home / DIY सौंदर्य
उन्हाळ्यात मेकअप प्रॉडक्ट वापरताना

उन्हाळ्यात चेहऱ्याला लावू नका हे मेकअप प्रॉडक्ट

 सध्या वातावरणात चांगलाच उष्मा जाणवत आहे. पावसाने काही ठिकाणी उसंत घेतली आणि जो काही उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे त्वचेवर अनेक बदल होताना दिसत असतील. थोडासा उन्हाळा वाढला की, त्यामुळे तुम्ही रोज लावलेले प्रॉडक्ट चेहऱ्याला त्रासदायक ठरु शकतात. त्यामुळे या वाढत्या तापमानात तुम्ही चेहऱ्याला काय लावावे आणि काय टाळावे? हे जाणून घेणे फार गरजेचे आहे. जर तुम्ही काही मेकअप प्रॉडक्ट लावत असाल तर त्वचेची काळजी म्हणून तुम्ही आजच हे प्रॉडक्ट वापरणे टाळा म्हणजे तुम्हाला नक्कीच तुमच्या त्वचेत बदल झालेला जाणवेल.

सनस्क्रिन निवडताना

 सनस्क्रिन हा उन्हाळ्यातील सगळ्यात महत्वाचा प्रॉडक्ट आहे जो तुम्ही वापरायलाच हवा असतो. त्वचेच्या प्रकारानुसार हल्ली वेगवेगळे सनस्क्रिन मिळतात. उन्हाळ्यात शक्यतो ऑईल बेस असलेले सनस्क्रिन घेऊ नका. कारण असे सनस्क्रिन चेहऱ्यावर पिंपल्स आणण्यासाठी कारणीभूत ठरु शकतात. त्यामुळे मॉईश्चरायझर असलेले सनस्क्रिन निवडा. पण त्यामुळे अजिबात तेल असता कामा नये कारण असे घटक पोअर्समध्ये जाऊन त्याचा त्रास होण्याची अधिक शक्यता असते. 

फाऊंडेशन लावताना

चेहऱ्याला फाऊंडेशन लावणे हे खूप जणांचे रोजचे रुटीन असते. पण जर तुम्हाला गरज नसेल तर तुम्ही उन्हाळ्यात दररोज फाऊंडेशन लावू नका. फाऊंडेशन हे चेहऱ्यावर उतरण्याची शक्यता जास्त असते. त्यातच हल्ली सगळेच मास्कचा वापर करतात. त्यामुळे होतं असं की, ओठांकडील आणि नाकपुड्यांवरील फाऊंडेशन हे निघून जाते. ते ओघळू लागते. त्यामुळे मेकअप हा जास्त काळासाठी टिकून राहात नाही. फाऊंडेशनऐवजी तुम्ही बीबी क्रिमचा वापर करा. तुलनेत ते लाईट आणि चेहऱ्याला फिनिशिंग देणारं असतं. 

मॅट लिपस्टिकची करा निवड

लिपस्टिक हा खूप जणांच्या मेकअप लुकचा अविभाज्य भाग आहे. लिपस्टिकची निवड करायची असेल तर उन्हाळ्यात शक्यतो मॅट लिपस्टिकचा वापर करा. कारण अशा लिपस्टिक तुम्हाला जास्त घाम आणत नाहीत. हल्ली तर टिकणाऱ्या सुपर सॉफ्ट लुक देणाऱ्या मॅट लिपस्टिक मिळतात. जे तुमची त्वचा अधिक चांगली करण्याचे काम करत असतात. त्यामुळे लिपस्टिकचा प्रकार योग्य निवडा. त्यामुळे तुमचा चेहरा अधिक सुंदर दिसेल आणि घाम घाम होणार नाही.

हेवी पावडर टाळा

खूप जणांना रोजच्या रोज पावडर लावण्याची सवय असते. टाल्कम पावडर अंगाला चोळण्यासोबत खूप जण चेहऱ्याला आणि मानेला चोळतात. अशा पावडर या त्वचेवर चिकटून बसतात. त्यामुळे चेहऱ्यावर त्याचे पांढरे डाग पडतात. जसा घाम येतो. तशी पावडर त्वचेला चिकटून राहते. त्याचा परिणाम हा त्वचेवर होतो. त्यामुळे हेवी पावडर किंवा टाल्कम पावडर टाळा कारण त्या त्वचेसाठी त्रासदायक ठरु शकतात. 

आता उन्हाळ्यात चेहऱ्याला अजिबात असे मेकअप प्रॉडक्ट लावू नका.

अधिक वाचा

कोरड्या त्वचेसाठी वापरा घरातील साहित्य आणि बनवा सोपे मास्क

फेशिअलनंतरही येत नसेल चेहऱ्यावर ग्लो, तर त्वचेच्या या प्रकारानुसार घ्या स्टीम

तुमच्या क्रू साठी या मिनी लिपस्टिक्स ठरतील परफेक्ट मेकअप गिफ्ट

25 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this