ADVERTISEMENT
home / आरोग्य
mineral water is good or bad for health in marathi

मिनरल वॉटर पिणं आरोग्यासाठी कितपत आहे का योग्य

पाणी हे जीवन आहे. मानवी शरीर हे साठ टक्के पाण्यापासून बनलेलं आहे. त्यामुळे शारीरिक क्रिया सुरळीत सुरू राहण्यासाठी मानवी शरीराला नियमित पुरेशा पाण्याची गरज असते. माणूस काही आठवडे अन्नाशिवाय जगू शकतो. मात्र तो दोन ते तीन दिवस पाण्याशिवाय जगू शकत नाही.यासाठीच निसर्गाने पृथ्वीवर सत्तर टक्के पाण्याची निर्मिती केली असावी. पाणी किती प्यावं आणि कसं प्यावं हे प्रत्येकाच्या शारीरिक क्षमतेवर अवलंबून आहे. मात्र आजकाल अनेकांना फक्त मिनरल वॉटर म्हणजे शुद्ध पाणी पिण्याची सवय लागली आहे. यासाठीच जाणून घेऊ या मिनरल वॉटर पिण्याची सवय माणसाच्या आरोग्यासाठी योग्य आहे की अयोग्य

mineral water is good or bad for health in marathi

मिनरल वॉटर पिणे योग्य की अयोग्य

वास्तविक मिनरल वॉटर म्हणजेच शुद्ध पाणी… शुद्ध पाणी नैसर्गिक झरे, तलावामधून प्राप्त होते. मात्र पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे आजकाल मीठ आणि डिस्टिल्ड पाण्याचा वापर करून कृत्रिम रित्या मिनरल वॉटर बनवले जाते. नैसर्गिक स्त्रोतातून मिळालेले शुद्ध पाणी आणि कृत्रिम पद्धतीने बनवलेले मिनरल वॉटर यांच्या गुणवत्तेत नक्कीच बदल असतो. कत्रिम पद्धतीने बनवलेल्या पाण्यात कॅल्शिअम कार्बोनेट, मॅग्नेशिअम सल्फेट, पोटॅशिअम, सोडियम सल्फेट  जास्त प्रमाणात असू शकतात. त्यामुळे या घटकांचे चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम शरीरवर होतात.

डिटॉक्स वॉटरचे फायदे आणि बनवण्याची पद्धत (Benefits of Making Detox Water In Marathi)

मिनरल वॉटरचे फायदे

मिनरल वॉटरमध्ये कार्बोनेशन आणि मिनरल्स असल्यामुळे याचे आरोग्यावर चांगले फायदे होतात.

ADVERTISEMENT
  • मिनरल वॉटरमध्ये पुरेशा प्रमाणात कॅल्शिअम असल्यामुळे हाडे आणि दात मजबूत राहतात. 
  • मिनरल वॉटरमध्ये मॅग्नेशिअम असल्यामुळे तुमची पचनशक्ती बिघडत नाही. 
  • पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअममुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. 
  • कॅल्शिअम, सोडिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम पोटातील पाण्यात मिसळल्यामुळे शरीरात पुरेसे इलेक्ट्रोलाईटस् तयार होतात. ज्यामुळे तुम्हाला पटकन फ्रेश वाटतं आणि शरीराचा पीएच बॅलन्स संतुलित राहतो.
  • मिनरल वॉटरमधील खनिजांमुळे तुमचे शरीर हायड्रेट राहते आणि डिटॉक्स होते. विषद्रव्ये बाहेर टाकली गेल्यामुळे तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढते. 

नारळपाणी पिण्याचे फायदे वाचाल तर थक्क व्हाल (Coconut Water Benefits In Marathi)

मिनरल वॉटरचे दुष्परिणाम

मिनरल वॉटर पिण्याचे जसे फायदे आहेत तसेच दुष्परिणामही आहेत. 

  • सतत कार्बोनेटेड मिनरल वॉटर पिण्यामुळे यातील  कार्बोनिक अॅसिडमुळे तुम्हाला वारंवार उचकी लागू शकते. 
  • नैसर्गिक पाण्यापेक्षा कार्बोनेटेड मिनरल वॉटरमध्ये पीएच कमी असते. त्यामुळे यातील आम्ल पदार्थांमुळे तुमचे दात लवकर खराब होऊ शकतात. 
  • मिनरल वॉटर प्लास्टिकच्या बाटलीतून विकले जाते. ज्यामुळे तुमच्या शरीर आणि निसर्गावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. 
  • दूषित पाणी पिण्यापेक्षा मिनरल वॉटर पिणे नक्कीच चांगले. कारण यात शरीराला निरोगी ठेवणारी अनेक खनिजे असतात. मात्र अती प्रमाणात मिनरल वॉटर पिणे आरोग्यासाठी धोकादायकही ठरू शकते. त्यामुळे चांगल्या ब्रॅंडचे योग्य चाचणी केलेले मिनरल वॉटर योग्य प्रमाणात पिण्यास काहीच हरकत नाही. प्रवासात मिनरल वॉटर पिणे दूषित पाणी पिण्यापेक्षा नक्कीच चांगले ठरू शकते. 

दररोज गरम पाणी पिण्याचे फायदे (Warm Water Benefits In Marathi)

01 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT