सणवार म्हटलं की, कितीही समस्या असल्या तरी सर्व बाजूला ठेवून सण साजरे केले जातातच. याचाच प्रत्यय आला यंदाच्या गुडीपाडव्याच्या निमित्ताने. संपूर्ण जगावर कोरोना व्हायरस नावाचं सावट पसरलंय. रोजच्या रोज कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढते आहे. पण तरीही आशेचा किरण हा असतोच आणि मानवजातीची तिच खासियत आहे. तोच आशेचा किरण धरून मनुष्यप्राणी पुढे जात राहतो. मंगळवारी रात्री 8 वाजता पंतप्रधान मोदी यांनी कोरोना व्हायरसचा वाढता धोका बघता भारत लॉकडाऊन जाहीर केलं. पण लॉकडाऊन आणि कोरोना व्हायरसच्या छायेतही मराठी सेलेब्सनी जोरदार साजरा केला गुढीपाढवा. चला पाहूया कोणत्या सेलेब्सनी कसा साजरा केला गुडीपाडवा.
यंदा गुढीपाडव्याच्या सणाची माहिती सेलिब्रेटींनी दिली. सेलिब्रिटीजनी फक्त सण साजरा करतानाच फोटो टाकला असं नाहीतर काहींनी उपयोगी पडतील असे खास व्हिडिओजही शेअर केले ज्यामध्ये अभिनेता रितेश देशमुख आणि अमृता खानविलकरचा समावेश आहे.रितेशने छानपैकी फेटा बांधून दाखवत सगळ्यांना गुडीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
तर अमृता खानविलकरने खास गुढीची साडी आणि इतर सजावट याचा व्हिडीओ शेअर केला. सर्वात लक्षवेधी ठरली ती अभिनेत्री दीप्ती लेलेने उभारलेली मास्कची गुढी. सध्या कोरोना व्हायरसच्या दिवसात आपलं मुख्य रक्षण करण्यात मास्कची सर्वात मोठी भूमिका आहे.
तर मुख्य म्हणजे यंदा कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्व सेलिब्रिटीज घरीच असल्यामुळे सोशल मीडियावर जास्तीत जास्त सेलिब्रिटीजचे फोटो पाहायला मिळाले. पाहा सेलिब्रिटीजचे हे सेलिब्रेशन फोटोज.
मराठीतील बेस्ट कपल उमेश कामत आणि प्रिया बापट तसंच अभिजीत खांडकेकर आणि सुखदा यांनी शेअर केलेले हे फोटो. सुखदाने गुढीला केलेली सजावट आणि तिचं सोशल मीडिया कॅप्शनही हटके होतं.
‘साखरेच्या कड्यां ऐवजी आला मोत्याचा तोडा
हेअर क्लिप्स् ची फुले सुंदर
खर्या फुलांचा हट्ट सोडा
लिंबाचा पाला नाही पण गडू ला आहे सॅनिटायजर चा वर्ख,
इडा पीडा दूर करी
लाडके मोरपंख
निरोगी आरोग्यासाठी घरी रहाणे हेच सूत्र,
चुकलं माकलं भरून काढेल ताजे तुळशीपत्र
. – सुखदा
.
.
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!’
सर्वांच्या बाळूमामा म्हणजेच सुमीत पुसावळे गुढीला वंदन करतानाचा फोटो शेअर केला तसंच अभिनेता शरद केळकरनेही आपल्या मुलीसोबतचा क्युट फोटो शेअर केला.
जनता कर्फ्यूला मुंबईकरांचा आणि सेलेब्सचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बॉलीवूडनेही केलं लॉकडाऊनचं समर्थन
खरंय कितीही संकट आलं तरी तुम्हीही सेलिब्रिटीजप्रमाणे निश्चयाची गुढी उंचावत ठेवून येणारं वर्ष निरोगी राहून साजरं करण्याचा संकल्प नक्की करा. आपल्या कुटुंबासह घरातच राहा आणि निरोगी राहा. #POPxoMarathi कडून सर्व वाचकांना गुडीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.