मुलीचं आणि वडीलांचं नातं हे वेगळंच असतं. ज्यावेळी एखाद्या मुलाला मुलगी होते. त्या दिवसापासून त्याचे आयुष्य बदलून जाते. मुलीला वाढवणे, तिच्यावर प्रेम करणे, तिचे संरक्षण करणे, तिचा चांगला मित्र बनणे या सगळ्या भूमिका बाबाला पार पाडायच्या असतात. असे करताना तो कधी मुलीचा लाडका बाबा बनतो हे त्यालाही कळत नाही. आई कितीही जवळची असली तरी देखील बाबा हे एक वेगळे प्रेम असते. कधी कधी बाबा फार बोलणारे नसतील पण तरीही आपली मुलगी आली की, त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळे तेज येते. मुलगी सासरी गेली की, सगळ्यात जास्त दु:ख हे बाबांना होते. इतर वेळी मुलगी आणि बाबांमध्ये कुरबूर होत असली तरीदेखील मुलीच्या लग्नात बाबांना आनंद आणि दु:ख असं दोन्ही असतं. अशा मुली-बाबांच्या नात्याला कोणाचीही नजर लागता कामा नये. या नात्यातील गोडवा टिकून ठेवण्यासाठीच Marathi Quotes On Father And Daughter शेअर करत आहोत. यामध्ये Father Faughter Quotes In Marathi ही आहेत .या शिवाय फादर्स डे कोट्स (fathers day quotes in marathi)देखील तुमच्या लाडक्या बाबांना पाठवा
बाबा आणि मुलीच्या गोड नात्यासाठी कोट्स | Sweet Marathi Quotes On Father And Daughter
बाबा मुलीचे नाते असते गोड अशा या गोड गोड नात्यासाठी Sweet Marathi Quotes On Father And Daughter.
- लक्ष्मीच्या पावलांनी तू आली आमच्या घरा,
आयुष्याला दिलीस तू माझ्या नवी दिशा - बाबा मी लाडका तुझा,
कधीही रुस नकोस माझ्यावर बेटा - गोड गोड पापा तुझा मी विसरणार नाही कधी,
तुझ्यावाचून मला करमत नाही कधी - तुम्ही कितीही मोठे झालात
पण एकमेव माणूस ज्याच्याकडे
कायम मोठे म्हणून पाहता तो असतो तुमचा बाबा - बाबा, काय रे किती करतोस कष्ट माझ्यासाठी,
आता थांब थोडा थकला असशील,
म्हातारा तू झालास आता थांब जरा तरी - बाबा, तू कुठेही असलास तरी माझा बेस्ट बाबा आहेस
- कौडकोतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा,
शांत प्रेमळ कठोर रागीट बहुरुपी माझा बाबा - बाबा तुम्ही कुठे नसलात की माझं मन लागत नाही,
तुमच्याशिवाय माझा एकही क्षण जात नाही. - लहान असताना होती माझी छोटीशी बाहुली,
आता मोठी झाली तरी दिसते कशी तान्हुली - तुझ्या लग्नाच्या दिवशी मला आनंद तर होईल,
पण माझा एक डोळा रडेल तुझ्या विरहाने
बाबा मी तुझी बेस्ट मुलगी कोट्स मराठी | Best Father Daughter Quotes In Marathi
बाबासाठी तिची मुलगी ही नेहमी बेस्ट असते. तिने अगदी काहीही केले तरी बाबांचे तिच्या मुलीवरील प्रेम काही केल्या कमी होत नाहीत. अशा बेस्ट मुलीसाठी Best Father Daughter Quotes In Marathi कोट्स तुम्ही अगदी हमखास पाठवायला हवेत.
- कोणी कशाला सांगायला हवे,बाबा तुझ्यासाठी मी तुझी
बेस्ट मुलगी कायमच आहे. - माझ्यासाठी तू काय काय केले
हे शब्दात सांगायची मला काहीही गरज नाही,
कारण तुझी साथ मी कधीच सोडून जाणार नाही - माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत बाबा मी तुझी आहे,
तुझ्यामुळेच माझ्या जीवनाला अर्थ आहे - बाबा झालास तेव्हा त्याचा आनंद केलास तू साजरा,
तोच आनंद तुझी मुलगी टिकवेल जास्तीत जास्त - मला सगळ्या गोष्टी बेस्ट मिळाल्यात कारण मला बाबाच बेस्ट मिळाला आहे.
- बाबा तू माझा बेस्ट, मुलगी मी तुझी बेस्ट,
तुझी माझी जोडी आहे एकदम बेस्ट - पैशाने सर्वकाही मिळेल पण तुझ्यासारखा बाबा मिळणार नाही.
- बाबा नावाच्या सुखापुढे कोणतेही सुख मोठे नाही
- बेस्ट बाबाची मी आहे एकमेव बेस्ट मुलगी
- बाबा तू बेस्ट माझा, तुला सगळं मिळो सदासर्वदा
लाडक्या मुली बाबांसाठी भावनिक कोट्स | Emotional Marathi Quotes On Father And Daughter
बाबांना सोडून जाताना प्रत्येक मुलीच्या भावना या दाटून येतात. बाबांवरील भावनिक नात्यासाठी भावनिक कोट्स खास बाबांसाठी जाणून घ्यायला हवेत. बाबांसाठी Emotional Marathi Quotes On Father And Daughter
- कधी खिसा रिकामा असला तरी नाही म्हणालात नाही,
माझ्या बाबांसारखा मनाने कोणीही श्रीमंत नाही. - तुझ्याशिवाय कसे जगायचे मला माहीत नाही,
बाबा म्हणून काही चुकलो असेल तरी मला सोडून कुठे जाऊ नकोस - मुलगी असूनही कधीच मला मुलापेक्षा कमी न समजणाऱा
आहे तो म्हणजे माझा मामा - जेव्हा सगळे साथ सोडतात,
पण बाप हा कायम पाठीशी असतो - मुलांच्या लग्नासाठी टाचा झिजवणारे
फक्त पालक असतात,
मुलीचा मान खाली पडू नये
म्हणून झटतात ते फक्त बाबा असतात.
- जगातील सगळ्यात मोठे यश म्हणजे माझा बाबा
- संपूर्ण जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल,
पण माझ्यासाठी तुम्ही माझे जग आहात - स्वत: ची झोप आणि भूक न विसरता
जो जागा असतो तो असतो माझा बाबा - हजारो माणसं मिळतील पण बाबा
तुमच्यासारखा कोणी मिळणार नाही - बाबा हा शब्द छोटा असला तरी त्याला शब्दात मांडणे सगळ्यात कठीण आहे
मुलगी वडील कौतुक कोट्स – Marathi Quotes On Father And Daughter Appreciation
बाबा- मुलीच्या नात्याची तारीफ करावी तेवढी कमी आहे. अशा या खास नात्यासाठी Marathi Quotes On Father And Daughter Appreciation कोट्स तुम्ही अगदी नक्की पाठवायला हव्यात
- मी कधी सांगत नाही,
तुम्ही कधी बोलत नाही,
पण माझ्यासाठी तुम्ही बेस्ट बाबा आहेत - मुली म्हणजे प्रत्येक बाबाचा जीव की प्राण
- तुझ्या तोंडातून पहिल्यांदा आलेला बाबा हा शब्द आजही विसरु शकत नाही,
याहून आयुष्यात झालेला परमानंद तो कोणता नाही - बाबा तू ज्यावेळी तारीफ करतोस त्याचवेळी मला
मी काहीतरी चांगले करत असल्याचा आनंद मिळतो. - कोणी कितीही वाईट म्हटलं तरी चालेल,
पण माझ्या बाबांनी जो पर्यंत त्याला वाईट म्हटले नाही,
तो पर्यंत ते वाईट नाही. - माझा बाबा मला जे बोलतो तेच माझ्यासाठी खूप आहे,
- बाबा, तुझ्या एका शाबासकीसाठी मी आसुसलेले असते.
- मुली, जो पर्यंत तू मला पापा देत नाही
तोपर्यंत माझा दिवस चांगला जात नाही
- बापाचे प्रेम कळत नाही,
आणि आपल्या बाबासारखे प्रेम कोणीच करु शकत नाही
. - बाबासाठी मुलगी भार नाही तर जीवनाचा आधार आहे
बाबांच्या आठवणीत कोट्स | Marathi Quotes By Daughter After Fathers Death
बाबांची आठवण ही प्रत्येक मुलीसाठी खूप खास असते. बाबांची जागा आयुष्यात कोणीही घेऊ शकत नाही. अशा आपल्या लाडक्या बाबांसाठी Marathi Quotes By Daughter After Fathers Death
- बाबा तुम्ही मला जगण्याचा खरा आनंद दिला,
तुमच्या जाण्याने हा सगळा आनंद हरपलाय,
बाबा मिस यू - बाबा, तुमच्या सगळ्या गोष्टी मला लक्षात आहेत,
तुमच्या आठवणी माझ्यासोबत आहेत - बाबा, तुझी आठवण आली की मन दाटून येतं
पण तू कुठेतरी माझ्यात आहे हेच मला सुखावून जाते - बाबा तू गेलास त्या दिवसापासून माझा आनंद हरपून गेला,
प्रत्येक जन्मी मला तुझी मुलगी म्हणूनच जन्माला यायचे आहे - बाबा, का रे असा गेलास मला सोडून
आता तुझ्यावाचून माझा कोणीही नाही - देव खूप निष्ठुर असतो ज्याची गरज सगळ्यात जास्त
असते त्यालाच घेऊन जातो. - बाबा, बस झाला हा लपंडाव चल ना
आता तरी ये माझ्यासमोर - असा एकही दिवस नाही जेव्हा मला तुझी आठवण येत नाही
- दिवसाची सुरुवात तू आणि माझ्या आयुष्याचा शेवटही बाबा तूच
- बाबा, तू गेलास पण मला खूप दु:ख देऊन गेलास
आता बाबा-मुलीच्या लाडक्या जोडीसाठी खास कोट्स नक्की पाठवायला हवेत. Marathi Quotes On Father And Daughter, Father Daughter Quotes In Marathi हे सगळेच कोट्स तुमच्या बाबांना आणि बाबांच्या लाडक्या मुलीला नक्की आवडतील.