मिसळ म्हटली की कोणाच्या तोंडाला पाणी सुटत नाही. महाराष्ट्रीयन मिसळ पाव (Misal Pav In Marathi) हा सर्वांच्या आवडीचा एक पदार्थ आहे. बाहेर आपण बऱ्याचदा मिसळ पाव खातो. त्याचा स्वाद आपल्याला घरीही तितकाच उत्कृष्टपणे आणता येतो. घरच्या घरी मिसळ पाव कसा बनवयाचा (Misal Pav Recipe In Marathi) अथवा नुसती मिसळ (Misal Recipe In Marathi) तुम्ही घरी कशी करू शकता याबाबत महत्त्वाची माहिती आम्ही या लेखातून देत आहोत. त्याआधी महाराष्ट्रीयन मिसळ पाव संस्कृती बद्दल थोडी माहिती जाणून घ्यायला हवी.
मिसळ म्हणजे अनेक पदार्थांचे मिश्रण. म्हणूनच या पदार्थाला मिसळ (Misal Pav In Marathi ) असे नाव देण्यात आले आहे. मिसळ म्हणजे अगदी फक्कड महाराष्ट्रीयन पदार्थ. मिसळीशिवाय महाराष्ट्रीयन मेनू पूर्णच होत नाही. मिसळीमध्ये मटकी (Moth Bean), वाटाणे (Peas), फरसाण, कांदा, कोथिंबीर, लिंबू, टॉमटो अशा अनेक पदार्थांचा भरणा असतो. तर ही तिखट आणि आंबट चवीची मिसळ पावाबरोबर खायला अप्रतिम लागते. मिसळ अनेक शहरांच्या नावावरून ओळखली जाते आणि तिथल्या तिथल्या भागाचे त्या त्या मिसळीचे वैशिष्ट्यही आहे. अर्थात पुणेरी मिसळ, नाशिकची मिसळ, कोल्हापुरी मिसळ, नगरची मिसळ, सोलापुरची मिसळ असे अनेक प्रकार आहेत आणि याची चवही वेगळी आहे. अशाच काही मस्त मिसळींच्या रेसिपी (Misal Pav Recipe In Marathi) आम्ही तुम्हाला इथे देत आहोत.
घरगुती मिसळ रेसिपी – Misal Pav Recipe In Marathi
मिसळ ही केवळ बाहेरच खाता येते असं नाही. तुमच्या घरी एखादा कार्यक्रम असेल तर तुम्ही मस्तपैकी फक्कड मिसळ घरीही तयार करू शकता. घरगुती मिसळ (Misal Recipe In Marathi) तयार करण्याची पद्धत आपण इथे जाणून घेऊया.
मिसळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य – Ingredients For Misal Pav In Marathi
- 1 कप मोड आलेली मटकी
- 1 कप मोड आलेले मूग
- 1 बारीक कापलेला कांदा
- 1 बारीक कापलेला टॉमेटो
- आलं लसूण पेस्ट
- 2 चमचे तिखट
- 1 चमचा धनेपूड
- 1 चमचा गरम मसाला
- 1 चमचा आमचूर पावडर
- 1 चमचा जिरे आणि मोहरी
- अर्धा चमचा हळद
- फोडणीसाठी तेल
- आवश्यकतेनुसार मीठ आणि पाणी
- पाव
मिसळ कशी बनवतात? – Misal Pav Recipe In Marathi
- सर्वात पहिल्यांदा मूग, मटकी, वाटाणा पाण्यात स्वच्छ धुवा आणि रात्री पाण्यात भिजत घालून मोड येण्यासाठी एका स्वच्छ कपड्यात बांधून ठेवा
- सकाळी मोड आलेली मटकी, मूग, वाटाणा कुकरमध्ये हळद घालून तीन शिट्टी देऊन शिजवा
- नंतर एका पातेल्यात तेल गरम करून घ्या आणि तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, जिरे, हिंगाची फोडणी करून कांदा परतून घ्या
- त्यानंतर त्यात आलं – लसूण पेस्ट घालून परतून घ्या
- नंतर त्यात लाल तिखट, मीठ, हळद, धने पूड, आमचूर पावडर घालून मिक्स करा आणि परतवा
- त्यामध्ये वाफवलेली मटकी, वाटाणा आणि मूग घालून मिक्स करून थोडावेळ झाकून ठेवा
- त्यामध्ये वरून पाणी घाला आणि उकळी काढा. उकळताना त्यात थोडासा बाजारात मिळणारा मिसळ मसाला तुम्ही घाला आणि शिजू द्या
- मिसळ तयार झाल्यावर एका बाऊलमध्ये काढा, त्यात वर कांदा, फरसाण, चिरलेली कोथिंबीर पेरा. बाजूला एका डिशमध्ये वेगळा कापलेला कांदा, लिंबू आणि पाव ठेवा आणि मस्तपैकी गरम मिसळीचा आनंद लुटा
टीप – तुम्ही घरगुती मिसळ करताना कांदा – खोबऱ्याचे वाटणही वापरू शकता. तसंच यामध्ये फरसाणसह चिवडा आणि पोह्यांचा वापरही करू शकता.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध मिसळ पाव | Maharashtra Famous Misal Pav & Their Recipe In Marathi
महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी प्रसिद्ध मिसळ पाव (Misal Pav Recipe In Marathi) मिळतात. या प्रसिद्ध ठिकाणच्या मिसळ पावची रेसिपी तुम्ही जाणून घ्या आणि करा घरी मिसळ पाव.
पुणेरी मिसळ – Puneri Misal Pav Recipe In Marathi
गोडवा आणि तिखटपणा अशी वेगळीच चव असणारी पुण्याची मिसळही प्रसिद्ध आहे. पुणेरी मिसळ घरीदेखील तुम्ही करू शकता. पुणेरी मिसळीची सोपी रेसिपी घ्या जाणून.
पुणेरी मिसळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- 200 ग्रॅम मोड आलेली मटकी
- 1 वाटी भाजलेला कांदा, खोबरं, खसखस, तीळ, आलं – लसूण, कोथिंबीर याचे वाटण
- 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
- दीड चमचा लाल तिखट
- अर्धा चमचा हळद
- कडिपत्त्याची पाने
- हिंग
- तेल
- बटाटा
- 1 चमचा गोडा मसाला
- 1 चमचा गरम मसाला
- तेल
- 1 चमचा गूळ
- आवश्यकतेनुसार मीठ आणि पाणी
- फरसाण, लिंबू, पाव, कांदा
पुणेरी मिसळ बनविण्याची पद्धत – Puneri Misal Recipe In Marathi
- मटकी रात्रभर पाण्यात भिजत घालून त्याला मोड आणावेत
- सकाळी मोड आलेली मटकी धुऊन घ्यावी आणि बाजूला ठेवावी
- एका पातेल्यात तेल तापवावे. त्यात जिरे मोहरी तडतडू द्यावे. त्यात जिरे, कढिपत्ता, हिंग, कांदा आणि लसणाचे वाटण घालून तेल सुटेपर्यंत व्यवस्थित शिजवा
- त्यानंतर त्यात तिखट, हळद, गोडा मसाला, गरम मसाला, धने जिरे पावडर, टॉमेटो, कांदा आणि मीठ घालून तेल सुटपेर्यंत शिजू द्या आणि वरून मटकी घालून पाणी घाला आणि मिक्स करून व्यवस्थित शिजू द्या
- त्यानंतर गूळ आणि कोथिंबीर घालून पुन्हा वाफ येऊ द्या
- बटाटे उकडून घ्या. सालं काढून त्याच्या फोडी करून घ्या
- दुसऱ्या पातेल्यात तेल घाला, त्यात जिरे मोहरी, कडिपत्ता तडतडू द्या
- हिरवी मिरची आणि कांदा घालून परतून घ्या. त्यानंतर हळद घाला आणि कापलेल्या बटाट्याच्या फोडी घालून भाजी करून घ्या
- आता पुणेरी मिसळीची प्लेट तयार करताना त्यात सर्वप्रथम बटाट्याची भाजी घाला. वरून कापलेला कांदा, मटकी भाजीचा रस्सा घाला. त्यात फरसाण आणि पुन्हा वरून कांदा, चिरलेली कोथिंबीर पेरा. बाजूला लिंबू आणि पाव ठेवा. तुमची गरमागरम पुणेरी मिसळ तयार
नाशिकची झणझणीत साधना मिसळ – Nasik Sadhna Misal Recipe In Marathi
नाशिकची झणझणीत साधना मिसळ ही स्पेशल तर्री मिसळ म्हणून प्रसिद्ध आहे. ही मिसळ खाण्यासाठी खास नाशिकमध्ये गर्दी होते.
नाशिकची साधना मिसळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून
- 7-8 लसणीच्या पाकळ्या
- 2 आल्याचे तुकडे
- 200 ग्रॅम मोड आलेले मूग
- 10-12 कडिपत्त्याची पाने
- चिरलेली कोथिंबीर
- चिरलेला कांदा
नाशिकची झणझणीत साधना मिसळ फोडणीसाठी साहित्य
- 1 मोठा चिरलेला कांदा
- 1 मोठा चिरलेला टॉमेटो
- आवश्यकतेनुसार मीठ
- तेल
- 1 चमचा लाल काश्मिरी तिखट
- 1 चमचा लाल तिखट
- 3 चमचे मिसळ मसाला
- अर्धा चमचा हळद
- जिरे – मोहरी
- लिंबू आणि शेव
- पाव
नाशिकची साधना मिसळ तर्री रेसिपी – Nasik Sadhna Misal recipe In Marathi
- मूग पाण्यात रात्रभर भिजवा आणि कापडात बांधून मोड आणून घ्या
- दुसऱ्या दिवशी सकाळी एका पॅनमध्ये तेल घाला. त्या कोथिंबीर आणि कडिपत्ता सोडून सगळे साहित्य तेलावर घालून परता आणि भाजून घ्या. भाजल्यावर खाली काढा आणि मग मिक्सरमध्ये हे सर्व काढा आणि त्यात कोथिंबीर कडिपत्ता घालून पेस्ट करून घ्या
- पुन्हा पॅनमध्ये थोडे जास्त तेल घ्या. कांदा गुलाबी असा परतून घ्या. त्यात कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट तेल सुटेपर्यंत भाजून घ्या
- त्यावर तिखट, हळद, मीठ, टॉमेटो, मिसळ मसाला घालून परता आणि मग मूग आणि पाणी घालून व्यवस्थित शिजवा. साधारण दहा मिनिट्सने तुमचा मिसळीचा रस्सा तयार होईल
- एका सर्व्हिंग प्लेटमध्ये थोडे शिजलेले मूग, त्यावर शेव, कांदा, कोथिंबीर, टॉमेटो घाला आणि वरून मिसळीचा रस्सा घाला. पावाबरोबर खायला द्या. हवं असेल तर वरून अजून तर्री घाला. नाशिकची झणझणीत मिसळ मस्तपैकी तयार
कोल्हापुरी मिसळ – Kolhapuri Misal Recipe In Marathi
जिभेला तिखटेचा चटका देणारी अशी कोल्हापुरी मिसळ कितीही तिखट असली आणि डोळ्यातून पाणी आणणारी असली तरीही खावीशी वाटणारी आहे. अशी झणझणीत कोल्हापुरी मिसळ कशी बनवयाची जाणून घ्या. कोल्हापुरी मिसळीचा मसाला अधिक महत्त्वाचा (Misal Masala Recipe In Marathi). तुम्हीही ही रेसिपी करून पाहा.
कोल्हापुरी मिसळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- 1 वाटी मोड आलेली मटकी उकडून घ्या
- 1 मोठा कांदा बारीक चिरलेला
- 2-3 चमचे लसूण आणि खोबऱ्याचे वाटण
- 1 चमचा धनेपूड
- अर्धा चमचा गरम मसाला
- 1 चमचा आले – लसूण पेस्ट
- 2 चमचा कांदा – लसूण वाटलेला मसाला
- आवश्यकतेनुसार मीठ आणि पाणी
- कढीपत्ता
- चिरलेली कोथिंबीर, कांदा, लिंबू आणि पाव
- तेल
कोल्हापुरी मिसळ बनविण्याची पद्धत – Kolhapuri Misal Making Process In Marathi
- एका कढईत किंवा मोठ्या पातेल्यात तेल गरम करा. त्यात जिरे, मोहरीची फोडणी करून घ्या आणि त्यात हिंग कडिपत्ता घालून त्यात चिरलेला कांदा परतवा
- कांदा ब्राऊन होत आल्यावर त्यात आलं – लसूण पेस्ट, लसूण – खोबऱ्याचे वाटण, कांदा – लसूण वाटलेला मसाला, गरम मसाला, धनेजिरे पूड, तिखट, हळद घालून व्यवस्थित मिक्स करावे
- त्यानंतर त्यात थोडेसे पाणी घालून मसाला पूर्ण शिजू द्यावा आणि उकळल्यावर त्यात वाफवलेली मटकी घालून परतून घ्यावी. वरून मीठ घालावे आणि व्यवस्थित शिजू द्यावे. तेल सुरूवातीला थोडे जास्त घाला म्हणजे मिसळीसाठी चांगला कट तयार होतो
- हे तयार झाल्यावर एका मोठ्या बाऊलमध्ये काढा. त्यात बारीक चिरलेला कांदा, पोहे, फरसाण, लिंबू घालून बाजूला पाव ठेऊन खायला द्या. तुम्हाला हवं असेल तर पावाला बटर लाऊन भाजूनही घेऊ शकता. हे चवीला अप्रतिम लागते
मामलेदार मिसळ – Mamledar Misal Recipe In Marathi
ठाण्याची मामलेदार मिसळही खूप प्रसिद्ध आहे. याची चव कुठेच मिळत नाही असं म्हटलं जातं. पण तिथे प्रत्येकाला जाऊन खाणं शक्य नसेल तर त्यांच्यासाठी मामलेदार मिसळची खास रेसिपी.
मामलेदार मिसळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- 1 वाटी हिरवे वाटाणे
- 1 मोठा चमचा धने
- 1 लहान चमचा जिरे
- 5-6 लवंगा
- 8-10 काळीमिरी
- 1 वाटी सुके/ओले खोबरे
- 1 इंच आले
- 10-12 पाकळ्या लसूण
- 5-6 चिरलेले कांदे
- तेल
- हळद
- तिखट
- डाळीचे पीठ
- भावनगरी बारीक शेव
- पाणी
- आवश्यकतेनुसार मीठ
- 6-7 कढीपत्त्याची पाने
- पाव
मामलेदार मिसळ बनविण्याची पद्धत – Mamledar Misal Recipe In Marathi
- रात्री वाटाणे पाण्यात भिजत घाला
- मिसळ करताना दुसऱ्या दिवशी ते उकडून घ्या
- 4 कांदे उभे चिरून घ्या आणि सुके खोबरे किसून घ्या
- मग धने, जिरे, लवंगा, मिरी, कांदा, खोबरे भाजून घ्या आणि थंड झाल्यावर मिक्सरमधून वाटून घ्या
- आले-लसणीची पेस्ट करून घ्या
- एका कढईत तेल टाकून त्यात आले-लसणीची पेस्ट आणि वाटलेला मसाला घाला आणि परतून घ्या
- त्यानंतर थोडी हळद घालून त्यात वाटाणे घाला आणि वरून पाणी घाला
- त्यानंतर मीठ आणि तिखट घाला
- डाळीच्या पिठात पाणी घालून त्याची गुळगुळीत पेस्ट करून कढईत घाला आणि कढीपत्त्याची पाने घालून एक उकळी आणून घ्या
- तर दुसऱ्या बाजूला एका कढईत तेल घालून ते तापल्यावर त्यात थोडी हळद आणि आवडीप्रमाणे तिखट घालून लगेच गॅस बंद करा आणि ही तर्री कढईतल्या मिसळीवर ओता
- आता हे सर्व तयार झाल्यावर एका बाऊलमध्ये वरील मिसळ रस्सा घ्या. त्यात भावनगरी शेव, बारीक चिरलेला कांदा, वरून कोथिंबीर पेरा आणि पावाबरोबर गरमागरम खायला द्या
उपवासाची मिसळ – Upvas Misal Recipe In Marathi
उपवास म्हटला की साबुदाण्याची खिचडी अथवा साबुदाणे वडे हे ठरलेले असतात. पण तुम्ही घरच्या घरी उपवासाची फराळी मिसळही नक्की तयार करून खाऊ शकता. उपवासाच्या मिसळीची सोपी रेसिपी.
उपवासाची मिसळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- उकडलेले 4 बटाटे
- 1 कप बटाट्याचा उपवासाचा चिवडा
- 2 चमचे दाण्याचे कूट
- 2 चमचे ओलं खोबरं
- 2 चमचे साजूक तूप
- 1 चमचा जिरे
- 4-5 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
- कडिपत्ता
- आवश्यकतेनुसार मीठ
- चिरलेली कोथिंबीर
- आल्याचे बारीक तुकडे
शेंगदाण्याच्या आमटीसाठी साहित्य
- 4 चमचे शेंगदाणे कूट
- अर्धा कप उकडलेले शेंगदाणे
- 2 चमचे गूळ
- 5-6 आमसूल
- 5 कप ओले खोबरे
- 6-7 हिरव्या मिरच्या
- आल्याचे तुकडे
- आवश्यकतेनुसार मीठ
- चिरलेली कोथिंबीर
- 2 चमचे साजूक तूप
- 1 चमचा जिरे
उपवासाची मिसळ बनविण्याची पद्धत – Upvas Misal Recipe In Marathi
- सर्वात आधी शेंगदाणे उकडून घ्या आणि बटाटे कुकरमध्ये शिजवून सालं काढून त्याच्या फोडी करून घ्या
- एका कढईत तूप घाला. त्यात जिरे तडतडू द्या. त्यानंतर आल्याचे तुकडे, मिरची तुकडे, ओले खोबरे, कोथिंबीर, कडिपत्ता घालून परतवा आणि वरून बटाट्याच्या फोडी घालून भाजी करून घ्या. लक्षात ठेवा मीठ, शेंगदाण्याचे कूट आणि थोडीशी साखर बटाट्याच्या फोडीवरच पेरून ठेवा. भाजी करताना थोडासा पाण्याचा हबका मारून शिजवून घ्या
- आमटीसाठी दाण्याचे कूट, खोबरं, हिरव्या मिरच्या, आले, कोथिंबीर हे सर्व थोडेसे पाणी घालून मिक्सरमधून वाटून घ्या. एकदम बारीक पेस्ट न करता थोडीशी जाडसर ठेवा
- एका पातेल्यात तूप घाला. त्यात जिरे घालून खमंग फोडणी करा. त्यात ओले खोबरे आणि कोथिंबीर घालून परतून घ्या आणि त्यानंतर वरील वाटण घाला. तुम्हाला जितकी जाडसर आमटी हवी असेल त्या अंदाजाने पाणी घाला. वरून गूळ, आमसूल, मीठ आणि थोडंसं ओलं खोबरं घालून व्यवस्थित मंद आचेवर आमटी शिजू द्या. मध्ये मध्ये आमटी ढवळत राहा
- आता एका वाटीमध्ये आधी बटाट्याची उपवासाची भाजी घाला. त्यावर दाण्याची आमटी किंवा उसळ घाला आणि वरून बटाट्याचा उपवासाचा चिवडा घाला. ओलं खोबरं आणि चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा
टीप – तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साबुदाण्याची खिचडीदेखील यामध्ये घालून उपवासाची फराळी मिसळ तयार करून खाऊ शकता
वऱ्हाडी मिसळ – Varhadi Misal Recipe In Marathi
विदर्भामध्ये पाव अशी संकल्पना नाही. मात्र वऱ्हाडी मिसळ अस्सल आणि फक्कड मिळते. विदर्भातील गावागावातील लहान लहान बस स्टँडजवळ ही अप्रतिम चवीची वऱ्हाडी मिसळ तुम्हाला खायला मिळते.
वऱ्हाडी मिसळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- उकडलेले एक वाटी वाटाणे
- बारीक चिरलेला कांदा
- 5-6 कडिपत्त्याची पाने
- पाणी
- तेल
- मोहरी, जिरे, तमालपत्र
- दगडफूल
- 1 चमचा बेसन
- 1 चमचा आलं – लसूण पेस्ट
- अर्धा चमचा हळद
- 1 चमचा धनेपूड
- 1 चमचा तिखट
- 2 चमचे काश्मिरी लाल तिखट
- आवश्यकतेनुसार मीठ
- हिंग
- अर्धी वाटी पातळ पोहे
- लसूण पेस्ट
- चिवडा मसाला
- धनेपूड
- उभा चिरलेला एक कांदा
- चिरलेल्या बारीक हिरव्या मिरच्या
- फरसाण
- बारीक शेव
वऱ्हाडी मिसळ बनविण्याची पद्धत – Varhadi Misal Recipe In Marathi
- मिक्सरच्या भांड्यात कांदा, कडिपत्याची पाने पाणी घालून पेस्ट करून घेणे
- एका कढईत 3 चमचे तेल गरम करून घ्या. त्यात जिरे, मोहरी, तमालपत्र, बेसन मिक्स करून घ्या
- त्यानंतर जी पेस्ट तयार केली आहे ती त्यात मिक्स करून परतवा. साधारण दहा मिनिट्स मध्यम आचेवर हे शिजू द्या
- त्यानंतर यामध्ये आलं – लसूण पेस्ट, हळद, धनेपूड, तिखट, काश्मिरी लाल तिखट घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या
- त्यात वाटाणे मिक्स करून त्यात पाणी घाला आणि मीठ घालून शिजू द्या
- दुसऱ्या कढईत तेल गरम करा. त्यात थोडीशी हळद, थोडेसे हिंग घालून परता आणि त्यावर पातळ पोहे भाजून घ्या
- पोहे कुरकुरीत झाल्यावर पॅनच्या मध्यभागीच पोहे पसरवून जागा करा. त्यात पुन्हा एक चमचा तेल घाला. त्यात लसूण पेस्ट घाला, लाल तिखट, मीठ घालून मिक्स करा. त्यावर चिवडा मसाला आणि धनेपूड घालून पुन्हा मिक्स करा आणि वरून कडिपत्त्याची पाने चिवडा गरम असतानाच मिक्स करा
- वरून पुन्हा हा चिवडा तिखट करण्यासाठी लाल तिखट आणि अगदी थोडी साखर मिक्स करून घ्या. त्यानंतर चिवडा बाऊलमध्ये काढून ठेवा
- दुसऱ्या बाऊलमध्ये कांदा उभा चिरून घ्या. त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कडिपत्ता पाने, जिरे, हळद, धनेपडू, मीठ मिक्स करून घ्या. त्यात बेसन, आलं लसूण पेस्ट, किंचित बेकिंग सोडा, ओवा मिक्स करून पाणी घालून भजीचे सारण तयार करा
- तेल गरम करून या भजी तुम्ही तळून घ्या
- सर्व्ह करण्यासाठी एका बाऊलमध्ये तुम्ही पहिल्यांदा फरसाण त्यात काढा. त्यानंतर वर तयार केलेला तिखट चिवडा, वरून पुन्हा फरसाण, मिसळीतील वाटाणे काढून त्यावर घाला आणि वरून शेव पसरवा, तळलेली भजी कुस्करून त्यावर घाला. त्यावरून बारीक चिरलेला कांदा घाला आणि मग हे सर्व हाताने मिक्स करून घ्या. त्यात वरून तर्री घालून सर्व्ह करा गरमागरम वऱ्हाडी मिसळ.
वडा मिसळ – Vada Misal Recipe In Marathi
वडा मिसळ आणि कट वडा हे साधारण कोकणात मिळणारे पदार्थ आहेत. अप्रतिम चवीचे आणि जिभेवर चव रेंगाळणारा असा हा पदार्थ तुम्ही घरीही बनवू शकता. वडा मिसळची रेसिपी खास तुमच्यासाठी.
वड्यासाठी साहित्य
- उकडलेले बटाटे
- चिरलेला कांदा
- बारीक कापलेली मिरची
- कडीपत्ता
- हळद
- बारीक चिरलेली कोथींबीर
- आले पेस्ट
- लसूण पेस्ट
- तेल, हिंग, जिरे, मोहरी
- बेसन
- कोल्हापुरी तिखट
- मीठ
- चमचाभर मोहन
- तळायला तेल
कटसाठी साहित्य
- 1 वाटी कांदा पेस्ट
- 1 वाटी टोमॅटो पेस्ट
- 1 वाटी ओलं खोबर
- 1 वाटी पापडी अथवा गाठी
- एक वाटी बटाटा भाजी
- 1 तमालपत्र,
- 4 लवंगा,
- 1 दालचिनी
- दीड चमचा लसूण पेस्ट
- कोकम
- मीठ
बनविण्याची पद्धत
- उकडलेल्या बटाट्याचे बारीक तुकडे करुन घ्या
- एका कढईत कांदा, जीरे, मोहरी, हिंग, कडीपत्ता, मिरच्या घालून फोडणी करा आणि त्यात चवीप्रमाणे मीठ घाला
- आता या मिश्रणाचे दोन भाग करुन एका भागात आल्याची तर दुसर्या भागात लसणीची पेस्ट मिसळा. जेणेकरून एकाचवेळी दोन वेगवेगळ्या चवीचे वडे खायला मिळतील आणि मग या मिश्रणाचे लिंबाएव्हढे अथवा त्यापेक्षा मोठे गोळे बनवून घ्या
- एका भांड्यात बेसन, हिंग, कोल्हापुरी तिखट, मीठ, कोथिंबीर कापून, कडिपत्ता कापून मिक्स करा, चमचाभर मोहन यात घाला आणि पाण्याने भजीच्या पिठासारखे घट्ट भिजवा
- त्यानंतर वरील गोळे यात बुडवून त्याचे वडे तळून घ्या
- दुसऱ्या गॅसवर एका पातेल्यात थोड्याशा तेलात तमालपत्र, लवंगा, दालचिनी परतून घ्या. त्यावर कांदा पेस्ट घालून कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्या
- त्यानंतर आता त्यात ओले खोबरे घालून परता. मग टोमॅटो पेस्ट घालून साधारण शिजवून घ्या
- हे वरील सगळे मिश्रण मिक्सरवर फिरवून छान बारीक वाटून घ्या आणि त्यात बटाट्याची भाजी अन पापडी अथवा गाठीचा चुरा मिसळा
- आता अजून एका पातेल्यात जरा जास्त तेल घ्या. तेल तापल की गॅस बंद करा आणि त्यात कोल्हापुरी तिखट घाला. मात्र हे जळणार नाही याकडे लक्ष द्या. भराभर पळीने हलवत रहा.
- आता त्यात वरील पेस्ट घालून पुन्हा गॅस सुरु करा. पाहिजे तेवढे पाणी, मीठ अन कोकम घालून याला एक चांगली उकळी काढा. तुमची मिसळीची तर्री तयार
- एका बाऊलमध्ये बटाटावडा ठेवा आणि त्यावर ही तर्री घाला. वरून कांदा आणि कोंथिबीर पेरा आणि गरमागरम पावासह खायला द्या
हटके मिसळ पाव रेसिपी प्रकार
आता वेगवेगळ्या चवीच्या मिसळही बाजारामध्ये आपल्याला चाखायला मिळतात. यापैकी काही प्रसिद्ध असणाऱ्या प्रकारांच्या रेसिपी आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत.
कॉर्न मिसळ (Corn Misal Recipe In Marathi)
साहित्य
- 2 कप उकडवलेले स्वीर्ट कॉर्न (मका)
- हळद
- बारीक चिरलेली कोथींबीर
- आले पेस्ट
- लसूण पेस्ट
- तेल, हिंग, जिरे, मोहरी
- कांदा उभा चिरलेला
- कांदा – भाजलेलं खोबरं वाटण
- चीज
- 1 तमालपत्र,
- 4 लवंगा,
- 1 दालचिनी
बनविण्याची पद्धत
- स्वीट कॉर्न मीठ घालून उकडून घ्या
- 4 कांदे उभे चिरून घ्या आणि सुके खोबरे किसून घ्या
- मग धने, जिरे, लवंगा, मिरी, दालचिनी, तमालपत्र, कांदा, खोबरे भाजून घ्या आणि थंड झाल्यावर मिक्सरमधून वाटून घ्या
- एका कढईत तेल टाकून त्यात आले-लसणीची पेस्ट आणि वाटलेला मसाला घाला आणि परतून घ्या
- त्यानंतर थोडी हळद, मीठ आणि तिखट घालून परता आणि मग त्यात मका घाला आणि वरून पाणी घाला आणि मग शिजू द्या
- आता हे सर्व तयार झाल्यावर एका बाऊलमध्ये वरील मिसळ रस्सा घ्या. त्यात उकडलेला स्वीर्ट कॉर्न मका जो वेगळा काढून ठेवा तो घाला, वरून बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर पेरा आणि किसलेले चीज वरून घाला आणि पावाबरोबर गरमागरम खायला द्या
चीज मिसळ – Cheese Misal Recipe In Marathi
साहित्य
- 1 कप मोड आलेली मटकी
- 1 कप मोड आलेले मूग आणि वाटाणे
- 1 बारीक उभा कापलेला कांदा
- 1 बारीक कापलेला टॉमेटो
- आलं लसूण पेस्ट
- 2 चमचे तिखट
- 1 चमचा धनेपूड
- 1 चमचा गरम मसाला
- 1 चमचा आमचूर पावडर
- 1 चमचा जिरे आणि मोहरी
- अर्धा चमचा हळद
- फोडणीसाठी तेल
- आवश्यकतेनुसार मीठ आणि पाणी
- पाव
- चीज (किसलेले)
बनविण्याची पद्धत
- एका कढईत किंवा मोठ्या पातेल्यात तेल गरम करा. त्यात जिरे, मोहरीची फोडणी करून घ्या आणि त्यात हिंग त्यात चिरलेला कांदा परतवा आणि त्यात खोबरं पण भाजून घ्या
- कांदा ब्राऊन होत आल्यावर त्यात आलं – लसूण पेस्ट, गरम मसाला, धनेजिरे पूड, तिखट, हळद घालून व्यवस्थित मिक्स करावे
- त्यानंतर त्यात थोडेसे पाणी घालून मसाला पूर्ण शिजू द्यावा आणि उकळल्यावर त्यात वाफवलेली मटकी, मूग आणि वाटाणे घालून परतून घ्यावी. वरून मीठ घालावे आणि व्यवस्थित शिजू द्यावे
- हे तयार झाल्यावर एका मोठ्या बाऊलमध्ये काढा. त्यात बारीक चिरलेला कांदा, फरसाण, आणि वरून किसलेले चीज भरभरून घाला. लिंबू घालून बाजूला पाव ठेऊन खायला द्या
पाणीपुरी मिसळ – Panipuri Recipe In Marathi
साहित्य
- साहित्य
- 1 कप मोड आलेले मूग
- पाणीपुरीच्या पुऱ्या
- खजुराची गोड चटणी
- कोथिंबीर
- चिरलेला बारीक कांदा
- पाणीपुरी मसाला
- बारीक शेव
बनविण्याची पद्धत
- मोड आलेले मूग तुम्ही शिजवून घ्या
- एका कढईत किंवा मोठ्या पातेल्यात तेल गरम करा. त्यात जिरे, मोहरीची फोडणी करून घ्या आणि त्यात हिंग त्यात चिरलेला कांदा परतवा आणि त्यात खोबरं पण भाजून घ्या
- कांदा जेव्हा शिजत येईल तेव्हा त्यात धनेजिरे पूड, आलं – लसूण पेस्ट, गरम मसाला, तिखट, हळद घाला
- त्यानंतर त्यात थोडा पाणीपुरी मसाला मिक्स करा जेणेकरून मिसळीला पाणीपुरीची चव येईल
- सर्व्ह करताना एका वाटीत खजुराची गोड चटणी, पुऱ्या फोडून त्यात थोडी शेव टाका, एका वाटीत मिसळीचा रस्सा, चिरलेला कांदा आणि एका वाटीत शिजलेले मूग असं द्यावे
- पाणीपुरीमध्ये कांदा, मूग आणि मिसळीचा रस्सा चमच्याने घालून तुम्ही फस्त करू शकता
तंदुरी मिसळ – Tandoori Misal Recipe In Marathi
साहित्य
- 4 लवंगा
- कापलेले खोबऱ्याचे तुकडे
- 4 काळी मिरी
- 1 चमचा जिरे
- 1 चमचा पांढरे तीळ
- 2 उभे चिरलेले कांदे
- 2 उभे चिरलेले टॉमेटो
- हळद
- मीठ
- लाल तिखट
- काश्मिरी लाल तिखट
- गरम मसाला
- धने पावडर
बनविण्याची पद्धत
- एका कढईत लवंगा, खोबरे, तीळ, जिरे, काळी मिरी भाजून घ्या
- कढईत तेल घालून त्यात कांदे आणि टॉमेटो भाजून घ्या आणि नंतर मिक्सरमधून त्याची प्युरी करून घ्या
- दुसऱ्या कढईत तेल गरम करा आणि त्यात वरील पेस्ट घालून शिजवा. व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्यात हळद, लाल तिखट, काश्मिरी लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर घालून मिक्स करा आणि त्यात काही वाटाणे आणि पाणी घालून 10 मिनिट्स शिजवा
- एक मातीचे भांडे घ्या. त्यात फरसाण घाला. त्यामध्ये एक भांड ठेवा आणि जाळलेला कोळसा त्यामध्ये ठेवा आणि हे भांड झाका
- एका डिशमध्ये मिसळीचा रस्सा, पाव, कांदा, लिंबू घ्या आणि झाकलेले मातीचे भांडे बाजूला ठेवा आणि नंतर कोळसा बाहेर काढून बाकीचे सर्व पदार्थ त्या फरसाणमध्ये घाला आणि मस्त तंदूर मिसळ एन्जॉय करा
मिसळ पावात किती असतात पोषक तत्व, सत्यता – Misal Pav Recipe Nutrition Facts In Marathi
मिसळ पाव तसं पाहिलं तर फास्ट फूड असं म्हटलं जात नाही. पण घरी बनविलेली मिसळ पाव तुम्ही आरोग्यासाठी हेल्दी करून खाऊ शकता. यामध्ये एकूण किती फॅट्स असतात अथवा किती कॅलरी असतात याची योग्य माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. मिसळ पावमध्ये नक्की काय काय पोषक तत्व आढळतात जाणून घ्या –
11% एकूण फॅट अर्थात 7.4 ग्रॅम
4% सॅच्युरेटेड फॅट अर्थात 0.9 ग्रॅम
0% कोलेस्ट्रॉल 0 मि.ग्रॅ.
12% सोडियम 293 मि. ग्रॅ.
18% पोटॅशियम 616 मि. ग्रॅ.
14% एकूण कार्बोहायड्रेट्स 42 ग्रॅ
34% डाएटरी फायबर 8.4 ग्रॅ
साखर 3.5 ग्रॅ
FAQ’s – Misal Pav Recipe In Marathi
प्रश्नः मिसळ बनवायला साधारण किती वेळ लागतो?
उत्तरः तुम्ही कोणती मिसळ बनवणार आहात त्यावर हे अवलंबून आहे. मात्र साधारणतः सर्व तयारी असेल तर मिसळ बनवायला पाऊण तास पुरेसा होतो.
प्रश्नः मिसळीमध्ये बटाटा भाजी अधिक चांगली लागते की चिवडा?
उत्तरः हे सर्वस्वी तुमच्या चवीच्या आवडीनुसार अवलंबून आहे. काही जणांना चिवडा आवडतो तर काही जणांना बटाट्याची भाजी. तर काहींना मिसळीत पोहे आवडतात. पण या सर्वात महत्त्वाचे म्हणजे मिसळीची तर्री हे नक्की.
प्रश्नः मूग, मटकी, वाटाण्याशिवाय अधिक कोणती कडधान्ये वापरता येतात?
उत्तरः सहसा मिसळ या तीन कडधान्याने बनविली जाते. पण तुम्ही घरी करणार असाल आणि तुम्हाला चवळी आवडत असेल तर तुम्ही यामध्ये चवळाचाही समावेश करून घेऊ शकता.
निष्कर्ष – मिसळ पाव रेसिपी मराठीतून (Misal Pav Recipe In Marathi) आपल्या सर्वांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत. मिसळ रेसिपी (Misal Recipe In Marathi) खास तुमच्यासाठी. मिसळीचे (Misal Pav In Marathi) काही हटके प्रकारही तुम्हाला यामध्ये दिसतील. तर खासियत असणाऱ्या पुणेरी मिसळ पाव (Puneri Misal Pav Recipe In Marathi), मामलेदार मिसळ (Mamledar Misal Recipe In Marathi), कोल्हापुरी मिसळ (Kolhapuri Misal Recipe In Marathi) आणि त्यातील मिसळीचे मसाले (Misal Masala Recipe In Marathi) याची सर्व इत्यंभूत माहिती खास तुमच्यासाठी.