ADVERTISEMENT
home / बिग बॉस
bigg boss 15

Bigg Boss 15: मराठी स्पर्धकांचा यावर्षी आहे पगडा, प्रेक्षकही खूष

बिग बॉस (Bigg Boss 15) नेहमीच चर्चेत असते. यामध्ये अनेकदा म्हटले जाते की, मराठी स्पर्धकांना मागे ठेवण्यात येते. मात्र यावर्षी हे चित्र खूपच वेगळे दिसून येत आहे. यावर्षी चार मराठी स्पर्धकांनी आपला पगडा या शो वर ठेवला आहे. त्यापैकी सर्वात वर नाव आहे ते म्हणजे मराठमोळी अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) हिचे. तर निशांत भट (Nishat Bhatt), नुकचेत VIP म्हणून आलेले राखी सावंत (Rakhi Sawant), अभिजित बिचुकले (Abhijeet Bichukale) यांनीदेखील आल्या आल्या बिग बॉसमध्ये आपला जम बसवला आहे. यावर्षी आलेल्या इतर स्पर्धकांपेक्षा आपला वेगळेपणा या स्पर्धकांनी नक्कीच दाखवला आहे आणि पुन्हा एकदा मराठमोळे असूनही मागे राहतात असा जो एक सूर प्रेक्षकांमध्ये दिसून येतो तो यावर्षीदेखील पुसण्यात आला आहे. मागच्या वर्षी राहुल वैद्य (Rahul Vaidya) या स्पर्धकाने प्रेक्षकांचे मन आपल्या खेळाने जिंकले आहे. 

अधिक वाचा – Bigg Boss 15: अभिजित बिचुकलेच्या येण्याने हलले पूर्ण घर

प्रेक्षकही आहेत खूष 

तेजस्वी आणि निशांत यांना बऱ्याच वेळा मराठीतून बोलतानाही प्रेक्षकांनी ऐकले आहे. यासाठी त्यांना बिग बॉसकडून बरेचदा इशारा देण्यात आला. मात्र तरीही मातृभाषा मराठी असल्यामुळे या दोघांच्याही तोंडून नेहमी मराठी भाषा येतेच. त्यामुळे प्रेक्षकांनाही त्यांच्याबद्दल आपलेपणा वाटतो. आता त्यामध्ये राखी सावंत आणि अभिजित बिचुकले या दोघांची भर पडली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना अधिक आनंद झाला आहे. राखी सावंतने नेहमीच बिग बॉसमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. यावर्षी तर तिने अखेर आपला पती रितेश (Ritesh) यालादेखील आणले आहे. मात्र अनेकांना राखी सावंतने आपला खोटा नवरा आणला असल्याचे वाटत आहे. सलमान खाननेदेखील राखीला सर्वांसमोर हा प्रश्न विचारला होता. मात्र राखी कधीच खोटं बोलत नसल्याचे तिच्या नवऱ्याने सांगत सर्व जगासमोर आपल्याला माफ कर असेही त्याने म्हटले आहे. तर आता पहिल्यांच दिवशी राखी आणि राजीवचं भांडण झालं असून रितेशनेदेखील करण आणि तेजस्वीबरोबर पंगा घेतल्याचे दिसत आहे. 

अधिक वाचा – संजय लीला भन्सालीच्या ‘बैजू बावरा’मध्ये अजय देवगण साकारणार तानसेन

ADVERTISEMENT

मराठी स्पर्धकांचा आहे पगडा 

यावर्षी मात्र नक्कीच मराठी स्पर्धकांचा पगडा असल्याचे दिसून येत आहे. तेजस्वी आणि निशांत प्रेक्षकांचे अप्रतिम मनोरंजन करत आहे. मात्र मध्यंतरी करण कुंद्रा (Karan Kundrra) वरील असलेल्या प्रेमामुळे तेजस्वी मागे राहत असल्याचे दिसून येत आहे. तर निशांतही कुठेतरी मागे राहत असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे आता या सर्व थंडावलेल्या स्पर्धकांना पुन्हा एकदा जागृत करण्यासाठी हे स्पर्धक आल्याचे पाहायला मिळत आहे. यावर्षी नेहमीप्रमाणे स्पर्धक खेळत नसल्याचा सूर निवेदक सलमान खान (Salman Khan) यानेदेखील नुकताच आळवला होता. मात्र आता या आठवड्यात हे सर्व स्पर्धक काय करणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तर यावर्षी तर बिग बॉसच्या ट्रॉफीवर एखादा मराठमोळा स्पर्धक नाव कोरणार का याकडेही प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. तेजस्वी अथवा निशांत या दोघांपैकी ही ट्रॉफी पटकवावी असंही बऱ्याच जणांना वाटत आहे. तर करण कुंद्राच्या मागे तेजस्वीने आपली शक्ती वाया घालवू नये असंही तिच्या चाहत्यांना वाटत आहे. त्यामुळे आता तेजस्वीचा खेळ या आठवड्यानंतर काय असेल हेच पाहणे अधिक औत्सुक्याचे ठरणार आहे. 

अधिक वाचा – Bigg Boss Marathi: दादूस झाले एलिमिनेट, आता होणार चुरशीची स्पर्धा

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

29 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT