाडी 11 मध्ये स्पर्धक होती. त्यामुळे आता या दोन अभिनेत्री नागिण बनून बदला घेण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. 

Bigg Boss 15: मराठी स्पर्धकांचा यावर्षी आहे पगडा, प्रेक्षकही खूष

ADVERTISEMENT

नागिन टीव्हीवरील लोकप्रिय शो

एकता कपूरच्या नागिनमधून आजवर अनेक अभिनेत्री सुपरहिट झाल्या आहेत. कारण आजवरचा हा एक सुपरहिट सुपर नॅचरल शो आहे. आतापर्यंत एकताच्या नागिनमध्ये मौनी रॉय, अदा खान, रश्मि देसाई, सुरभी चंदना, निया शर्मा, जॅस्मिन भसीन, हिना खान आणि करिश्मा तन्नाने मुख्य भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे आता यापुढे हेच यश महक चहल आणि रिद्धिमा पंडितच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. एकता कपूरचा नागिन 6 जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून प्रदर्शित होणार आहे. याआधीचा पाचवा सीझन फार चालला नव्हता कारण त्यावेळी लॉकडाऊन आणि कोरोनाचं दुष्ट संकट मालिकांवर घोंघावत होतं. मात्र यावेळी एकताने या सीझनसाठी चांगलीच कंबर कसली आहे. भयानक ट्वीस्ट आणि वीएफएक्सने ती हा सीझन सुपरहिट करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही या सीझनची उत्सुकता नक्कीच लागली आहे. 

आलिया भट साकारणार करिअरमधील सर्वात छोटी भूमिका

01 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT