ADVERTISEMENT
home / Love
डेटिंग अॅप

डेटिंग अॅप वरुन प्रेम करताना करु नका या चुका

 एखाद्याला प्रेम अगदी पटकन आणि सहज मिळते. तर काही जणांना असे प्रेम मिळायला खूप अडचण येते. मनासारखा आणि योग्य जोडीदार मिळणे हे खूप जणांना कठीण जाते. अशावेळी डेटिंग अॅपचा आधारही खूप जण घेताना दिसतात. पण याच डेटिंग अॅपवरुन कधीकधी विश्वासघात किंवा त्याहून वाईट घटना घडल्याचा अनुभव अनेकांना आला आहे. त्यामुळे डेटिंग अॅपवरुन कोणत्याही गोष्टी करताना काही चुका ज्या भावनेत वाहून जाऊन घेतल्या जातात. थोडासा भावनांना आवर घातला की या चुका होण्यापासून तुम्ही स्वत:ला रोखू शकता

योग्य वेळी मुलं होऊ देण्याचा निर्णय चांगला, नवं विवाहितांनी नक्की वाचा

माहिती काढा

एखाद्या व्यक्तिची ओळख अशा डेटिंग अॅप वरुन झाल्यानंतर त्याची थोडी माहिती काढण्यास काहीच हरकत नाही. बरेचदा खोटे किंवा मॉर्फ केलेले फोटो लावून काही जण केवळ टाईमपास करण्यासाठी या अकाऊंटवरुन  एखाद्या मुलीशी किंवा मुलाशी चॅट करु पाहतात. खोट्या फोटोंमुळे खूप जण एखाद्याच्या प्रेमात पडण्याची शक्यता असते.  इथेच तुम्हाला भावनांना थोडासा आवर घालायचा असतो. कोणत्याही फोटोपाहून त्याच्याशी लगेच सगळं शेअर करण्याआधी त्या व्यक्तिची माहिती तुम्ही काढून घ्या. माहिती काढल्यानंतर सोशल मीडियावर या व्यक्तिला शोधणे त्याची माहिती काढणे सहज शक्य होते.

वैयक्तिक गोष्ट शेअर करु नका

कोणत्याही डेटिंग अॅपवरील व्यक्तिशी बोलायला घेतल्यावर तुम्ही त्याच्यावर जो पर्यंत संपूर्ण विश्वास बसत नाही तोवर त्याला कोणतीही वैयक्तिक माहिती सांगू नका. अशा वैयक्तिक माहितीमध्ये घराचा पत्ता, कामाचे ठिकाण, जीमचे ठिकाण किंवा तुमच्या काही खासगी जागा अशी काही माहिती तुम्ही अजिबात सांगू नका. अशा वैयक्तिक गोष्टी शेअर केल्यामुळेही तुम्हाला नुकसान होऊ शकते. यागोष्टी व्यतिरिक्त तुमची आर्थिक परिस्थितीही न सांगिलेलीच बरी. कारण त्यामुळेही अनेकदा फसवणूक होते.

ADVERTISEMENT

नात्यामधील रोमान्स नक्की का कमी होतो, जाणून घ्या कारण

पैशांचे व्यवहार करु नका

Instagram

डेटिंग अॅप हा एखाद्या हनी ट्रॅपसारखा असतो. यामध्ये खूप वेळा गोड बोलून एखाद्याकडून काहीतरी काढून घेण्याचा एखाद्याचा मनसुबा असू शकतो. एखादी व्यक्ती आपलं मन जिंकून घेते. मन जिंकून घेतल्यानंतर हळुहळू आपल्या समस्या सांगू शकते. पैशांची अडचण सांगून तुमच्याकडून पैसे काढून घेतले जातात.  हल्ली डेटिंग अॅपची हीच भीती आणि धोका सगळ्यात जास्त लोकांना अनुभवायला मिळाला आहे. त्यामुळे ही चुकी करायला अजिबात विसरु नका. 

भेटायला जाताना

 एखाद्याशी खूप वेळ बोलल्यानंतर आणि त्याला जाणून घेतल्यानंतर भेटण्याची ओढ कोणालाही वेडी करु शकते. पण तुम्ही ज्याच्याकडे प्रेमाच्या भावनेने किंवा पार्टनर म्हणून विचार करत असाल तरी देखील  त्या व्यक्तिचे प्रेम मिळवण्यासाठी तुम्ही त्याला भेटायला जाताना त्याला कुठे भेटत आहात हे देखील माहीत करुन घ्या. भेटण्याचे ठिकाण हे नेहमी गर्दीचे आणि तुम्हाला माहीत असलेले ठिकाण निवडा. म्हणजे जर तुम्हाला ती व्यक्ती समोरुन पटली नाही तर तुम्हाला तेथून निघणे सोपे जाईल.  

डेटिंग अॅप वरुन प्रेम करताना किंवा ओळख वाढवताना या चुका करणे टाळा.

ADVERTISEMENT


नात्यात एकाच विषयावरुन होत असेल वाद.. तर एकदा वाचा

09 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT