दिवाळी हा सण प्रत्येकासाठी खास असतो. कारण दिवाळी म्हणजे, प्रकाशाचा, दिव्यांचा आणि आनंदाचा सण. सगळीकडे अगदी उत्साहाने हा सण साजरा केला जातो. दिवाळीच्या दिवशी कुटुंब आणि मित्रमंडळींसोबत मौजमजा करण्यात एक वेगळाच आनंद असतो. अभ्यंगस्नान, सजावट, दिवाळी फराळ, फेस्टिव्ह लुक, आतिषबाजी अशा निरनिराळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात येते. मालिकांमधील कलाकार मात्र तासनतास सेटवरच शूटिंगसाठी बिझी असतात. बऱ्याचदा त्यांचे सर्व सण समारंभ सेटवरच साजरे केले जातात. यंदा मात्र या कलाकारांनी एकत्र येऊन दिवाळी आधीच दिवाळी पार्टीचा आनंद लुटला. तसंच सेलिब्रिटी असले तरीही दिवाळी असो भाऊबीज खास यानिमित्ताने भाऊबीज स्टेटस ठेवले जातातच नाही का?

कलाकारांनी दिवाळी पार्टीचा असा लुटला आनंद
यंदा दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी ‘झी युवा’ वाहिनीचे काही कलाकार सुद्धा एकत्र आले होते. सर्वांनी एकत्र येऊन दिवाळीपार्टीची मजा लुटली. दिवाळीच्या आधीत सर्व कलाकारांनी मिळून दणक्यात हा दिवाळीचा सण साजरा केला. नेहमीच्या व्यस्त कार्यक्रमातून असा आनंद साजरा केल्यामुळे त्यांना कामातून विरंगुळा मिळतो. चित्रीकरणात व्यस्त असलेल्या कलाकारांना अनेकदा प्रत्येक सण कुटुंबासोबत साजरा करणे शक्य होत नाही. पण यंदा झी युवा वाहिनीने या कलाकारांना दिवाळी साजरी करण्याची संधी नक्कीच दिली आहे. विशेष म्हणजे सर्व मालिकांमधील कलाकारांनी एकत्र येऊन सेटवरच दिवाळी साजरी केली. ‘तू अशी जवळी रहा’, ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’, ‘साजणा’, ‘प्रेम, पॉयजन, पंगा’ या सगळ्याच मालिकेतील कलाकारांनी एकत्र येऊन फराळाचा मनसोक्त आनंद लुटला. भरपूर गप्पांसह, घरच्यांसाठी दिवाळीत काय काय विशेष करणार आहेत याविषयी सुद्धा कलाकारांनी गप्पा मारल्या.

तुमचे आवडते कलाकार असा साजरा करणार दिवाळसण
दिवाळीनिमित्त मिळालेल्या सुट्टीत घरी जाऊन दिवाळीच्या कामात हातभार लावणार असल्याचं सगळ्याच कलाकारांचं म्हणणं आहे. शरयू सोनावणे घरी खास कंदील करायला मदत करणार आहे. दामले कुटुंबाने नवे घर घेतले आहे; नव्या घरात आपल्या खरेदीचा वाटा काय असेल हेदेखील निखिलने या गप्पांमध्ये सांगितले. गप्पांसोबतच या कलाकारांचा अंताक्षरीचा डाव सुद्धा रंगला. कलाकारांनी आपल्या मालिकांची शीर्षकगीतं म्हणत हा आनंद वाढवला. दिवाळीची सुट्टी मिळाली असल्याने दोन महिन्यानंतर घरी जात असल्याचा आनंद गौरीच्या चेहऱ्यावर दिसत होता. फराळातील पदार्थांपैकी, बनवण्यासाठी सगळ्यात कठीण असल्याने अनारसे आवडत असल्याचं अभिजितने सांगितलं. आईबाबांना दिवाळीत खास सरप्राईज देणार असल्याचं पूजाने सांगितलं आहे. दिवाळीचा माहोल सेटवर साजरा होत असताना, सर्व कलाकारांनी करण बेंद्रे याला वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या.

तितिक्षा आणि सिद्धार्थची दिवाळी आहे खास
यंदाची दिवाळी साजरी करण्यासाठी तितिक्षा तावडे आणि सिद्दार्थ बोडके यांचे काही खास प्लॅन्स आहेत. या दोघांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.यासोबतच इतरांना त्रास होणार नाही अशाप्रकारे दिवाळी साजरी करण्याचं आवाहन सगळ्यांना केलं आहे. शिवाय त्यांच्या प्लॅन्सबद्दल बोलताना हे दोघे म्हणाले;’तू अशी जवळी राहा’ मालिकेच्या सेटवर सुद्धा दिवाळीचा आनंद लुटण्याची संधी यंदा मिळणार आहे. तितिक्षाने सांगितलं की दिवाळीसाठी मोठी सुट्टी मिळणार असल्याने मी घरी सुद्धा जाणार आहे. त्यामुळे मला यंदा तीनवेळा दिवाळी साजरी करायला मिळणार असल्याने मी खूप खुश आहे.”तर सिद्धार्थ बोडकेने मालिकेत दिवाळी साजरी करण्याचं माझं हे दुसरं वर्ष आहे. सेटवर दिवाळीचा माहोल आणि मिळणार असलेली मोठी सुट्टी या दोन्ही गोष्टींमुळे मला खूप आनंद झालेला आहे. मागच्या वर्षी दिवाळीत घरी जायला मिळालं नव्हतं, पण यंदा मोठी सुट्टी असल्याने मी घरी जाऊ खूप धमाल करणार आहे असं सांगितलंथोडक्यात यंदा हे कलाकार त्यांची दिवाळी आपापल्या घरी आणि कुटुंबासोबत साजरी करणार आहेत. दिवसरात्र शूटिंग करून त्यांनी दिवाळीसाठी सुट्टी प्लॅन केली आहे. सर्वांनी अशी सुखरूप आणि आनंदाची दिवाळी आपल्या कुटुंबासोबत साजरी करावी अशी कलाकारांची इच्छा आहे. शिवाय त्यांनी चाहत्यांनी दिवाळीच्या भरभरून शुभेच्छादेखील दिल्या आहेत.
हे ही वाचा –
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
अधिक वाचा –
दिवाळीत फराळाऐवजी पाहुण्यांना द्या हे खाद्यपदार्थ